सेक्सटोर्शन म्हणजे नेमकं कसं होत आणि त्यापासून वाचण्यासाठी काय केलं पाहिजे ?
पुणे पोलिसांनी राजस्थानमधील एका गावात जाऊन सेक्सटोर्शन प्रकरणातील कारवाई करून आरोपीना अटक केली. या सगळ्यामधे चर्चेचा मुद्दा ठरलेलं सेक्सटोर्शन म्हणजे नेमकं कसं होत आणि त्यापासून वाचण्यासाठी काय केलं पाहिजे
दोन दिवसापासून माध्यमांमध्ये एका बातमीची चर्चा आहे. ती म्हणजे पुणे पोलिसांनी केलेल्या एका कारवाईची. पुणे पोलिसांनी राजस्थानमधील एका गावात जाऊन सेक्सटोर्शन प्रकरणातील कारवाई करून आरोपीना अटक केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांसमोर या गावाची संपूर्ण कहाणीच सांगितली.
पुणे पोलिसांकडे12 ऑक्टोबर रोजी नोंदवलेल्या गुन्ह्यानुसार एका 19 वर्षीय तरुणाने सेक्सटॉर्शन प्रकरणात छळ झाल्याचा आरोप करून आत्महत्या केली. आरोपीने तरुणाकडे वारंवार पैशांची मागणी करत त्याचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली होती. त्याचा तपास करत पुणे पोलिसांनी हि कारवाई केली आहे.
पण या सगळ्यामधे चर्चेचा मुद्दा ठरलेलं सेक्सटोर्शन म्हणजे नेमकं कसं होत आणि त्यापासून वाचण्यासाठी काय केलं पाहिजे या माहिती साठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत पहा
सेक्सटोर्शन या प्रकाराची सुरुवात होते. सोशल मीडियावरून. सांगायच झालं तर तुम्हाला फेसबुकवर किंवा दुसऱ्या एखाद्या सोशल मीडियावर रिक्वेस्ट पाठवली जाते. तुम्ही रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करता. मग बोलणं सुरु होत. बोलणं सुरु झाल्यावर या टोळीतल्या तरुणी तुमच्याशी अश्लील बोलायला सुरु करतात. त्यांना तसं बोलायला तयार केलेलं असतं. बोलता बोलता मग तुम्हाला व्हिडिओ कॉल केला जातो.
व्हिडिओ कॉलची पुढची स्टेप म्हणजे हि तरुणी नग्न होऊन व्हिडिओ कॉल करते. समोरच्या व्यक्तीलाही कपडे काढायला लावले जातात.
एकंदरीत तुम्हाला जाळ्यात ओढून त्याच रेकॉर्डिंग केलं जात आणि त्यानंतर खंडणी मागण्यास सुरुवात होते. खंडणीची रक्कम बनावट खात्यात मागवली जाते.
पैसे देऊन तरी प्रकरण संपतं का?
या प्रकारानंतर खरी सुरुवात होते. तुम्ही केलेलं पहिलं पेमेंट ही फक्त सुरूवात असते. तुम्ही एकदा पैसे दिले की वारंवार खंडणीची मागणी केली जाते. पैसे न दिल्यास तुमचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली जाते. व्हॉईस मॉड्युलेशनचा वापर करुनही खंडणी मागितली जाते.
गेल्या वर्षी दिल्ली पोलिसांनी राजस्थानमधून चालणाऱ्या रॅकेटच्या मुसक्या आवळल्या होत्या. पण हे रॅकेट एवढं मोठं आहे, की अजूनही खंडणी उकळणं सुरूच आहे. पुणे पोलिसांनी केलेली कारवाई हा यातला नवा प्रकार आहे.
जाळ्यात अडकल्यावर काय कराल?
तुम्ही म्हणाल जर हे असं झालं तर यातून बाहेर कसं पडायचं ? खरंतर हेच या प्रकरणातलं सर्वात मोठं आव्हान आहे. यावर पोलिसांनीही काही गोष्टींची काळजी घेण्याचं आवाहन केलेलं आहे. पहिलं पेमेंट करण्यापूर्वीच पोलिसांची मदत घ्या.
या प्रकरणामध्ये पोलिसांनाही दिलेल्या माहितीनुसार खऱ्या महिलेचा फक्त फोटो टार्गेटला दाखवलेला असतो. व्हिडिओ कॉलमध्ये टार्गेटचा फ्रंट कॅमेरा, तर महिलेचा रिअर कॅमेरा चालू असतो. महिला स्वतः नग्न होत नसते, तर रिअर कॅमेरा चालू आहे दाखवून पॉर्न व्हिडिओ चालवले जातात. पण यात टार्गेटचा फ्रंट कॅमेरा चालू असल्याने अडकवलं जातं.
तक्रार करण्यास टाळाटाळ
व्हिडीओ कॉल संपताच पैशांची मागणी करण्यासाठी मेसेज येतो. ५ हजार ते २-३ लाखांपर्यंतची रक्कम मागितली जाते. पैसे न देता पोलीस स्टेशन गाठणं हा एकमेव पर्याय यात आहे. तक्रारी दाखल होण्याचं प्रमाण अत्यंत नगण्य आहे. कारण या जाळ्यात अडकल्यानंतर अशी परिस्थिती निर्माण होते, जी कुणासमोर सांगताही येत नाही. त्यामुळे सोशल मीडियावर कुणीही अनोळखी व्यक्तीच्या नादाला लागू नका आणि संभाव्य धोक्यापासून स्वतःचं संरक्षण स्वतः करा.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम