Take a fresh look at your lifestyle.

असा साजरा झाला होता स्वतंत्र भारताचा पहिला प्रजासत्ताक दिन

१९५० आणि १९५४ दरम्यान भारतात प्रजासत्ताक दोन समारोह साजरा करण्यासाठी एक निश्चित स्थळ नव्हतं.

0

भारताचा पहिला प्रजासत्ताक सोहळा आजच्यापेक्षा खूपच वेगळा होता. भारतात पहिला प्रजासत्ताक दिन १९५० मध्ये साजरा करण्यात आला होता. २६ जानेवारी १९५० ला सकाळी १०.१८ मिनिटांनी भारताचं संविधान लागू करण्यात आलं होतं. त्यानंतर काही मिनिटांनी १०.२४ वाजता डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली होती.

इरविन मैदानात भारतीय ध्वज फडकवला

२६ जानेवारी १९५० ला भारतीय संविधान आणि डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या रूपाने भारताला पहिले राष्ट्रपती लाभले. हा प्रजासत्ताक दिन साजरा करत पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी इरविन मैदानात भारतीय ध्वज फडकवला होता.

प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीतील राजपथावर होणारे संचलन हा सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण असतो.

१९५५साली हे संचलन सुरू झाले. या दिवशी सेनेद्वारे परेड केली गेली होती आणि तोफांची सलामी देण्यात आली होती. परेडमध्ये सशस्त्र सेनेच्या तिन्ही दलांनी सहभाग घेतला होता. १९५५ मध्ये पहिल्यांदा राजपथाची प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी निश्चिती करण्यात आली.

१९५० आणि १९५४ दरम्यान भारतात प्रजासत्ताक दोन समारोह साजरा करण्यासाठी एक निश्चित स्थळ नव्हतं. सुरूवातीला हा समारोह लाल किल्ला, नॅशनल स्टेडियम, किंग्सवे कॅम्प आणि नंतर रामलीला मैदानावर आयोजित करण्यात आला होता. पहिल्या प्रजासत्ताक दिनाचे संचलन इर्विन स्टेडियम (आताचा नॅशनल स्टेडियम)वर झाली होती. हे संचलन पाहण्यासाठी सुमारे १५ हजार लोक उपस्थित होते.

एखाद्या महाराजाप्रमाणे घोडागाडीत बसून आले

प्रजासत्ताक दिन सोहळ्यातील ध्वजारोहणाची परंपरा आजही कायम आहे. पूर्वीप्रमाणे आजही राष्ट्रपती ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला सलामी देतात. पहिल्या प्रजासत्ताक दिनी डॉ. राजेंद्र प्रसाद एखाद्या महाराजाप्रमाणे घोडागाडीत बसून आले होते.१९५० पासूनच प्रजासत्ताक दिनाला इतर देशातील पाहुणे बोलवण्यास सुरूवात झाली होती. पहिल्या प्रजसत्ताक दिवसावर इंडोनेशियाचे तत्कालीन राष्ट्रपती सुकर्णो हे प्रमुख पाहुणे म्हणून आले होते.

सर्वसामान्य जनतेलाही प्रजासत्ताक सोहळ्याचा अनुभव घेता यावा म्हणून तेव्हाचे चित्ररथ दिल्लीतील कॅनॉट प्लेस भागातील रस्त्यांवरून राजपथावर यायचे. पहिल्या प्रजासत्ताक दिनी चित्ररथ काढण्यात आले होते. मात्र, तेव्हाचे चित्ररथ अत्यंत साधे असायचे. हळूहळू त्यांचे स्वरूप बदलत गेले.

तरीही झाली होती चेंगराचेंगरी तेव्हा देशाची लोकसंख्या कमी होती हे खरं असलं. तरी पहिल्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याबद्दल लोकांना प्रचंड कुतूहल होते. त्यामुळं १९५५ साली राजपथावर मोठी गर्दी झाली होती. सोहळा पाहण्यासाठी चढाओढ लागली होती. त्यातून काही प्रमाणात चेंगराचेंगरी झाली होती.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.