Take a fresh look at your lifestyle.

नथुराम गोडसे यांच्यासोबत आणखी एका व्यक्तीला फाशीची शिक्षा देण्यात आली

महात्मा गांधी यांच्या हत्येचा जेव्हाही विषय येतो तेव्हा प्रत्येकाच्या तोंडात एकच नाव आणि डोळ्यांसमोर एक चेहरा येतो तो म्हणजे नथुराम गोडसे यांचा. पण या प्रकरणात आणखी एका व्यक्तीला फाशीची शिक्षा देण्यात आली होती.

0

यंदाच्या १५ ऑगस्टला देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर देशभर “आझादी का अमृत महोत्सव” साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने देशाच्या जडणीघडणीतल्या काही प्रमुख घटनांचा आढावा आम्ही घेत आहोत.

तुम्ही आझादी का अमृत महोत्सव यावर क्लिक करून या घटना वाचू शकता.

महात्मा गांधी यांच्या हत्येचा जेव्हाही विषय येतो तेव्हा प्रत्येकाच्या तोंडात एकच नाव आणि डोळ्यांसमोर एक चेहरा येतो तो म्हणजे नथुराम गोडसे यांचा. पण या प्रकरणात आणखी एका व्यक्तीला फाशीची शिक्षा देण्यात आली होती.

कशी झाली होती गांधी हत्या ?

महात्मा गांधी जेव्हा 30 जानेवारी 1948च्या सायंकाळी 5 वाजून 17 मिनिटांवर दिल्लीमध्ये स्थित बिडला भवनात सायंकाळची प्रार्थना करण्यासाठी जात असताना सर्वात आधी नथुराम गोडसेंनी त्यांच्या पायावर गोळी झाडली. त्यानंतर गांधींसोबत असलेल्या महिलेला बाजूला केलं आणि सेमी ऑटोमेटिक पिस्तूलने एकामागोमाग 3 गोळ्या झाडून त्यांची हत्या केली.

9 आरोपींपैकी एकाची न्यायालयाने मुक्तता केली होती

गांधींच्या हत्या प्रकरणामध्ये 10 फेब्रुवारी 1949च्या दिवशी विशेष न्यायालयाने सजा सुनावली होती. या हत्याकांडामध्ये 9 आरोपींपैकी एकाची न्यायालयाने मुक्तता केली होती. न्यायालयाने विनायक दामोदर सावरकरांची पुराव्यांअभावी मुक्तता केली होती. 8 आरोपींनी गांधींच्या हत्या, हत्येचा कट आणि हिंसाचाराच्या आरोपाखाली शिक्षा सुनावण्यात आली होती.

नथुराम गोडसे यांच्याप्रमाणे या प्रकरणात आणखी एका व्यक्तीला फाशीची शिक्षा देण्यात आली होती. त्यांचं नाव आहे नारायण आपटे. आपटे हे हिंदू महासभेचे कार्यकर्ते होते आणि गोडसे यांच्याप्रमाणेच त्यांना 15 नोव्हेंबर 1949 रोजी अंबाला तुरूंगात फाशी देण्यात आली.

6 आरोपींना आजीवन कारावास सुनावण्यात आला

आपटे 1939 मध्ये हिंदू महासभेत सामील झाले. 22 जुलै 1944 रोजी पाचगणी येथे त्यांनी महात्मा गांधींच्या विरोधात निदर्शने केली. 1948 मध्ये त्यांनी कट रचून गांधींची हत्या केली. 2 आरोपींना म्हणजे नथुराम गोडसे आणि नारायण आपटे यांना या प्रकरणात फाशी देण्यात आली होती तर इतर 6 आरोपींना आजीवन कारावास सुनावण्यात आला होता.

कोण होता नारायण आपटे ?

नारायण आपटे यांचा जन्म 1911 मध्ये झाला. बॉम्बे युनिव्हर्सिटीमधून सायन्सची पदवी घेतल्यानंतर त्यांनी सर्व प्रकारची कामे केली. 1932 मध्ये त्यांनी अहमदनगरमध्ये शिक्षक म्हणून काम करण्यास सुरवात केली. आपटे हे हिंदू महासभेचे कार्यकर्ते होते.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.