Take a fresh look at your lifestyle.

फाळणी नंतरच्या दंगलीत १० लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता

आजही लोकं त्या गोष्टीच्या आठवणीनं थरारून जातात. पण आता असे फार कमी लोकं राहिले आहेत की, जे त्यावेळेस भारतातून पाकिस्तान आणि पाकिस्तातून भारतात आले होते. ब्रिटिश इंडियाची फाळणीची इतिहासातील सर्वात मोठी मानवी शोकांतिका म्हणून नोंद आहे.

0

यंदाच्या १५ ऑगस्टला देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर देशभर “आझादी का अमृत महोत्सव” साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने देशाच्या जडणीघडणीतल्या काही प्रमुख घटनांचा आढावा आम्ही घेत आहोत.

तुम्ही आझादी का अमृत महोत्सव यावर क्लिक करून या घटना वाचू शकता.

ब्रिटिशांनी भारतात बस्तान बसवल्यानंतर सुरुवातीपासूनच सत्ता विस्तारासाठी ‘फोडा आणि झोडा’ या नीतीचा वापर केला होता. 14 ऑगस्‍ट 1947 रोजी भारताची फाळणी होऊन देशाचे दोन तुकडे झाले. फाळणीचे बीज स्वातंत्र्याच्या बरेच आधी रोवले गेले. राजकीय परिस्थितीत भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस मोठी राजकीय संस्था होती. भारताची फाळणी होऊन देशाचे दोन तुकडे झाले. त्‍यावेळी देशात ठिकठिकाणी दंगली उसळल्‍या होत्‍या. स्वातंतत्र्यपूर्व अखंड भारतात हिंदू बहुसंख्य होते.

अनेक भागामध्ये जातीय दंगली भडकल्या

स्वातंत्र्यासाठी अनेक वर्ष संघर्ष करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. कारण त्यांना ते स्वप्न पूर्ण होण्याची आशा होती, जे त्यांनी स्वतंत्र भारतासाठी पाहिलं होतं. पण याच दरम्यान, भारतात मुस्लिमांच्या हिताकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत एका गटाने थेट स्वतंत्र देशाचीच मागणी केली आणि या गटाचं नेतृत्व करत होते मोहम्मद अली जिन्ना.

जे देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्यांच्या स्वप्नांवर एक प्रकारे मोठा आघात होता. फाळणीची मागणी होताच देशातील अनेक भागामध्ये जातीय दंगली भडकल्या होत्या.

अखिल भारतीय मुस्लिम लिग पक्षाची स्थापना

भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस ही संस्था मुसलमानांचे हितसंबध राखण्यास असमर्थ आहे असे मानून 1906 साली अल्लामा इक्बाल यांनी अखिल भारतीय मुस्लिम लिग पक्षाची स्थापना केली.

स्वातंतत्र्यपूर्व अखंड भारतात हिंदू बहुसंख्य होते. हिंदू व मुस्लिम हे दोन वेगवेगळे राष्ट्रसमूह असून, असा द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत महम्मद अली जिन्ना यांनी मांडला. आपला द्विराष्ट्रसिद्धांत पुढे रेटण्यासाठी त्यांनी ऑगस्ट 1946 साली कलकत्यात ‘थेट कृतीदिना’चे आयोजन केले. येथून फाळणीला बळकटी मिळाली. ही राष्ट्रे वेगळी झाली तरी अमेरिका-कॅनडा प्रमाणे यांचे हितसंबंध परस्पर-जडित असतील असा युक्तिवाद त्यांनी केला. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या नेत्यांचा या सिद्धांतास विरोध होता.

फाळणीनंतर पूर्व आणि पश्चिम असा विभागलेल्या पाकिस्तानची निर्मिती झाली. पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान असा एकूण ३,६६,१७५ चौरस मैलांचा प्रदेश पाकिस्तानकडे गेला. नंतर साधारणतः १.४५ कोटी लोकांचे स्थलांतर करण्यात आले.

जगातील हे आजपर्यंतचे सर्वात मोठे स्थलांतर ठरले.

फाळणी नंतर झालेल्या दंगली मध्ये साधारणतः १० लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. फाळणीनंतरही एक तृतीयांश मुस्लीम हे भारतातच राहीले होते.याच दरम्यान, पाकिस्तानमधील हिंदू आणि शिख हे मोठ्या संख्येने भारतात आले. तर भारतातून मोठ्या प्रमाणात मुसलमान हे पाकिस्तानात गेले. दोन्ही बाजूकडील ज्या लोकांनी पलायन केलं त्यांची संख्या ही जवळजवळ १.५ कोटी असल्याचं बोललं जात आहे.

अनेक इतिहासतज्ज्ञांचं मत आहे की, माउंटबॅटन यांनी हा निर्णय फारच घाईघाईत घेतला होता. मुस्लिमांसाठी वेगळ्या देशाच्या मागणीवरुन होणारा हिंसाचार इतका भडकला होता की, ज्यामुळे याविषयी एक सर्वमान्य कराराची चाचपणीच झाली नाही की, जो करार काँग्रेस आणि मुस्लिम लीग या दोघांना मान्य होईल.

ब्रिटिश सरकारने नेमलेल्या सिरिल रेडक्लिफ या आधिका-याने प्रत्यक्ष सरहद्द निश्चित केली. १८ जुलै १९४७ रोजी ब्रिटिश संसदेत भारताचा स्वातंत्र्याचा कायदा मंजूर झाला. यात ब्रिटिश सरकारला अंकित असलेल्या ५६५ संस्थानांना हवा तो पर्याय निवडण्याची मुभा देण्यात आली. या तरतुदीमुळे काश्मिर समस्येचा उदय झाल्‍याचे म्‍हटले जाते.

एखाद्या वाईट स्वप्नापेक्षा काही कमी नव्हतं.

आजही लोकं त्या गोष्टीच्या आठवणीनं थरारून जातात. पण आता असे फार कमी लोकं राहिले आहेत की, जे त्यावेळेस भारतातून पाकिस्तान आणि पाकिस्तातून भारतात आले होते. ब्रिटिश इंडियाची फाळणीची इतिहासातील सर्वात मोठी मानवी शोकांतिका म्हणून नोंद आहे.

यामध्ये बहुतांश ते लोकं आहे ज्याचं वय तेव्हा १० ते २० होतं. त्यांचं वय आज ८० ते ९० वर्ष आहे. जे आजही जिवंत आहेत त्यांच्यासाठी हे एखाद्या वाईट स्वप्नापेक्षा काही कमी नव्हतं. फाळणीची ती जखम आजही त्यांच्यासाठी ताजीच आहे.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.