फेविकॉलच्या अनेक जाहीराती आजही लोकांना तोंडपाठ आहेत
भारतातल्या जनतेला काहीही चिटकवायचे असेल तर सगळ्यात आधी फेविकॉलच आठवतो
भारतातल्या जनतेला काहीही चिटकवायचे असेल तर सगळ्यात आधी त्यांना फेविकॉलच आठवतो. तुम्हाला जर माहित असेल तर असे खुप ब्रॅन्ड आहेत ज्यांची नावेच उत्पादनांची पर्यायी नावे बनतात. अशी अनेक उत्पादने आहेत जसे की कोलगेट, झंडू बाम, मॅगी इ. असे अनेक ब्रॅन्ड आहेत. असंच एक उत्पादन आहे फेविकॉल. आज या कंपनीला ६० वर्षांपेक्षा जास्त काळ लोटून गेला आहे.
तुम्ही कोणत्याही कंपनीचे अधेसिव्ह घेतलं तरी तुम्हाला फेविकॉलच आठवणार. भारतात फेविकॉलला पर्याय नाही. जरी काही ब्रॅन्डस असले तरी लोक आवर्जून फेविकॉल घेतात. या कंपनीला बलवंत पारेख यांनी उभे केले होते.
चला तर मग जाणून घेऊया त्यांनी बलवंत पारेख यांनी ही कंपनी कशी उभी केली.
भारत छोडो आंदोलनात झाले सक्रिय
गुजरातमधील महुआ या छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला होता. बलवंत वकिली शिकत होते पण त्यांना शिक्षणात काहीच रस नव्हता. वकिलीचं शिक्षण त्यांनी कसंतरी पुर्ण केले. पण त्यांनी या क्षेत्रात काहीच काम केले नाही. कारण त्यांना या क्षेत्रात काम करण्याची इच्छाच नव्हती.
त्यांना हा पेशाच खोटारडा वाटत होता. खोट्याला खरा मुलामा देणे त्यांना जमत नव्हते. वकिलीचं शिक्षण पुर्ण केल्यानंतर ते मुंबईमध्ये आले आणि भारत छोडो आंदोलनात ते सक्रिय झाले. घरात आधीच त्यांच्यामुळे चिंतेत होते आणि त्यात आणखी एक भर पडली.
पोट भरण्यासाठी त्यांनी अनेक नोकऱ्या केल्या
त्यांच्यावर घरातून शिक्षण पुर्ण करण्याचा दबाव होता. पण वकीली करायची नाही यावर ते ठाम होते. वकिली करायची नाही पण पोटापाण्यासाठी त्यांना काहीतरी करायचे होते. पोट भरण्यासाठी त्यांनी अनेक नोकऱ्या केल्या. कोणत्याही कामाची त्यांनी लाज बाळगली नाही. उलट त्याच्यामुळे त्यांना खुप अनुभव मिळत गेला.
ते वकील बनले नाहीत पण वकीलीमुळे त्यांच्याकडे एक गोष्ट आली होती ती म्हणजे एखाद्याला आपल्या वाणीने मंत्रमुग्ध करणे.
पडेल ते काम केले
बोलायला ते खुप गोड होते त्यामुळे त्यांचा जनसंपर्क चांगला होता. कामाची गरज होती म्हणून त्यांनी लाकूड व्यापाऱ्याकडे शिपायाची नोकरी केली होती. पत्नीसोबत गोदामात काम केले. पडेल ते काम करणे या त्यांच्या सवयीमुळे त्यांना नशीबाने खुप संधी दिल्या. त्याच संधीचे त्यांनी सोने केले.
अशीच एक संधी त्यांच्याकडे चालून आली ती म्हणजे जर्मनीत जाण्याची. जर्मनीत त्यांनी खुप ज्ञान मिळवले. तिकडच्या ज्ञानाचा वापर करून त्यांनी भारतात परतल्यावर धाकट्या भावासोबत एक डाय आणि केमिकल फॅक्टरी सुरू केली.
आजही फेविकॉलच्या अनेक जाहीराती लोकांना तोंडपाठ आहेत
या कारखान्यात ऍक्रेलिक बेस्ट कलर बनवला जात होता. या कामासाठी एक घटक वापरला जात होता ज्याला ग्लू असे म्हणत असत. त्यांनी या घटकाला फेविकॉल असे नाव दिले. ग्लूला जर्मनीत कॉल असे म्हणायचे. अशाच एका जर्मन उत्पादनाचे नाव होते मेविकॉल. यावरूनच फेविकॉल असे नाव पडले होते.
हे खुप साधे उत्पादन होते पण पारेख यांनी अतिशय करमणूकीय पद्धतीने लोकांसमोर हे मांडले. फेविकॉलला कुतूहलाचा आणि आवडीचा विषय बनवून टाकला. आजही फेविकॉलच्या अनेक जाहीराती लोकांना तोंडपाठ आहेत.
भन्नाट उत्पादन बाजारात आणले
१९९० मध्ये पिडीलाईट कंपनीची स्थापना झाली होती. खुप कमी वेळात या कंपनीला यश मिळाले होते. १९९३ मध्ये त्यांचे शेअर्सही काढण्यात आले होते. १९९७ पर्यंत फेविकॉल टॉप ब्रॅन्ड्समध्ये गणला जाऊ लागला.
२००० साली त्यांनी आणखी एक भन्नाट उत्पादन बाजारात आणले ज्याचे नाव होते एमसील.
एमसीलद्वारे काहीही जोडले जाऊ शकते. हे कंपनीने दाखवून दिले. तुटलेली चप्पल असो वा तुटलेलं फर्निचर एमसिल काहीही जोडायची तयारी ठेवत होतं. २००६ पर्यंत फेविकॉल देशाबाहेरही फेमस झाले. अनेक देशांत त्यांची विक्री होऊ लागली. कंपनीने सिंगापुरमध्ये स्वताचे संशोधन केंद्र उभारले आहे.
भारतात फेविकॉलचा पाया रूजवणारे बलंवत पारेख यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले. मात्र त्यांनी उभारलेल्या फेविकॉल या कंपनीमुळे आजही ते सर्वांच्या आठवणीत आहेत.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम