स्विगी आणि झोमॅटो चा बाजार उठलाय का ? डिलिव्हरी पार्टनर्स प्लॅटफॉर्म सोडून का जात आहेत?
झोमॅटो, स्विगी आणि झेप्टो सारखे फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म आता एका नवीन समस्येशी लढा देत आहेत.
गेल्या काही वर्षांत स्विगी (Swiggy) आणि झोमॅटो (Zomato) ही फूड डिलिव्हरी अॅप्स (Food Delivery Apps) देशाच्या शहरी भागांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली आहेत. शहरातल्या वेगवेगळ्या रेस्टॉरंट्समधल्या पदार्थांची लज्जत घरबसल्या चाखता येते, हे त्याचं महत्त्वाचं कारण.
पदार्थाच्या मूळ किमतीवर थोडे डिलिव्हरी चार्जेस द्यावे लागले, तरी ते परवडतं. कारण जाण्या-येण्याचा वेळ वाचतो.
प्रवासाचा, गाडी पार्किंगला जागा शोधण्याचा, तसंच हॉटेल खूप प्रसिद्ध असेल, तर आपला नंबर येईपर्यंत बाहेर ताटकळत राहण्याचा त्रास वाचतो. शिवाय कुपन कोड्स, वेगवेगळ्या ऑफर्स, कॅशबॅक वगैरे सवलतींमुळे अनेकदा हा सौदा स्वस्तात पडतो. सकाळी पासून तर रात्री उशिरापर्यंत ही सेवा सुरू असल्याने एकटे राहणाऱ्यांसाठी सकाळच्या चहापासून तर थेट लेट नाइट डिनरपर्यंत सगळं काही मागवता येतं.
कोरोना लॉकडाउनच्या काळात तर या सेवांच्या वापरात आणखी वाढ झाली.
पण हेच झोमॅटो, स्विगी आणि झेप्टो सारखे फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म आता एका नवीन समस्येशी लढा देत आहेत. खरं तर, स्विगीने मुंबई आणि बंगळुरुसारख्या मोठ्या महानगरांमधील स्विगी जिनी हे त्यांचे ऑपरेशन्स तात्पुरते बंद केले आहेत. तर त्यांचा किराणा विभाग आणि सुपर डेली हे विभाग 5 शहरांमध्ये बंद करण्यात आले आहेत.
नेमकं काय चालू आहे?
बरं, सोप्या शब्दांत सांगायचे तर जे फूड डिलिव्हरी करणारे आहेत या कर्मचाऱ्यांची सध्या डिलिव्हरी प्लॅटफॉर्मस कडे कमतरता आहे. त्याचे मुख्य कारण बहुतेक डिलिव्हरी कर्मचारी हे गिग कामगार ( एक व्यक्ती जी सामान्यत: सेवा क्षेत्रात स्वतंत्र कंत्राटदार किंवा फ्रीलान्सर म्हणून तात्पुरती नोकरी करते ) आहेत.
हे जे लोक आहेत हे स्वतंत्ररित्या काम करणारे( freelancer) म्हणून काम करतात, त्यामुळे त्यांना कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांसारखे फायदे दिले जात नाहीत.
डिलिव्हरी पार्टनर्स (भागीदार) प्लॅटफॉर्म सोडून जात आहे
याचे अजून एक कारण म्हणजे तर सध्या देशात वाढत असेलेला इंधनाचा (पेट्रोल आणि डिझेल) चा खर्च तसेच अनेक क्षेत्रांमध्ये महागाईचा वाढत चाललेला दबाव. आणि प्रचंड उष्णतेच्या लाटेशी झगडत असताना देखील जे लोक आपल्याला आपल्या ऑर्डर्स देत आहेत त्यांच्या आरोग्यावर त्याचा होणारा परिणाम. सुमारे १०० पैकी ४० डिलिव्हरी करणारे (भागीदार) ते ज्या डिलिव्हरी प्लॅटफॉर्म साठी काम करतायेत तो डिलिव्हरी प्लॅटफॉर्म ते पूर्णपणे बदलतात किंवा सोडतात असा एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.
काही डिलिव्हरी करणारे पार्टनर्स (भागीदार) तर आपल्या कोरोनापूर्वीच्या कामांकडेही परत जात आहेत. याचे मुख्य कारण असे आहे की यापैकी बरेच ऑनलाइन डिलिव्हरी प्लॅटफॉर्मस इंधनाच्या वाढत्या किंमतीशी जुळण्यासाठी देय रक्कम वाढविण्यास सक्षम नाहीत. करण बऱ्याच शहरांमध्ये इंधनांच्या किमतींनी 100 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. अश्या वेळेस डिलिव्हरी करणारे पार्टनर्स (भागीरदार) यांना या किमतींशी जुळवून घेणे अवघड झाले आहे.
सध्या नवीनच फंडिंग
झेप्टोसारख्या नवीन स्टार्टला सध्या नवीनच फंडिंग मिळालेली आहे त्यामुळे त्यांना हे अधिकची देयके देणे परवडू शकते. पण स्विगी आणि झोमॅटो अजूनही फायदेशीर तोडगा काढण्यासाठी धडपडत आहेत असे दिसून येत आहे. आकडेवारीनुसार मार्च ते एप्रिल दरम्यान फूड रायडर्समध्ये 10 टाक्यांची ची घट झाली आहे.
इतर पर्यायाचा शोध
इंधन दरवाढीनंतर रेस्टॉरंट्समध्येही व्यवसायात २० टक्क्यांपर्यंत घट दिसून आली आहे. कारण डिलिव्हरी भागीदारांनी अन्नापेक्षा किराणा मालाला प्राधान्य दिले. कोणतेही प्रोत्साहन न मिळाल्यामुळे, कमी मोबदला, महागाई आणि असह्य उष्णता यामध्ये हे गिग कामगार आता इतर पर्याय शोधत आहेत.
जसजसा कोरोनाचा प्रभाव कमी होत आहे, तसतसे अधिक रोजगार उपलब्ध होत आहेत आणि यामुळे अन्न वितरण करणाऱ्या दिग्गजांना उच्च मागण्यांची पूर्तता करणे कठीण होईल. डिलिव्हरीचं काम उपलब्ध झाल्यामुळे अनेकांना रोजगार मिळतो. शिवाय मिळणाऱ्या कमिशनमधून स्विगी, झोमॅटो या कंपन्यांना मोठा नफा होतो. या चक्रात सगळेच खूश असल्याचं चित्र दिसत असलं, तरी प्रत्यक्षात मात्र तसं नाही.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम