Take a fresh look at your lifestyle.

“मंकीगेट प्रकरणानंच आपलं करीयर संपलं” अँड्र्यू सायमंड्सनं एका मुलाखतीत कबूल केलं होतं

मंकीगेट प्रकरणात क्रिकेट ऑस्ट्रेलिया सायमंड्सच्या पाठीशी उभं राहिलं नाही, त्याला खलनायक म्हणून दाखवण्यात आलं, असं तत्कालीन कर्णधार रिकी पॉन्टिंगने आपल्या आत्मचरित्रात म्हटलं होतं.

0

क्वीन्सलँड शहरापासून जवळपास ५० किमी अंतरावर पश्चिमेला हर्वे रेंज येथे रात्री अंदाजे १०.३० वाजता एक अपघात झाला. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपास वेगात असलेली कार रस्त्यावरच उलटून पडली.

या कारमध्ये माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्स होता.

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्स याचं निधन झालं. अँड्र्यू सायमंड्सच्या कारचा शनिवारी रात्री टाऊन्सव्हिले येथे अपघातात झाला. गंभीर जखमी झालेल्या सायमंड्सला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले गेले, मात्र यश आलं नाही. आणि अँड्र्यू सायमंडचा दुर्दैवी मृत्यू झाला.

बॅटिंग करताना राक्षसासारखा दिसणारा हा प्राणी आपल्या किती पिढ्यांचा बदला घेतोय असं वाटायचं. आडदांड शरीर, झिंक लावून रंगवलेले पांढरे ओठ, भीती वाटावी असे घारे डोळे, आणि कुरळ्या केसांच्या बांधलेल्या त्या अगणित बटा.

त्याला बघूनच अनेकांना घाम फुटायचा. सायमंड्स होताही तसाच आक्रमक. स्लेझिंग करुन प्रतिस्पर्धी खेळाडूंना डिवचण्याची ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या परंपरेत सायमंड सगळ्यात पुढे होता.

कोण होता अँड्र्यू सायमंड्स

अफ्रिकन-कॅरेबियन परिवारात जन्मलेल्या अँड्रयूला 15 महिन्यांचा असताना युरोपातल्या एका दाम्पत्यानं दत्तक म्हणून घेतलं. नंतर ते ऑस्ट्रेेलियात स्थायिक झाले. आफ्रिका आणि युरोप खंडाशी जन्मानं नातं असल्यानं सायमंड्सला इंग्लंंडच्या ज्युनियर टीमकडून खेळण्याची ऑफर आली.

पण अँड्र्यूनं ती नाकारली. ऑस्ट्रेलियाशी त्याचं हे देशप्रेमाचं नातं जोडलं ते कायमचंच.

सायमंड्सने १९९८ साली ऑस्ट्रेलियाकडून वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. त्याने १९८ वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ५०८८ धावा केल्या असून १३३ विकेट्स घेतल्या आहेत. वनडेत त्याच्या नावावर ६ शतके आणि ३० अर्धशतके आहेत.

त्याचबरोबर त्याने १४ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले, ज्यात त्याने २ अर्धशतकांसह ३३७ धावा केल्या आणि ८ विकेट्स घेतल्या आहेत. २००४ मध्ये कसोटी आणि २००५ मध्ये आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण झाले. त्याने २६ कसोटी सामने खेळले असून १४६२ धावा केल्या, तसेच २४ विकेट्स घेतल्या. त्याने कसोटीत २ शतके आणि १० अर्धशतके केली.

अनेकदा त्याने त्याच्या अष्टपैलू कामगिरीने ऑस्ट्रेलियाला अनेक सामने जिंकून दिले आहेत. तो २००३ सालच्या आणि २००७ सालच्या विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाचा भाग होता. तो ९३ टी२० सामने देखील खेळला, ज्यात त्याने २१४१ धावा केल्या आणि ५२ विकेट्स घेतल्या.

तो आयपीएलमध्ये डेक्कन चार्जर्स आणि मुंबई इंडियन्सकडूनही खेळला. त्याने आयपीएलमध्ये ३९ सामने खेळताना ९७४ धावा केल्या आणि २० विकेट्स घेतल्या आहेत. त्याने त्याच्या कारकिर्दीत २२७ प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळले. त्यात त्याने १४४७७ धावा केल्या, तसेच २४२ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने ४२४ अ दर्जाचे सामने खेळले, ज्यात त्याने ११०९९ धावा केल्या आणि २८२ विकेट्स घेतल्या.

काय होत मंकीगेट प्रकरण ?

सायमंड्सचं नाव निघालं की मंकीगेट प्रकरण प्रकर्षाने आठवतं. 2012 मध्ये भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तो प्रकार घडला होता. सिडनी कसोटीदरम्यान ऑस्ट्रेलियाची अवस्था 119/4 अशी होती. सायमंड्सने संकटमोचकाची भूमिका पार पाडत शतक केलं.

सामना संपल्यानंतर हरभजन सिंगला सायमंड्सला वर्णभेदी टिप्पणी केल्याप्रकरणी तीन सामन्यांच्या बंदीची शिक्षा देण्यात आली. हरभजन सायमंड्सला ‘मंकी’ म्हणाला अशी तक्रार करण्यात आली होती. ते प्रकरण चिघळलं.

हरभजनवरची शिक्षा रद्द होत नाही तोवर पुढची कसोटी खेळणार नाही, असं भारतीय संघाने स्पष्ट केलं. दौरा अर्धवट सोडण्याचाही इशारा दिला.

एका तटस्थ आयोगापुढे याप्रकरणाचा निवाडा झाला. हरभजनने हिंदीत उद्गार काढल्याचं स्पष्ट झालं. वर्णभेदी उद्गार नसल्याचं सिद्ध झाल्याने त्याच्यावरची बंदी उठवण्यात आली आणि त्याच्या मानधनातून 50 टक्के रक्कम कापून घेण्यात आली.

मंकीगेट प्रकरणात क्रिकेट ऑस्ट्रेलिया सायमंड्सच्या पाठीशी उभं राहिलं नाही, त्याला खलनायक म्हणून दाखवण्यात आलं, असं तत्कालीन कर्णधार रिकी पॉन्टिंगने आपल्या आत्मचरित्रात म्हटलं होतं.

याप्रकरणाने सायमंड्सची कारकीर्द झाकोळून गेली. याआधी त्याचं मैदानावरचं कर्तृत्व बाजूलाच पडलं. मंकीगेट प्रकरणाने सायमंड्सची कारकीर्द भरकटली, ती पुन्हा रुळावर आलीच नाही. काही काळानंतर हरभजन आणि सायमंड्स आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघासाठी एकत्र खेळले.

आपली वेगळी शैली निर्माण केली

अँड्र्यू सायमंड्स मनाचा वाईट नव्हता. आयपीएलचं पर्व सुरू झाल्यावर तो मुंबई इंडियन्सशी जोडला गेला. तेव्हा हरभजनसोबत कुठलाही आकस न बाळगता त्यानं काम केलं. अक्षय कुमारच्या पटियाला हाऊस सिनेमातही तो दिसला. बिग बॉसच्या घरातही राहून आला.

नंतर कॉमन्टेटर म्हणूनहूी त्यानं आपली वेगळी शैली निर्माण केली. जो विचित्र केशसांभार त्याची ओळख होता. त्या केसांना कापत लाईव्ह टेलिव्हिजनवर टक्कल करून ल्युकेमिया आजारग्रस्तांसाठी 10 हजार डॉलर्स उभारणारा सायमंड्सही जगानं पाहिला आहे.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.