Take a fresh look at your lifestyle.

हिंडेनबर्ग रिसर्च आहे तरी काय? ज्याने अदानीना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला

0

अदानी समूहाचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सत्रात अक्षरशः धराशायी झाले आणि समूहाच्या गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं. अमेरिकेची आर्थिक संशोधन कंपनी, हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर अदानी समूहाचे शेअर्स कोसळले. शॉर्ट-सेलर हिंडेनबर्ग रिसर्चने एका अहवालात स्टॉक फेरफार आणि अकाउंटिंग फसवणुकीचा हवाला देत अदानी समूहावर गंभीर आरोप केले आहेत

समूहाने शेअर्समध्ये फेरपार केली आणि लेखा परिक्षणात गडबडीचा आरोप अहवालात करण्यात आला.ब्लूमबर्ग बिलिनिअर इंडेक्सनुसार, अदानी यांची एकूण संपत्ती 113 अब्ज डॉलर राहिली आहे. जागतिक श्रीमंतांच्या यादीतील त्यांच्या स्थानाला मोठा धक्का बसला

हिंडेनबर्ग रिसर्च आहे तरी काय?

हिंडनबर्ग रिसर्चने जगभरातील अनेक कंपन्यांचा भांडाफोड केला आहे. या संशोधन संस्थेची स्थापना नाथन एंडरसनने केली होती. ही एक न्यायवैद्यक पद्धतीने आर्थिक संशोधन करणारी संस्था आहे. इक्विटी, क्रेडिट आणि डेरिवेटिव्हसचे विश्लेषण, संशोधन करुन ही संस्था अहवाल तयार करते. यामध्ये लेखापरीक्षण अनियमितता, गैरव्यवस्थापन आणि अघोषित संबंधित-पक्ष व्यवहार. कंपनी स्वतःचे भांडवल गुंतवते.संभाव्य गैरप्रकार शोधल्यानंतर, हिंडेनबर्ग सामान्यत: नफा कमावण्याच्या आशेने, लक्ष्य कंपनीविरुद्ध केस आणि पैज स्पष्ट करणारा अहवाल प्रकाशित केला जातो.

हिंडेनबर्ग नाव कसे पडले?

या संस्थेचे नाव ठेवण्यामागेही भयंकर इतिहास आहे. अमेरिकेतील न्यू जर्सीमधील मॅचेस्टर टाऊनशिप जवळ एक विमान दुर्घटना झाली होती. 1937 मध्ये हिंडनबर्ग एअरशिपचा अपघात झाला होता. त्यावरुन या फर्मचे नाव ठेवण्यात आले आहे.

कंपनीचे संस्थापक एक रुग्णवाहिका चालक

नाथन एंडरसन यांनी इस्त्राईल या देशात अॅम्ब्युलन्स चालक म्हणून काम केले आहे. अत्यंत दबावात आपण चांगले काम करतो, असा या पठ्ठ्याचा दावा आहे. हॅरी मार्कपोलोस हा त्याचा आदर्श आहे. मार्कपोलोस हे सुद्धा एक विश्लेषक आहे. त्यांनी बर्नी मेडॉफ (Bernie Madoff) यांच्या एका योजनेचा भांडाफोड केला होता. नाथन एंडरसन यांनी डेटा कंपनी फॅक्टसेट रिसर्च सिस्टम्स इंक येथे वित्त क्षेत्रातील करिअरची सुरुवात केली, जिथे त्यांनी गुंतवणूक व्यवस्थापन कंपन्यांमध्ये काम केले.

हिंडेनबर्गची सर्वात हाय-प्रोफाईल पैज कोणती?

ज्या पद्धतीने अदानी ग्रुपविरोधात हिंडेनबर्ग रिसर्चने गंभीर आरोप केले आहेत, त्याच पद्धतीने 2020 मध्ये हिंडेनबर्ग रिसर्च चर्चेत आले होते. हिंडेनबर्गने सप्टेंबर 2020 मध्ये इलेक्ट्रिक ट्रक निर्माती कंपनी निकोला कॉर्पविरुद्ध पैज लावली होती. ज्यामध्ये त्यांनी विजय मिळवला होता, अशी माहिती वाॅल स्ट्रीट जर्नलशी बोलताना दिली होती. मात्र, त्यांनी रकम सांगण्यास नकार दिला होता.

हिंडनबर्गने 2017 पासून आतापर्यंत जवळपास 36 कंपन्यांमधील फसवणूक, अनियमितता यांचा भांडाफोड केला आहे. ट्विटर आणि एलॉन मस्क यांनाही हिंडनबर्गने झटका दिला आहे. दरम्यान अदानी समूहाने या अहवालातील आरोप फेटाळले आणि कायदेशीर कार्यवाहीची तयारी सुरु केल्याचे वृत्त आहे. पण तोपर्यंत या अहवालाने मोठे नुकसान केले आहे.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.