Take a fresh look at your lifestyle.

राष्ट्रपती भवनात आरामदायक पलंग काढून एक लाकडी खुर्ची वापरणारे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांची गोष्ट

देशाचे पहिले राष्ट्रपती असलेले राजेंद्र प्रसाद हे एकमेव राष्ट्रपती आहेत, ज्यांनी सलग दोन कार्यकाल पूर्ण केले आहेत.

0

1947 साली भारत इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. तर, स्वातंत्र्याच्या तीन वर्षांनी म्हणजेच 26 जानेवारी 1950 रोजी, देश ‘सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक म्हणून ओळखला जाऊ लागला. 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटना अंमलात आल्यानंतर राज्याचे पहिले घटनात्मक प्रमुख, भारताचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद हे होते.

एखाद्या महाराजाप्रमाणे घोडागाडीत बसून आले

प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीतील राजपथावर होणारे संचलन हा सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण असतो. १९५५साली हे संचलन सुरू झाले. भारताचा पहिला प्रजासत्ताक सोहळा आजच्यापेक्षा खूपच वेगळा होता.

या सोहळ्याच्या काही क्षण आधीच डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर तत्कालीन गव्हर्नर सी. राजगोपालाचारी यांनी भारताला प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित केले होते. आताचे राष्ट्रपती बुलेटप्रूफ कारमधून आपल्या ताफ्यासह राजपथावर येतात. मात्र, पहिल्या प्रजासत्ताक दिनी डॉ. राजेंद्र प्रसाद एखाद्या महाराजाप्रमाणे घोडागाडीत बसून आले होते.

आरामदायक पलंग काढून एक लाकडी खुर्ची बसविली

राजेंद्र बाबू राष्ट्रपती भवनात गेले असता तेथील ऐश्वर्य पाहून त्यांना धक्का बसला. “हा पलंग तूपाने भरलेल्या डब्यासारखा आहे. जर आपण डब्यात एक वाटी सोडली तर तो न ढवळता तळाशी पोचतो. पलंगावर झोपलेल्या व्यक्तीचेही असेच काही होईल.”

त्यानंतर त्यांनी आरामदायक पलंग काढून एक लाकडी खुर्ची बसविली. तेथेच ते बारा वर्षे झोपले. त्यांची नम्रता फारच साधी व सरळ होती.

निवडणुकीत राजेंद्र प्रसाद विजयी झाले

1952 मध्ये झालेल्या पहिल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत देशात पाच उमेदवार होते, त्यापैकी शेवटच्या उमेदवाराला केवळ 533 मते मिळाली होती. या निवडणुकीत राजेंद्र प्रसाद विजयी झाले. 1957 च्या दुसऱ्या निवडणुकीत तीन उमेदवार होते. ही निवडणूकही प्रसाद यांनी जिंकली होती.

देशाचे पहिले राष्ट्रपती असलेले राजेंद्र प्रसाद हे एकमेव राष्ट्रपती आहेत, ज्यांनी सलग दोन कार्यकाल पूर्ण केले आहेत.

सर्वाधिक काळ पदावर राहण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे. त्यांनी 26 जानेवारी 1950 रोजी पदभार स्वीकारला आणि 12 वर्षे 107 दिवस म्हणजे 13 मे 1962 पर्यंत ते राष्ट्रपती होते.

कोण होते राजेंद्र प्रसाद ?

राजेंद्र प्रसाद जन्म ३ डिसेंबर १८८४ रोजी बिहारच्या सारण जिल्ह्यातील जीरादेई नावाच्या खेड्यात झाला होता. त्यांचे वडील श्री. महादेव सहाय एक जमीनदार होते. राजेंद्र प्रसाद हे त्यांच्या पालकांचे पाचवे आणि सर्वात धाकटे पुत्र होते.१८९३ मध्ये ते छपरा येथील शाळेत दाखल झाले. १९०२ मध्ये ते कलकत्ता विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षेत प्रथम आले. हे यश प्रथम मिळवणारे ते पहिले बिहारी विद्यार्थी होते. १९०६ मध्ये त्यांनी बी.ए.ची परीक्षा उत्तीर्ण केली. एम.ए.च्या परीक्षेत त्यांनी सर्वोच्च स्थान पटकावले. त्यांनी वकिलीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली.

लवकरच त्यांनी हायकोर्टाचे वकील म्हणून प्रसिद्धी मिळविली. एक वकील म्हणून त्यांचे निर्मळ चरित्र आणि प्रामाणिकपणा पाहून सर्वजण चकित व्हायचे. वकिली सुरू करण्यापूर्वी त्यांनी काही काळ मुझफ्फरपूरमधील महाविद्यालयात अध्यापन सुरू केले. १९३५ च्या बिहारच्या भूकंपात त्यांनी केलेल्या सहकार्याला कोण विसरु शकेल!

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.