Take a fresh look at your lifestyle.

स्टार्टअप समजून घायचे असेल तर आधी या कन्सेप्ट समजून घ्या !

- विवेक पानमंद भारतामध्ये सध्याच्या घडीला स्टार्टअप ही संकल्पना मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. सोनी टीव्हीवर आलेल्या शार्क टॅंक इंडिया या कार्यक्रमातून उद्योग व्यवसायाबद्दलच्या नव नवीन संकल्पना आपल्या सर्वांच्या कानावर पडल्या असतील. त्याबद्दलच सविस्तर माहिती

0

भारतामध्ये सध्याच्या घडीला स्टार्टअप ही संकल्पना मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. सोनी टीव्हीवर आलेल्या शार्क टॅंक इंडिया या कार्यक्रमातून उद्योग व्यवसायाबद्दलच्या नव नवीन संकल्पना आपल्या सर्वांच्या कानावर पडल्या असतील. त्याबद्दलच सविस्तर माहिती लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.

१. ग्रॉस सेल्स (एकूण विक्री)

ग्रॉस सेल्स ही उद्योगातील मूलभूत संकल्पना आहे. समजा एखाद्या कॅडबरी कंपनीने १० रुपयांच्या १,००,००० कॅडबऱ्या विकल्या. तर त्यांचा ग्रॉस सेल्स हा १०,००,००० रुपये झाला. थोडक्यात जेवढ्या वस्तूंची विक्री होईल तेवढ्या वस्तूंच्या किमतीएवढा ग्रॉस सेल्स झालेला असतो.

२. इक्विटी (अनिश्चित स्वरूपाचे व्याज)

आपण जेव्हा आपला उद्योग चालू करतो तेव्हा त्यात आपली १००% हिस्सेदारी असते. पण समजा उद्योग वाढवण्यासाठी कोणी आपल्या व्यवसायात गुंतवणूक केली तर आपण त्याला त्यामधील काही भाग हिस्सेदारी म्हणून देण्यात येतो. त्यालाच इक्विटी किंवा अनिश्चित स्वरूपाचे व्याज असेही म्हणतात.

३. व्हॅल्युएशन (मूल्यांकन)

व्हॅल्युएशन या शब्दाला आपण मराठीमध्ये मूल्यांकन असेही म्हणू शकतो. आपण एक उदाहरण घेऊया. समजा एखाद्या कंपनीला आपण आपल्या कंपनीची १०% हिस्सेदारी १,००,००० रुपयाला देऊ तेव्हा त्याचे मूल्यांकन १०,००,००० रुपये होते. कधी कधी यामध्ये कमी जास्त किंमत होऊ शकते.

४. नेट सेल्स (निव्वळ विक्री)

कंपनीच्या व्यवहारातील ग्रॉस सेल्स मधून काही गोष्टी काढल्या की नेट सेल्स उरतो. समजा एका वर्षात आपण १०,००,००० रुपयांचा उद्योग केलेला असेल पण त्यामध्ये १,००,००० रुपये डिस्काउंट, १,००,००० रुपये प्रोडक्ट रिफंड आणि १,००,००० रुपये कर्मचारी भात्यावर खर्च झालेले असतील तर नेट सेल्स (निव्वळ विक्री) ७,००,००० रुपयांचा झाली असे समजावे.

५. रेव्हेन्यू (उत्पन्न)

कंपनीने वेग वेगळ्या माध्यमातून एकूण जेवढे उत्पन्न जमा केले आहे त्यालाच त्या कंपनीचे रेव्हेन्यू (उत्पन्न) असेही म्हटले जाते. निव्वळ विक्री, सेवांमधून मिळालेले उत्पन्न आणि गुंतवलेली एकूण रक्कम यांची एकूण बेरीज केल्यावर रेव्हेन्यू म्हणजेच उत्पन्न मिळते.

६. नेट रेव्हेन्यू (निव्वळ उत्पन्न)

आपण वर्षभरात जेवढे उत्पन्न मिळवले आहे त्यातून खर्च, सवलत आणि उत्पादनावरच्या खर्चाची वजाबाकी केली की नेट रेव्हेन्यू म्हणजेच निव्वळ उत्पन्न बाकी राहते.

७) प्री रेव्हेन्यू (उद्योगापूर्वीचे नफा आकलन)

आपण जेव्हा एखादा उद्योग, व्यवसाय सुरु करतो तेव्हा त्यातून किती फायदा मिळू शकतो याचा आपण अंदाज लावत असतो. त्यालाच प्री रेव्हेन्यू म्हणजेच उद्योगापूर्वी नफ्याचे केलेले आकलन म्हणतात.

