Take a fresh look at your lifestyle.

देशातल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीसाठी ४ महिने मतदान चाललं होतं

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोकशाही पद्धतीनं सरकार स्थापन करण्यासाठी 1951 साली भारतात पहिल्यांदा निवडणूक घेण्यात आली.

0

जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारताची ओळख आहे. “लोकांनी, लोकांच्यासाठी, लोकांच्या मदतीने चालवलेली व्यवस्था म्हणजे लोकशाही.” लोकशाही जगवायची असेल तर जास्तीत जास्त लोकांनी मतदानात सहभाग घेणं महत्त्वाचं असतं.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोकशाही पद्धतीनं सरकार स्थापन करण्यासाठी 1951 साली भारतात पहिल्यांदा निवडणूक घेण्यात आली.

निवडणूक तब्बल 68 टप्प्यांमध्ये घेण्यात आली

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू झाले. पहिले राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्र प्रसाद यांची निवड झाली. पण प्रत्यक्ष पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या 1952 मध्ये. म्हणजे लोकसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाची सुरुवात झाली होती 25 ऑक्टोबर 1951 या दिवशी, पण मतदानाचा शेवटचा टप्पा संपला 21 फेब्रुवारी 1951 रोजी.

पहिली सार्वत्रिक निवडणूक तब्बल 68 टप्प्यांमध्ये घेण्यात आली. ती निवडणूक कशी झाली असेल? त्या निवडणुकीसाठी प्रचार कसा केला असेल? जाणून घेऊयात

1951 साली पहिली लोकसभा निवडणूक झाली. त्या निवडणुकीत एकूण देशातील 54 राजकीय पक्ष सहभागी झाले होते. देशभरात 1 हजार 874 उमेदवार निवडणुकीसाठी उभे होते.1951 साली भारतात आतासारखं सोशल मीडिया, टीव्ही किंवा जाहिरातींचा सुळसुळाटही नव्हता. त्याकाळात ईव्हीएमसारख तंत्रज्ञानही नव्हतं. त्यामुळे प्रचारसभा, वृत्तपत्र, फलक, पत्रक, आणि प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रचार होत असे.

१९४७ साली भारत स्वतंत्र झाल्यानंतर दोन वर्षांनी १९४९ मध्ये पहिला निवडणूक आयोग स्थापन करण्यात आला होता.

या निवडणूक आयोगाचे पहिले आयुक्त म्हणून सुकुमार सेन यांची निवड करण्यात आली होती. पण या निवडणुकीत सर्वाधिक आव्हान हे सुकुमार सेन यांच्यासमोर होते. कारण ही देशाची पहिली निवडणूक होतीच पण, यासोबत देशातील तब्बल ८५ % लोकांना लिहिता वाचता येत नव्हते.

त्यामुळे या सर्व मतदारांची नोंदणी करणे ही निवडणुक घेण्याची पहिली पायरी होती. त्या काळात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट अर्थातच नव्हते. निवडणुकीची प्रक्रिया नीट पूर्ण व्हावी यासाठी निवडणूक अधिकारी देखील निवडायचे होते. 1951-52 बॅलेट पेपरचा वापर करण्यात आला होता. मतपत्रिका व मतपेटीत टाकण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रांवर वेगवेगळे बॉक्स ठेवण्य़ात आले होते. कोणत्याही बॉक्समध्ये मत टाकण्याचं स्वातंत्र्य मतदाराला देण्यात आलं होतं.

मतदानासाठी मतपेट्या तयार करायच्या होत्या

प्रत्येक पक्षाचे निवडणूक चिन्ह तयार करणे, मतपत्रिका आणि मोठ्या प्रमाणावर मतदानासाठी मतपेट्या तयार करायच्या होत्या. यासोबत देशात जास्तीत जास्त प्रमाणावर लोकांना येता येईल अशी निवडणूक केंद्रे उभा करायची होती. कोणत्याही उमेदवाराला मतं देण्याचं स्वातंत्र्य पहिल्या निवडणुकीत देण्यात आलं होतं. मतदाराला कोणत्याही मतदान केंद्रावर आपलं मत बॉक्समध्ये टाकण्याचं स्वातंत्र्य होतं. 1951-52 साली प्रत्येक मतदान केंद्रांसाठी स्वतंत्र बॅलेट पेपर बॉक्सची सुविधा उपलब्ध होती.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.