Take a fresh look at your lifestyle.

स्वतंत्र भारतातील पहिलं गोल्ड मेडल कस मिळालं ?

भारताने आतापर्यंत सर्वाधिक 8 गोल्ड मेडल जिंकली आहेत. 1928 ते 1956 दरम्यान भारतीय हॉकी टीमने एकही मॅच न गमावता सहाच्या सहा ऑलिम्पिक गोल्ड पटकावली.

0

यंदाच्या १५ ऑगस्टला देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर देशभर “आझादी का अमृत महोत्सव” साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने देशाच्या जडणीघडणीतल्या काही प्रमुख घटनांचा आढावा आम्ही घेत आहोत.

 

15 ऑगस्ट 1947 रोजी दिल्लीतील लाल किल्ल्यावर पहिल्यांदा ध्वज फडकवण्यात आला, तेव्हा येणाऱ्या काळात देशाची एवढी प्रगती होईल, याची कोणी कल्पनाही केली नव्हती. ब्रिटीशांपासन भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली आहेत. भारताने क्रीडा जगतात अनेक यश मिळवले आहे. देशासमोर आजही क्रीडा क्षेत्रातील अशा अनेक आठवणी आहेत ज्या कधीच विसरता येणार नाहीत.

ही घटना आहे 1948 ची. भारत पहिल्यांदाच स्वतंत्र झाला होता. गुलामीच्या बेड्या गळून पडल्या होत्या. पहिल्यांदाच भारत तिरंगा ध्वजाखाली ऑलिम्पिकच्या मैदानात उतरला होता. हा भारतीय संघ होता हॉकीचा.

हॉकी हा आपला राष्ट्रीय खेळ आहे. याच हॉकी मध्ये भारताने तीन ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. मात्र, त्या वेळी देश स्वतंत्र नव्हता. मात्र 1948 मध्ये भारतीय हॉकी संघाने प्रथमच आपला दबदबा सिद्ध केला.

भारतीय हॉकी टीम ही ऑलिम्पिक स्पर्धांच्या इतिहासातील सगळ्यात यशस्वी टीम आहे.

भारताने आतापर्यंत सर्वाधिक 8 गोल्ड मेडल जिंकली आहेत. 1928 ते 1956 दरम्यान भारतीय हॉकी टीमने एकही मॅच न गमावता सहाच्या सहा ऑलिम्पिक गोल्ड पटकावली. आणि ऑलिम्पिकपर्यंत पोहोचण्यासाठी त्या काळी टीमने कधी कधी चक्क दीड महिना बोटीने प्रवास केलाय.

प्रवासाचा अतिरिक्त खर्च टाटांनी उचलला

लंडन ऑलिम्पिकसाठी संघनिवडीमागेही एक विशेष कहाणी दडलेली आहे. कारण अखंड भारतासाठी खेळणारे नियाज खान, अजीज मलिक, अली शाह दारा आणि शाहरूख मोहम्मदसारखे खेळाडू आता पाकिस्तानच्या संघात सहभागी झाले होते.

मेजर ध्यानचंद यांच्या कार्यकाळात ऑलिम्पिक खेळण्यासाठी संघाला समुद्रमार्गे जहाजाने हा लांब पल्ल्याचा प्रवास करावा लागायचा. मात्र, किशन लाल यांच्या नेतृत्वाखालील संघाने स्वातंत्र्यानंतर लंडन ऑलिम्पिकचा प्रवास विमानाने केला. या प्रवासाचा अतिरिक्त खर्च टाटांनी उचलला होता.

4-0 असा धुव्वा उडवत सुवर्णपदकावर मोहोर

१५ ऑगस्ट 1947 रोजी भारत इंग्रजाच्या गुलामीतून मुक्त झाला. विशेष म्हणजे वर्षभरानंतर 12 ऑगस्ट 1948 रोजी ब्रिटिशांच्याच भूमीवर ऑलिम्पिकच्या महायुद्धात भारताने दोन हात केले. गुलामीची जोखडं झुगारून भारत खंबीरपणे उभा राहिलाच नाही, तर दीर्घकाळ सत्ता गाजवणाऱ्या ब्रिटनलाही चारीमुंड्या चीत केले.ब्रिटनचा 4-0 असा धुव्वा उडवत सुवर्णपदकावर मोहोर उमटवली.

एवढे एकच पदक आले होते

संघात केडी सिंह बाबू, केशव दत्त, लेस्ली क्लाउडियससारखे दिग्गज खेळाडू होते.1948 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताच्या झोळीत एवढेच एक पदक आले होते. इतर क्रीडा प्रकारांत मात्र त्याकाळी भारताचे हात रिकामेच राहिले.त्यानंतरच्या पुढच्या दोन्ही ऑलिम्पिकमध्येही भारताने सुवर्णपदक जिंकले.

स्वतंत्र भारताचं नाव जगभर पसरवण्याची भावना मनात होती आणि त्यातून हॉकीपटूंना बळ मिळत होतं. हॉकीतला सर्वाधिक गोल्ड मिळवण्याचा रेकॉर्ड अजूनही भारताच्या नावावर आहे. भारताने तब्बल आठ ऑलिम्पिक गोल्ड आतापर्यंत मिळवलीत. त्या खालोखाल जर्मनीने चार गोल्ड मिळवलीत.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.