Take a fresh look at your lifestyle.

भाजपकडून एकनाथ शिंदेंशी चर्चा करायला गेलेले संजय कुटे कोण आहेत ?

भाजपचे महाराष्ट्रातील मोठे नेते हे सध्या दिल्लीत होते. दिल्लीत केंद्रीय नेतृत्वासोबत त्यांच्या बैठका सुरु आहेत. भाजपचा महाराष्ट्रातील नवीन प्रदेशाध्यक्ष कोण होणार यानिमित्त या बैठका सुरु असल्याचं समजतं आहे.

0

राज्यात सर्वत्र एकच चर्चा आहे ती म्हणजे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बंडाची

एकनाथ शिंदे यांच्या या बंडामागे भाजप असल्याच्या चर्चा आधी भाजपचे महाराष्ट्रातील नेते फेटाळत राहिले. मात्र, या घडामोडींना वेग आल्यानंतर एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री डॉ. संजय कुटे थेट सुरतमध्ये दाखल झाले.

भाजपकडून एकनाथ शिंदेंशी चर्चा करायला गेलेले संजय कुटे कोण आहेत ?

देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी आपल्या शेवटचा जो मंत्रिमंडळ विस्तार केला होता त्यावेळी त्यांनी संजय कुटे यांना देखील त्या मंत्रिमंडळात घेतलं होतं.

त्यावेळी त्यांना कामगार आणि ओबीसी मंत्रालय देण्यात आलं होतं. पण मंत्री म्हणून त्यांचा कार्यकाळ अवघ्या 3 ते 4 महिन्याचा होता. कारण त्यानंतर लागलीच विधानसभा 2019 च्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या.

संजय कुटे हे फ्रंटलाइन नेते नसले तरी ते आक्रमक नेते आहेत. मागील चार टर्मपासून आमदार म्हणून निवडून येत आहेत. मुळचे बुलडाण्यातील आहेत. मागील काही दिवसांपासून ते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात आहेत.

त्या १२ आमदारांमध्ये संजय कुटे

तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की अन् शिवीगाळ प्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्या बारा आमदारांमध्ये आमदार संजय कुटे याना देखील एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले होते.

तालिका अध्यक्षांच्या समोर जाऊन त्यांनी माईक हिसकला होता. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती.

संजय कुटे यांना मंत्रिमंडळ विस्तारात मिळाले मंत्रिपद

संजय कुटे हे देखील मागील अनेक वर्षांपासून विधानसभेवर निवडून गेले आहेत .२०१४ साली जेव्हा पहिल्यांदा भाजपा-सेनेची सत्ता महाराष्ट्रात स्थापन झाल्यानंतर संजय कुटे यांची पहिल्याच मंत्रिमंडळात वर्णी लागेल, अशी चर्चा होती. मात्र मंत्रीपदाच्या प्रतीक्षेत ठेवत त्या सरकारच्या शेवटच्या टप्प्यात बुलढाणा जिल्ह्यातून आमदार संजय कुटे यांची वर्णी लागली होती.

तीन पंचवार्षिकपासून आमदार

आमदार संजय कुटे हे जळगाव जामोद मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे गेल्या तीन पंचवार्षिकपासून आमदार राहिलेले आहेत. आमदार संजय कुटे यांनी जिल्हाध्यक्ष ते प्रदेशसरचिटणीसपद सांभाळले आहे. संजय कुटे हे सध्या महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष आहेत.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.