Take a fresh look at your lifestyle.

विधानभवनाच्या शिपायाने जेव्हा शरद पवारांना विधानभवनातून बाहेर काढले होते

देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात गेली पाच दशकाहून अधिकचा काळ त्यांनी सामाजिक आणि राजकीय जीवनात घालवला आहे. त्यामुळे शरद पवार यांचे किस्से, त्यांच्या आठवणी तुम्हा-आम्हाला नवीन नाहीत. आजवर त्यांचे हजारो किस्से तुम्ही ऐकले, वाचले असतील पण तुम्हाला माहित नसलेले त्यांचे असे तीन किस्से

0

शरद पवार हे नाव माहित नाही असा व्यक्ती सापडणार नाही. देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात गेली पाच दशकाहून अधिकचा काळ त्यांनी सामाजिक आणि राजकीय जीवनात घालवला आहे. त्यामुळे शरद पवार यांचे किस्से, त्यांच्या आठवणी तुम्हा-आम्हाला नवीन नाहीत.

आजवर त्यांचे हजारो किस्से तुम्ही ऐकले, वाचले असतील पण तुम्हाला माहित नसलेले त्यांचे असे तीन किस्से

पहिला किस्सा

विधानभवनाच्या शिपायाने जेव्हा पवारांना विधानभवनातून बाहेर काढले होते

आपल्या संसदीय कारकिर्दीमध्ये लोकसभा, विधानसभा, विधानपरिषद आणि विधानसभा अशा चारही सभागृहात ज्यांनी सदस्य म्हणून जाता आलं अशा मोजक्या व्यक्तीमध्ये शरद पवार यांचा समावेश आहे. पण याच शरद पवार यांना विधानभवनातील शिपायाने बाहेर काढले होते, त्याचाच हा किस्सा.

स्वतः शरद पवार यांनी महाराष्ट्र विधानभवनाने प्रकाशित केलेल्या स्मृतिगंध या स्मरणिकेत हा किस्सा लिहला होता.

सक्रिय राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी शरद पवार पुण्यातील BMCC कॉलेजमध्ये शिकत होते, त्यावेळी आपल्या मित्रासोबत विधानसभेचे अधिवेशन पाहण्यासाठी ते मुंबईला गेले होते. विधानभवनाच्या अधिवेशनावेळी प्रेक्षक गॅलरीमध्ये बसून ते अधिवेशन पाहत होते. त्याच वेळी ऐकता ऐकता ते आपल्या पायावर पाय ठेवून बसले. ते पाहून विधानभवनाचा शिपाई त्यांच्याकडे आला. त्यांना म्हणाला, विधानभवनात पायावर पाय ठेवून असं बसता येत नाही.

शिपाई सांगून गेल्यांनतर पवार थोडा वेळ नीट बसले पण काही वेळांनंतर अधिवेशन ऐकता ऐकता ते पुन्हा नकळतपणे पायावर पाय ठेवून बसले. त्यावेळी तो शिपाई पुन्हा त्यांच्याकडे आला आणि त्याने त्यांना गॅलरीतून बाहेर जायला सांगितले. पवारांनी त्याला आपल्याकडून हि गोष्ट नकळतपणे झाल्याचे सांगितले पण शिपायाने मात्र हे ऐकलं नाही. त्याने त्यांना प्रेक्षक गॅलरीतून बाहेर काढले.

शरद पवार त्यावेळी विधानभवनातून बाहेर पडले आणि त्यावेळी त्यांनी निर्णय केला. यापुढे सभागृहात आलो तर येईल तो प्रेक्षक गॅलरीमध्ये बसण्यासाठी नाही तर आमदार म्हणून सभागृहात बसण्यासाठी आणि पवारांनी आपला निर्णय सार्थ ठरवत आमदार म्हणून विधानभवनात प्रवेश केला.

दुसरा किस्सा

सरांनी शर्ट ओढून भाषण थांबवायला लावलं होत

५० हुन अधिक वर्ष सामाजिक जीवनात घालवल्यामुळे पवारांनी आजवर हजारो भाषण केली आहेत. पण त्यांच्या एका भाषणावेळी त्यांच्या सरांनी त्यांना शर्ट ओढून खाली बसायला सांगितलं होत. त्याचाच हा किस्सा

२०१७ मध्ये काटेवाडी या त्यांच्या गावात बोलताना त्यांनी त्यांच्या या पहिल्या भाषणाचा किस्सा सांगितला होता.

इयत्ता दुसरीमध्ये असताना शरद पवार यांनी पहिल्यांदा भाषण केलं होत. या भाषणावेळी त्यांना वेळ दिला होता सहा मिनिटांचा पण शरद पवार यांनी भाषण सुरु केले आणि ते नॉनस्टॉप बोलू लागले. सहा मिनिट होऊन गेली तरी पवार काही थांबेनात.

वेळ संपल्याचा अलार्म वाजला. एकदा… दोनदा… तीनदा… तीन वेळा अलार्म वाजला तरी शरद पवार थांबले नाहीत. मग मात्र त्यांच्या शाळेतील सरांनी मागून शर्ट ओढून त्यांना खाली बसवलं. मग मात्र त्यांच भाषण थांबलं.

पण हेच शरद पवार पुढे जाऊन राजकारणात आले आणि त्यांनी आपल्या भाषणांनी, आपल्या कामांनी स्वतःची ओळख निर्माण केली.

तिसरा किस्सा

टेम्पोच्या ड्रायव्हरसीटवर शरद पवार बसतात तेव्हा

शरद पवार यांनी देशातील अनेक महत्वाची पदे भूषवली. अगदी मुख्यमंत्री विरोधी पक्षापासून केंद्रीय मंत्र्यापर्यंत त्यांनी सर्व खाती त्यांनी व्यवस्थित चालवली. पण एक ओल्या दुष्काळाची पाहणी करण्यासाठी शरद पवार टेम्पोच्या ड्रायव्हर सीटवर बसले होते, त्याचाच हा किस्सा

जेष्ठ लेखक सुधीर भोंगळे यांनी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या निवडक भाषणांचे ‘नेमकचि बोलणे’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात हा किस्सा सांगितला होता.

शरद पवार राज्याचे विरोधी पक्षनेते होते. पुण्यातील पेरणे, वाडेबोल्हाई परिसरात मोठी गारपीट झाली होती. त्याची पाहणी करायला शरद पवार जाणार होते. शरद पवार त्या परिसरात गेले. पण जेव्हा त्या डोंगराळ भागात गेले तेव्हा त्यांना सांगण्यात आलं कि त्या भागात त्यांची गाडी जाणार नाही.

तेव्हा तिथे असलेल्या एका टेम्पो मध्ये बसून पाहणी करायला जायचा निर्णय झाला. पण यावेळी शरद पवार स्वतः टेम्पोच्या ड्रायव्हिंग सीटवर बसले आणि सगळे लोक नुकसान झालेल्या भागात पोहचले. गारपिटीमुळे अनेक शेळ्या-मेंढ्या मरण पावली होत्या. पवारांनी ती परिस्थिती पहिली आणि शासनदरबारी त्या शेतकऱ्यांना योग्य ती मदत मिळण्यासाठी प्रयत्न केले.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.