Take a fresh look at your lifestyle.

जेव्हा भारत दौऱ्यावर आलेले ओबामा म्हणतात ‘मी स्वत: डाळ बनवतो’

0

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी काही दिवसापूर्वी ‘अ प्रॉमिस्ड लँड’ हे पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक एक प्रकारे त्यांनी स्वताचे आत्मचरित्र म्हणून लिहिले आहे. ओबामा यांनी त्यांचे जीवन आणि अनुभवाशी संबंधित अनेक संदर्भ यात लिहिले आहेत.

या पुस्तकामध्ये त्यांनी भारतीय नेत्यांकडे (भारतीय राजकारण) लक्ष वेधले गेले आहे आणि सोबतच भारतातील राजकारणावर भाष्य केले आहे. आणि भारताबद्दलचे आपले अनुभव शेअर केले आहेत .

आपल्या पुस्तकात त्यांनी विविध प्रकारची गुपिते उघडली आहेत. ओबामा यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे की, लहानपणापासून चहूबाजूने भारताच्या संस्कृतीशी त्यांचा कसा संबंध होता आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर ते भारत भेटीसाठी किती उत्सुक होते. या पुस्तकाच्या पानांमध्ये दडलेले काही संदर्भ पाहू या ज्यात ओबामांकडे भारतीय चाहते म्हणून पाहिले जाते.

रामायण आणि महाभारताच्या विविध कथा ऐकत असत

नोबेल पुरस्कार विजेते ओबामा लिहितात की, लहानपणापासूनच त्यांच्या मनात भारतीय संस्कृतीबद्दल विशेष स्थान बनले होते. कारण सांगताना ते लिहितात की, इंडोनेशियात बालपणीचे दिवस गेले तेव्हापासून ते रामायण आणि महाभारताच्या विविध कथा ऐकत असत.

बॉलिवूड चित्रपटांचा आनंद लुटायला शिकले

बालपणीच्या काळात हिंदू धर्माच्या पौराणिक कथांशी त्यांचा संबंध होता, याचे कारण पुढे करून भारताच्या सांस्कृतिक वारशाने त्यांच्यावर प्रभाव टाकला. याशिवाय, ओबामा यांनी एक मनोरंजक कथाही लिहिला आहे.

महाविद्यालयीन काळात त्यांच्या मित्रांना भारतीय आणि पाकिस्तानी वंशाचे काही साथीदार होते.या भारतीयांनी आणि पाकिस्तानी सहकाऱ्यांच्या प्रभावामुळेच ओबामा डाळ आणि किमा बनवू लागले होते आणि बॉलिवूड चित्रपटांचा आनंद लुटायला शिकले होते.

त्यातच झाले असे की अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारताच्या दौऱ्यावर आले होते , बराक ओबामा यांनी यावेळी डाळीचा किस्सा सांगितला.’हिंदुस्तान टाइम्स लीडरशिप समीट’ या कार्यक्रमात ते सहभागी झाले आहेत. या कार्यक्रमाच्या आदल्या रात्रीच डाळीचा किस्सा घडला, ओबामा यांनी हा मजेशीर किस्सा शेअर केला होता .

डाळ म्हणजे नेमकं काय ?

बराक ओबामा यांनी सांगितलं, रात्री जेवणात एका वेटरनं काही खाद्यपदार्थ माझ्या ताटात वाढले. त्यात इतर पदार्थांसह डाळ देखील होता. पदार्थ ताटात वाढल्यानंतर डाळ म्हणजे नेमकं काय ? हा पदार्थ कसा करतात? याबद्दल वेटरने मला सांगायला सुरूवात केली.

कदाचित एका अमेरिकन माणसाला डाळ म्हणजे काय, हे माहिती नसावं, असा बिचाऱ्याचा समज झाला असावा, असं म्हणत बराक ओबामा म्हणाले, मला डाळ या पदार्थाबद्दल फक्त माहितीच नाही, तर तो डाळ कशी बनवतात, याची देखील मला माहिती आहे.

यापुढचा आणखी एक धक्का म्हणजे बराक ओबामा म्हणाले, ‘मी स्वत: डाळ बनवतो आणि ती कशी करतात, याची सिक्रेट रेसिपीदेखील माझ्याकडे आहे’. डाळीची पाककृती मी माझ्या भारतीय मित्राकडून विद्यार्थीदशेत असताना शिकलो होतो, तेव्हा तो आणि मी एकाच खोलीत राहायचो, असाही एक किस्सा ओबामा यांनी लिहिला आहे.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.