Take a fresh look at your lifestyle.

गणपती पुण्यात सुरु झाले पण मुंबईतील पहिले सार्वजनिक गणेश मंडळ कोणते ?

0

लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांनी 1893 साली संपुर्ण महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सवास सुरूवात केली. यावेळेस पुणे मुंबई या शहरात काही तरुणांनी एकत्र येत सार्वजनिक गणेशोत्सवास सुरूवात केली होती. त्यांमुळे अनेकांना हा प्रश्न पडणे साहजिक आहे, की मुंबईतील पहिले सार्वजनिक गणेश मंडळ कोणते आणि कुठे होते?

गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरवले

केशवजी नाईक चाळीत लोकमान्य टिळकांचे काही अनुयायी राहत असत अशी माहिती मिळते. रावबहाद्दुर लिमये आणि नरहरि गोडसे हे या चाळीतील लोकमान्यांचे अनुयायी होत. त्यामुळे लोकमान्यांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या आवाहनाला त्यांनी प्रतिसाद देत या चाळीत गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरवले. त्यांनी पुढाकार घेऊन या उत्सवाचे नियोजन केले.

सार्वजनिक गणेशमुर्तीची प्राणप्रतिष्ठा

लोकमान्य टिळकांनी ब्रिटशांविरोधातील धार तीव्र करण्यासाठी भारतीयांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे म्हटले होते. भारतीयांच्या एकत्रिकरणामुळे विचारांची देवाणघेवाण तर होतेच परंतु एकीचे बळही वाढते, टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला त्याच वर्षी मुंबईतही गिरगावातही केशवजी नाईक या चाळीत सार्वजनिक गणेशमुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती.

सुरूवातीपासून पर्यावरणपुरक गणेशोत्सव

ही चाळ खाडीलकर मार्ग चर्णी रोड येथे आहे. या चाळीत साजरा होणारा गणेशोत्सव सुरूवातीपासून पर्यावरणपुरक होता. श्रींची मुर्तीदेखील लहान आकाराचीच असे. आजपर्यंत या मंडळाने या उत्सवाच मांगल्य जपलं आहे. यंदा या मंडळाचं १२८ वं वर्ष आहे. १९९२ मध्ये या मंडळाने आपले शताब्दी वर्ष साजरे केले होते.

मुर्ती ही साधारण 2 फुट

केशवजी नाईक चाळीतील गणेशोत्सवाती मुर्ती ही साधारण 2 फुट एवढी असते. ती शाडूच्या मातीपासून बनलेली असते. सोबतच मंडळ नेहमी पर्यावरणाशी अनुकूल असलेलं पुजा साहित्य वापरत असतं.

कुटूंबाची चौथी पिढी दरवर्षी ही मुर्ती बनवत असते

विशेष बाब म्हणजे ज्या कुटूंबाने या मंडळाची श्रींची मुर्ती पहिल्यांदा घडवली होती. त्याच कुटूंबाची चौथी पिढी सध्या दरवर्षी ही मुर्ती बनवत असते. मुंबईतील गणेशोत्सव मोठा इव्हेंट होत असल्याच्या युगात आजही या मंडळाने आपले मांगल्यपुर्ण उत्सवाचे स्वरूप जपले आहे.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.