Take a fresh look at your lifestyle.

इटालियन फॅलिस बिसलेरी यांची बिसलेरी कंपनी रमेश चौहान यांच्या मालकीची कशी झाली ?

आज भारतात पॅकेज्ड वॉटरचा व्यवसाय 20 हजार कोटी रुपयांहून मोठा आहे आणि बिसलेरी हा यातला सगळ्यात मोठा ब्रँड आहे.

0

काही वर्षांपूर्वीपर्यंत भारतातील मोठ्या लोकसंख्येला बाटलीबंद पाणी एखाद्या वस्तूसारखे विकले जाईल याची कल्पनाही करणं शक्य नव्हतं. भारतातील सुशिक्षित लोकांचा असा समज होता की जगाचा 3 चतुर्थाश भाग पाण्याने व्यापलेला आहे. त्यामुळे पाणी विकत घेऊन प्यावे लागणार नाही.

आज भारतात पॅकेज्ड वॉटरचा व्यवसाय 20 हजार कोटी रुपयांहून मोठा आहे आणि बिसलेरी हा यातला सगळ्यात मोठा ब्रँड आहे.

उन्हाळ्यात बिसलेरीची मागणी इतकी वाढते की मोठ्या शहरांमध्ये खऱ्या बिसलरी ब्रँडची बाटली मिळणे कठीण होते. बिस्लेरीच्या वेबसाईटला भेट दिल्यानंतर असे आढळून आले की पॅकेज्ड वॉटर व्यवसायात बिस्लेरीचा 60% हिस्सा आहे आणि सध्या बिस्लेरीकडे 122 पेक्षा जास्त प्लांट आहेत. पण बिसलेरी कंपनीच्या मालकांनी हा ब्रँड विकायचं ठरवलं आहे.

बिसलेरी कंपनी कोण विकत घेणार आहे?

बिसलेरी कंपनीचे मालक रमेश चौहान म्हणाले की, “बिसलेरी कंपनी विकण्यासाठी अनेक कंपन्यांशी चर्चा सुरू आहे आणि कंपनीची मालकी ते फक्त भारतीय कंपनीलाच देणार आहेत.”

इकॉनॉमिक टाइम्सच्या मते, टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (TCPL) देशातील शक्तिशाली ब्रँड बिस्लेरी खरेदी करू शकते. म्हणजेच टाटा समूह आता चहा, कॉफी, मीठ, डाळींसोबत बाटलीबंद पाणी विकण्याची तयारी करत आहे. मीडिया रिपोर्टनुसार टाटा समूह ‘बिस्लेरी इंटरनॅशनल’ हि कंपनी 6000-7000 कोटी रुपयांना विकत घेऊ शकतो. बिस्लेरीचे सध्याचे व्यवस्थापन 2 वर्षांसाठी कंपनीचा व्यवसाय सांभाळेल, असेही या करारात निश्चित करण्यात आले आहे.

पण बिसलेरीचे मालक रमेश चौहान सांगतात की “आपण कंपनी विकतोय पण कंपनीची किंमत अजून ठरलेली नाही, टाटा ग्रुपला विकण्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की “हे देखील योग्य नाही, फक्त टाटा ग्रुपशीच चर्चा सुरू आहे, असं नाही.”

बिसलेरीचे बिझनेस नेटवर्क किती मोठे आहे?

बिसलेरी कंपनीच्या वेबसाइटनुसार, बिस्लेरीकडे 122 पेक्षा जास्त ऑपरेशनल प्लांट आहेत. भारतात 5,000 ट्रकसह 4,500 पेक्षा जास्त वितरकांचे नेटवर्क आहे. भारतातील पॅकेज्ड वॉटरची बाजारपेठ 20,000 कोटी रुपयांहून अधिक झाली आहे. मिनरल वॉटरसह, बिस्लेरी इंटरनॅशनल प्रीमियम हिमालयन स्प्रिंग वॉटर देखील विकते. टाटा ग्रुपने हा करार पूर्ण केल्यास, टाटा ग्रुप एंट्री लेव्हल, मीड सेगमेंट आणि प्रीमियम पॅकेज्ड वॉटर श्रेणीमध्ये सामील होईल.

