Take a fresh look at your lifestyle.

“औरंगाबाद कि संभाजीनगर” मागणी आली कुठून ?

0

आपल्याकडे निवडणुका आल्या कि जुने मुद्दे किंवा मागण्या पुन्हा वरती येतात. अशीच एक मागणी सध्या जोरदार चर्चेत आहे. ती मागणी म्हणजे औरंगाबाद की संभाजीनगर

औरंगाबाद च्या नामांतराच्या मुद्द्यावरून महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपने औरंगाबाद महापालिकेवर 30 वर्ष सत्ता केली. आता पुन्हा महापालिका निवडणुकीत हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. शिवसेना-भाजपची राज्यात दोनदा सत्ता येऊनही त्यांनी या शहराचं नाव बदललं नाही. आता मनसेनंही औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा उचलून धरला आहे.

नामांतराचा मुद्दा जाणून घेण्याआधी औरंगाबाद शहराचा इतिहास जाणून घेणंही महत्त्वाचं आहे.

शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी औरंगाबादचा पहिला मुस्लीम महापौर करण्याची घोषणा केली आणि हि घोषणा त्यांच्यावर उलटली. या निवडणुकीत मराठवाड्यात शिवसेनेचा विजय झाला. या विजयानंतर औरंगाबादच्या सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर बाळासाहेबांची विजयी सभा होती.

औरंगबादमधील या सभेत 1988 मध्ये पहिल्यांदा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी संभाजीनगरचा नारा दिला होता. तेव्हापासून शिवसेना औरंगाबादचा संभाजीनगर असा उल्लेख करते. आजही सामना वर्तमानपत्रात संभाजीनगर असंच लिहलं जातं.

आघाडी सरकारने हा प्रस्ताव रद्द ठरवला

पुढच्या वर्षी म्हणजेच १९८९ ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे ११ आमदार मराठवाड्यातून निवडून आले. आणि लोकसभेत शिवसेनेचे मोरेश्वर साळवे हे निवडून आले आणि त्यांच्या माध्यमातून शिवसेनेचा आवाज लोकसभेत पोहचला.त्यावेळी ते लोकसभेत जाणारे शिवसेनेचे पहिले खासदार होते .

औरंगाबाद मध्ये मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनामुळे तर शिवसेनेला प्रचंड मोठे बळ मिळाले होते . १९९५ ला त्यांचे १५ आमदार एकट्या मराठवाड्यातून निवडून आले होते. या वर्षी शिवसेना-भाजप युतीच सरकार महाराष्ट्रात आल आणि शिवसेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. 9 नोव्हेंबर 1995 ला शहराचे संभाजीनगर असं नामकरण करण्यासाठी असाच प्रस्ताव महापालिकेने पाठवला होता. मात्र 2001 ला काँग्रेस आघाडी सरकारने हा प्रस्ताव रद्द ठरवला होता .

औरंगाबाद शहराचं नाव आणि इतिहास

या शहराचं प्रसिद्ध नाव म्हणजे खडकी. बेसाल्ट खडकावर वसलेला हा परिसर आहे. त्यात शहरात अगदी प्राचिन असं खडकेश्वर महादेवाचं मंदिर आहे. याच नावावरुन या शहराचं नाव खडकी पडलं असावं, अशी इतिहासात नोंद आहे . त्याकाळी या शहराचा राजा मलिक अंबर होता. खऱ्या अर्थानं नहरे-ए-अंबरी सारख्या पाणीपुरवठ्याच्या आधुनिक वास्तू उभारुन त्यानं या गावाचं शहर केलं. मात्र त्यानंही या खडकी नावात कुठलाही बदल केला नाही.

नंतर कालांतराने औरंगाबादचा इतिहास बघितला तर या गावावर विजय मिळवणाऱ्या प्रत्येकाने त्या गावाचं नाव बदलण्याचा प्रयत्न केला आहे. अहमदनगरच्या निजामाचा वजीर मलिक अंबरने खडकी या छोट्याशा गावाला राजधानी बनवलं. त्याच्या मुलाने फतेह खानाने स्वतःच नाव देऊन खडकीला फतेहनगर केलं . पुढे आलेल्या औरंगजेबाने या फतेहनगरला स्वतःच्या नावावरून औरंगाबाद केलं .

औरंगाबाद की संभाजीनगर ? आता महापालिका निवडणुकीत हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मात्र यातून पायाभूत सुविधांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, ते सुटणार आहे का याचं उत्तर कुणाजवळही नाही.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.