८) मार्जिन (नफा)

आपण एखादी वस्तू १० रुपयाला विकतो. मार्जिन म्हणजे जेव्हा आपल्याला एखादी वस्तू बनवण्यासाठी कच्चा माल, कामगार आणि इतर खर्चासाठी ५ रुपये लागतात तेव्हा आपले मार्जिन म्हणजेच नफा ५ रुपये राहत असतो.

९) ओव्हरहेड

ओव्हरहेड म्हणजे असा हिशोब ज्याचा संबंध प्रॉडक्शनच्या खर्चात समाविष्ट होत नाही. ओव्हरहेड म्हणजे इंश्युरन्स, दुकानाचे किंवा गोदामाचे भाडे किंवा कायदेशीर येणाऱ्या खर्चाला ओव्हरहेड असेही म्हटले जाते.

१०) रॉयल्टी (मानधन)

जेव्हा दुसऱ्या एखाद्या कंपनीचे पेटंट, कॉपीराईट किंवा ट्रेडमार्क असणारी वस्तू दुसऱ्या कंपनीला विकली जाते तेव्हा त्या वस्तूच्या मूळ किमतीतील काही पैसे मूळ कंपनीला द्यावे लागतात. यालाच त्या वस्तूची रॉयल्टी किंवा मूळ मालकाला दिले जाणारे मानधन म्हणतात.

११) स्केलेबिलिटी

स्केलिबिलिटी म्हणजे आपण सुरु करत असलेला उद्योग व्यवसाय भविष्यात जाऊन किती वाढू शकतो. मार्केटमध्ये कोणत्या वस्तूची गरज आहे, त्या वस्तूचा नफा तोटा किती होईल यावरच त्या उद्योगाची स्केलेबिलिटी ठरवली जात असते.

१२) परचेस ऑर्डर

आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीकडून ठरवून दिलेल्या किमतीत एखादी वस्तू मोठ्या संख्येने खरेदी करतो त्यालाच बाजाराच्या भाषेत परचेस ऑर्डर म्हटले जाते.

१३) पेटंट

जेव्हा आपण एखाद्या नवीन गोष्टीचा शोध लावतो तेव्हा त्या गोष्टीवर फक्त शोध लावणाऱ्याचा हक्क म्हणजेच पेटंट असते. पेटंट असणाऱ्या व्यक्तीच्या परवानगीशिवाय कोणीही त्या गोष्टीचा वापर करू शकत नाही.

१४) ट्रेडमार्क (व्यापाराची निशाणी)

अँपल कंपनीचा अर्धा सफरचंद आणि मॅकडोनाल्ड कंपनीचे आय एम लव्हइन इट हे घोषवाक्य या कंपन्यांचे ट्रेडमार्क आहेत. जेव्हा एखाद्या कंपनीच्या वस्तूवर वर्तुळात T काढलेला असतो तेव्हा ते ट्रेडमार्कचेच चिन्ह असते.

१५) कॉपीराईट (हक्काचा कायदा)

कॉपीराईट म्हणजे एखाद्या वस्तूची कॉपी करण्याचा हक्क फक्त त्या संबंधित कंपनीलाच असतो. कंपनी उत्पादनांच्या व्यतिरिक्त ट्रेडमार्कचा वापर पुस्तके, चित्रपट, छायाचित्र आणि गाण्यांसाठी करते.

१६) पर्पेच्युइटी (शाश्वतता)

समजा एखाद्या पुस्तकाची प्रकाशकाद्वारे विक्री केली आणि प्रति पुस्तकामागे लेखकाला ५० रुपये देण्याचे प्रकाशकाने कबूल केले. तेव्हा त्या पुस्तकाची जोपर्यंत विक्री होत राहील तोपर्यंत लेखकाला ५० रुपये मिळत राहतील. यालाच पर्पेच्युइटी म्हणजेच शाश्वतता म्हणतात.

१७) कस्टमर एक्विझिशन कॉस्ट (ग्राहक संपादन खर्च)

जेव्हा एखाद्या कंपनीला ग्राहक वाढवायचे असतात तेव्हा ते जाहिरातींवर खर्च करतात. थोडक्यात १०,००० रुपये आपण वास्तूच्या जाहिरातीवर खर्च केले आणि आपल्याला त्यातून १०० ग्राहक मिळाले. तेव्हा कस्टमर एक्विझिशन कॉस्ट म्हणजेच ग्राहक संपादन खर्च १०० रुपये प्रति ग्राहक येतो.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.