Take a fresh look at your lifestyle.

दूरदर्शनचा चेहरा ते NDTVची स्थापना ते राजीनामा : प्रणव रॉय यांच्या प्रवासाबद्दल

एनडीटीव्हीची होल्डीग कंपनी असलेल्या आरआरपीआरएचच्या संचालक मंडळातून राधिका रॉय आणि प्रणव रॉय यांनी राजीनामा दिला आहे.

0

गेल्या काही महिन्यापासून माध्यम विश्वात सर्वाधिक चर्चेत असलेला विषय म्हणजे न्यूज चॅनल NDTVची मालकी. अखेर अदानी समुहाकडे त्याची पूर्ण मालकी आली आहे. सेबीला आता त्या संदर्भातली माहिती देण्यात आली आहे. त्यात एनडीटीव्हीची होल्डीग कंपनी असलेल्या आरआरपीआरएचच्या संचालक मंडळातून राधिका रॉय आणि प्रणव रॉय यांनी राजीनामा दिल्याचं कळवण्यात आलं आहे.

परिमाणी एनडीटीव्हीचे प्रमोटर राधिका रॉय आणि प्रणव रॉय यांची आता कंपनीवरची मालकी संपुष्टात आली आहे. पण अजूनही रॉय दांपत्याकडे 32.26 टक्के शेअर्स आहेत. परिणामी मालकी संपुष्टात येऊनही रॉय दांपत्य NDTVच्या शेअर होल्डर्समध्ये त्यांचं स्थान राखून आहेत. कमी समभागधारक ठरल्यामुळे आता त्यांच्या म्हणण्याला मात्र तिथं फारसं स्थान नसेल.

राधिका रॉय आणि प्रणव रॉय यांंच्या राजीनाम्यानंतर अदानी समुहाकडून सुदिप्ता भाट्टाचार्य, संजय पुगलिया, सेंथिल चेंगलवरयान यांची तात्काळ आरआरपीआरएचच्या डायरेक्टरपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

या संपूर्ण प्रकरणात प्रणव रॉय यांनी संचालक पदाचा राजीनामा दिला असला तरी डॉ. प्रणय रॉय यांच्याबद्दल जाणून घेणे गरजेचे आहे.

NDTVचे संस्थापक असलेल्या प्रणय रॉय यांना भारतातील खाजगी टीव्ही न्यूज चॅनेलच्या निर्मितीच श्रेय दिल जात. रॉय यांनी दूरदर्शनच्या बातम्यांच्या बाहेर जाऊन अनेक प्रयोग केले. आपल्या कौशल्याच्या जोरावर निवडणूक म्हणजे एनडीटीव्ही असं समीकरण त्यांनी देशभरात तयार केलं होत.

डॉ. प्रणव रॉय हीच व्यक्ती आहे ज्यांनी भारतातील निवडणुका पहिल्यांदा माहितीपूर्ण, मनोरंजक आणि टीव्हीवर लोकप्रिय करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

1990 च्या दशकात दूरदर्शनवरील ‘वर्ल्ड धिस वीक’ (World this Week) आणि ‘न्यूज टुनाईट’ (News Tonight) खूप लोकप्रिय झाले होते. तेव्हा खाजगी वाहिन्यांचा जन्म झाला नव्हता आणि प्रेक्षकांना दूरदर्शनच्या मदतीनेच देशाच्या आणि जगाच्या बातम्यांची माहिती मिळायची. त्या काळात प्रणव रॉय यांनी दूरदर्शनवरील ‘वर्ल्ड धिस वीक’ आणि ‘न्यूज टुनाइट’ या कार्यक्रमांनी प्रेक्षकांमध्ये एक खास ओळख निर्माण केली.

1988 मध्ये प्रणव रॉय यांनी स्थापन केलेले एनडीटीव्ही नावाचे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस सुरु केले आणि तेच पुढे जाऊन एका मोठ्या मीडिया हाऊसमध्ये बदलले.

प्रणव रॉय दूरदर्शनचा पडदा सोडून NDTV वृत्तवाहिन्यांचे मालक आणि संपादक बनले.

असे म्हटले जाते की जेव्हा एनडीटीव्हीची सुरुवात पंतप्रधानांच्या निवासस्थानापासून झाली आणि जेव्हा एनडीटीव्ही त्याच्या स्थापनेचा 25 वा वर्धापन दिन साजरा करत होता तेव्हा त्याला मिळालेली जागा राष्ट्रपती भवन होती.

संपन्न परिवारातला जन्म आणि ब्रिटनमध्ये शिक्षण

कोलकाता येथील एका संपन्न कुटुंबात जन्मलेल्या, आई आयरिश – वडील ब्रिटिश कंपनी अधिकारी डॉ. प्रणव रॉय यांचा जन्म कोलकाता येथे एका उच्चभ्रू बंगाली कुटुंबात झाला. प्रणवचे वडील भारतातील एका ब्रिटीश कंपनीचे वरिष्ठ अधिकारी होते तर आई आयर्लंडची रहिवासी होती आणि एका शाळेत शिक्षिका होती. प्रणव रॉय यांचे शालेय शिक्षण प्रसिद्ध दून स्कूलमध्ये झाले.

त्यानंतर त्यांनी ब्रिटनमध्ये उच्च शिक्षण घेतले. त्याने लंडनमधून सीएचे शिक्षण घेतले. प्रणव रॉय यांनी दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून अर्थशास्त्रात पीएचडी केली आहे. भारतीय टीव्ही न्यूज इंडस्ट्रीतील त्यांचे सहकारी पत्रकार त्यांच्याकडे आदराने पाहतात.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.