Take a fresh look at your lifestyle.

एका फळविक्रेत्याला पद्मश्री पुरस्कार मिळाला; कारण जाणून वाढेल आदर

0

आपल्या आयुष्यात आपण सर्वजण काम करत असतो. काम करण्याचे प्रत्येकाचे कारण वेगळे असते. पण जेव्हा एखादा माणूस स्वत: पैशापेक्षा आणि प्रसिद्धीपेक्षा माणुसकी म्हणून काम करतो तेव्हा तो लोकांच्या हृदयात स्थान मिळवतो.

कर्नाटकमधील असाच एक फळ विक्रेता हरेकाला हजब्बा हेदेखील असेच नाव आहे. हजब्बा यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे.

तर हरेकाला हजब्बा कोण आहेत आणि त्यांना हे पुरस्कार का दिला गेला.

कोण आहेत हरेकाला हजब्बा ?

हरेकला हजब्बा मूळचे कर्नाटकचे आहे. ते आपल्या परिसरात संत्री विकतात. गेल्यावर्षी त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

आयएफएस अधिकारी प्रवीण कासवान यांनी त्याच्याविषयी सोशल मीडियावर लिहिले आणि त्यानंतर त्याच्याविषयी आदर व्यक्त करणाऱ्यांची सोशल मीडियावर मोठी संख्या तयार झाली होती. लोकांनी त्यांचे मोठ्या प्रमाणात अभिनंदन केले.

https://twitter.com/ParveenKaswan/status/1221454978889306112

हरेकाला हजब्बा हे कर्नाटकातील न्यू पाडापू गावात राहतात . त्यांचे वय सध्या ६८ वर्षे आहे. लहानपणापासून ते शाळेत जाऊ शकले नव्हते. याच त्यांना दुःख होत. याच दुःखामुळे त्यांना काहीतरी वेगळं करण्याची प्रेरणा मिळाली.

शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला

परिस्थितीमुळे हरेकाला हजब्बा यांना शाळेत जाता आलं नाही तर काय झालं ? त्यामुळे त्यांनी आपली कमाई शाळा सुरु करण्यासाठी खर्च केली.

हरेकाला सांगतात “एकदा एका परदेशी व्यक्तीनं मला इंग्रजीत फळं मागितली, तेव्हा मी इंग्रजी बोलता आले नाही, त्यामुळे त्या परदेशी व्यक्तीला मला फळाचे दर सांगता येत नव्हते,” तेव्हा मला पहिल्यांदाच असहाय वाटलं. असं ते म्हणाले होते.

हरेकाला म्हणतात की, त्यानंतर मी माझ्या गावात शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून इथल्या मुलांना या परिस्थितीचा सामना करावा लागणार नाही. त्यासाठी हजबा यांनी आपली सर्व शिल्लक रक्कम खर्च केली.

हरेकाला हजब्बा यांच्या नयापड़ापु या गावात शाळा नव्हती. त्यांनी आधी पैसे वाचवून शाळा उघडली. पण नंतर जेव्हा विद्यार्थ्यांची संख्या वाढत गेली. तेव्हा त्यांनी कर्ज काढून शाळेसाठी जमीन खरेदी केली.

दररोज १५० रुपये कमावणाऱ्या हरेकाला हजब्बा यांच्या या प्रयत्नामुळे कधी काळी मशिदीमध्ये चालणारी शाळा आज मोठ्या कॉलेजमध्ये अपग्रेडशन करण्याच्या तयारीत आहे.

हरेकाला हजब्बा यांच्या कार्याला सलाम !!

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.