Take a fresh look at your lifestyle.

सुशीलकुमार शिंदेंच्या पहिल्या निवडणुकीला पवारांनी पैसे दिले होते.

0

काही दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यात एक लोकार्पण सोहळा पार पडला होता. त्या सोहळ्यास राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व कॉंग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे उपस्थित होते. त्यावेळी शरद पवारांविषयी बोलताना शिंदे आज चांगलेच खुलले आणि त्यावेळी त्यांनी अनेक किस्सेही सांगितले.

त्यातला हा एक किस्सा

अनुसूचित जातीसाठी त्यावेळी आरक्षित असलेल्या करमाळा विधानसभा मतदार संघातील निवडणूक लढण्यासाठी शरद पवार यांनी मला वीस हजार रुपये दिल्याची कबुली सुशीलकुमार शिंदे यांनी या कार्यक्रमात दिली होती. निवडणुकीचा खर्च जाऊन त्या वेळी चार हजार रुपये शिल्लक राहिले.

ही रक्कम परत करण्यासाठी मी शरदरावांकडे गेलो, त्यांनी ही रक्कम कॉंग्रेसचे तत्कालीन नेते नामदेवराव जगताप यांना देण्यास सांगितले. राजकारणात मी जे काय आहे, ते फक्त शरद पवारांमुळेच आहे, अशी स्पष्टोक्ती सुशीलकुमार शिंदे यांनी त्या कार्यक्रमात दिली होती .

पवारांनी माझ्यासाठी पाच एकर शेती बघितली

पवार यांच्याविषयीचा आणखी एक किस्सा शिंदेंनी कार्यक्रमात सांगितला. “आम्ही 1978 मध्ये सर्वजण कॉंग्रेस पक्षात एकत्र होतो. त्यावेळी कॉंग्रेसमध्ये फाटाफूट झालेली नव्हती. सोलापुरातील कारंबा गावाजवळ शरद पवारांनी माझ्यासाठी पाच एकर शेती बघितली. शेतीकडे लक्ष देण्याची सूचनाही त्यांनी मला केली. त्यावेळी मी नकार दिला होता.

बारा एकरापासून शेतीला सुरुवात केली

तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या सरकारमध्ये मला मंत्रिपदासाठी डावलण्यात आले. मंत्रिपदाची संधी हुकल्याने मी शेतीकडे लक्ष द्यायचा निर्णय घेतला आणि बारा एकरापासून शेतीला सुरुवात केली. आता ती 34 एकरांपर्यंत वाढत गेली आहे.

शरदरावांनी मला शेतीचे वेड लावले

माझ्या शेतीमालाला शरदरावांमुळे इतरांपेक्षा अधिक दर मिळत गेला. माझी शेती बघण्यासाठी पवार बलराम जाखड यांना घेऊन आले होते. शरदरावांनी मला शेतीचे वेड लावले,’ अशा शब्दांत शिंदे यांनी आठवणींना उजाळा दिला होता.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.