रमेश चौहान यांनी याआधीदेखील थम्स अप, लिम्का आणि गोल्ड स्पॉट सारख्या प्रसिद्ध लिक्विड ब्रँड विकले आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार रमेश चौहान यांची मुलगी जयंती हिला या व्यवसायात रस नाही. ‘बिसलेरी इंटरनॅशनल’च्या प्रवक्त्याने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, “कंपनी विकण्याबाबत चर्चा सुरू आहे, अधिक माहिती आत्ताच देता येणार नाही.”

चौहान यांनी थम्स अप, गोल्ड स्पॉट, माझा आणि लिम्का यांसारखी प्रसिद्ध उत्पादने अमेरिकन कंपनी कोका कोलाला विकली आहेत. हा करार 1993 मध्ये झाला होता. 2016 मध्ये चौहान ‘बिसलेरी पॉप’ नावाच्या कंपनीसोबत शीतपेय व्यवसायात उतरले, पण या कंपनीला फारसे यश मिळू शकले नाही.

बिसलेरी कंपनीची सुरुवात एक औषध कंपनी म्हणून करण्यात आली होती. ही कंपनी मलेरियाच्या औषधांचा पुरवठा करत असे आणि तिचे संस्थापक इटालियन व्यापारी फॅलिस बिसलेरी होते. फॅलिसच्या मृत्यूनंतर बिस्लेरी कंपनीला पुढे नेण्याची जबाबदारी त्याच्या फॅमिली डॉक्टर रसी यांनी घेतली.

डॉ.रसी यांनी त्यांचे वकील खुश्रू सांतकू यांच्यासमवेत भारतात बिस्लेरी लाँच केली. 1965 मध्ये त्यांनी ठाणे, मुंबई येथे पहिला ‘बिसलेरी वॉटर प्लांट’ बांधला. बिसलेरी कंपनीने मिनरल वॉटर आणि सोडा घेऊन भारतात प्रवेश केला.

1969 मध्ये बिसलेरी वॉटर प्लांट सुरू झाल्यानंतर 4 वर्षांनी रमेश चौहान यांनी बिसलेरी कंपनी त्यावेळी ₹ 400000 ला विकत घेतली. तेव्हापासून आतापर्यंत या कंपनीची मालकी रमेश चौहान यांच्याकडे आहे. रमेश चौहान 82 वर्षांचे आहेत आणि मीडिया रिपोर्ट्सनुसार त्यांची मुलगी जयंती हिला बिसलेरी कंपनीमध्ये रस नाही, त्यामुळे रमेश चौहान यांना त्यांचा व्यवसाय विकायचा आहे.

बिसलेरी सामान्य लोकांपर्यंत कशी पोहोचली?

बिसलेरी कंपनी सुरुवातीला पंचतारांकित हॉटेल्सपुरती मर्यादित होती. कंपनीला आपले उत्पादन सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवायचे होते. देशातील रेल्वे स्थानके, बसस्थानके, रस्त्यालगत आणि ढाबे, रेस्टॉरंट आणि सार्वजनिक ठिकाणी पिण्याचे पाणी दर्जेदार नसल्याचे कंपनीच्या लक्षात आले.

चांगल्या दर्जाचे पाणी मिळत नसल्याने लोकांना साधा सोडा विकत घेऊन प्यावा लागत आहे. ही संकल्पना लक्षात घेऊन कंपनीने शुद्ध पाणी देण्यासाठी आपल्या वितरकांची संख्या वाढवली. उत्पादनाची विक्री वाढवण्यासाठी कंपनीने प्रमोशन सुरू केले आणि हळूहळू कंपनी बाजारात वेगाने पसरू लागली आणि आज पाण्याच्या बाटल्यांमधील सर्वात शक्तिशाली ब्रँड बिसलेरी आहे.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.