Take a fresh look at your lifestyle.

बालाजी तांबे यांच्या तक्रारीनंतर बाळासाहेब ठाकरे यांनी थेट काठीच हातात घेतली

आयुर्वेद आणि योग शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचे व्रत घेतलेल्या बालाजी तांबे यांचे आज पुण्यात निधन झाले.

0

बालाजी तांबे हे आयुर्वेद, योग व संगीतोपचार या विषयांतील तज्ज्ञ तसेच पुणे जिल्ह्यातील कार्ला येथे असलेल्या आत्मसंतुलन व्हिलेजचे संस्थापक होते. तब्बल पाच दशकं त्यांनी आयुर्वेद, अध्यात्म आणि संगीतोपचार यांचा प्रचार व प्रसार केला. समाजातील अनेक घटकांना त्यांनी आयुर्वेदाशी जोडले. आयुर्वेदाशी संबंधित संशोधनावर त्यांनी भर दिला.

आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांनी आयुर्वेदिक औषधी शास्त्र आणि आयुर्वेदिक फिजिओथेरपी यावर संशोधन केले आहे. बालाजी तांबे यांनी मेकॅनिकल इंजिनीअरचीही डिग्री घेतली आहे. आयुर्वेद केवळ राज्य किंवा देशभरापुरतं मर्यादित न ठेवला त्यांनी जगभरात प्रसार केला आणि त्याचं महत्व पटवून दिलं.

गर्भसंस्कारावरील पुस्तकांना मोठी मागणी

बालाजी तांबे यांनी लिहिलेल्या गर्भसंस्कारावरील पुस्तकांना मोठी मागणी होती. या पुस्तकांच्या लाखो प्रती विकल्या गेल्या. इंग्रजीसह सहा भाषांमध्ये या पुस्तकाचे भाषांतर झालं आहे. केवळ महाराष्ट्रात नाही तर देश-विदेशात त्यांच्या आयुर्वेद उपचारांना मागणी होती.

बालाजी तांबे यांना लहानपणापासूनच वडिलांकडून आयुर्वेदाची शिकवण मिळाली होती. आयुर्वेदातली आणि अभियांत्रिकीमधली पदवी त्यांनी एकाच वर्षी मिळवली होती. त्यांनी आयुर्वेदिक औषधी शास्त्र आणि आयुर्वेदिक फिजिओथेरपी यावर संशोधन केलं होतं.

पाच दशके प्रचार व प्रसार

बालाजी तांबे यांनी दैनिक सकाळच्या फॅमिली डॉक्टर या पुरवणीच्या माध्यमातून आरोग्य विषयक जनजागृती केली. त्यातून विविध विषयांवर अनेक लेखही लिहिले. नागरिकांमध्ये आयुर्वेदाबाबत जिज्ञासा निर्माण करण्यात त्यांचे मोठे योगदान होते. आयुर्वेद, अध्यात्म आणि संगीतोपचार यांचा पाच दशके प्रचार व प्रसार बालाजी तांबे यांनी केला. विविध समाज आणि घटकांना त्यांनी आयुर्वेदाशी जोडलं.

अन् बाळासाहेबांनी थेट काठी हातात घेतली!

बालाजी तांबे काही वर्षांपूर्वी MTDC च्या बंगल्यात भाड्याने राहत होते. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे तांबे यांच्याकडे मुक्कामी आले होते. तेव्हा बाळासाहेबांना तांबे यांच्या बंगल्याच्या अवतीभोवती कचऱ्याचं साम्राज्य पाहायला मिळालं.

बाळासाहेबांनी बालाजी तांबे यांना कारण विचारलं. तेव्हा तांबे यांनी बाळासाहेबांना तिथल्या कर्मचाऱ्यांबाबत तक्रार केली.

बालाजी तांबे यांनी बाळासाहेबांना सांगितले की मी कर्मचाऱ्यांना सांगितलं की जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मी वास करते. पण इथले कुणी ऐकायलाच तयार नाही.

बालाजी तांबे यांची तक्रार बाळासाहेब ठाकरे यांनी ऐकुन घेतली आणि त्यांनी थेट एक काठीच हातात घेतली. बाळासाहेबांना तिथल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना बोलावून घेतलं. तेव्हा तांबेंनी त्यांना विचारलं की बाळासाहेब, तुमची युनियन वगैरे आहे का इथे?

त्यावर बाळासाहेबांनी हसून उत्तर दिलं की, माझी युनियन तर नाही. पण मी तुम्हाला दाखवतो की, युनियनशिवाय कशी कामं होतात!

मग बाळासाहेबांनी तिथल्या सगळ्या कर्मचाऱ्यांची चांगलीच झडती घेतली. त्यांना संपूर्ण परिसराची स्वच्छता करायला लावली. मी जाईपर्यंत इथं सगळं हिरवं दिसलं नाही तर या काठीनं एकेकाला दाखवतो, असा शब्दात बाळासाहेबांनी तिथले कर्मचारी स्वच्छतेच्या कामाला लावले, असा एक किस्सा तांबे यांनी सांगितला होता.

आयुर्वेद आणि योग शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचे व्रत घेतलेल्या बालाजी तांबे यांचे आज पुण्यात निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.