Take a fresh look at your lifestyle.

तुमची पेट्रोल गाडी आता इलेक्ट्रिक गाडीमध्ये रूपांतरित करू शकता!

कोणत्याही जुन्या स्कूटरला इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये रूपांतरित करण्याचा एक अनोखा उपक्रम बंगळूरमध्ये सुरू करण्यात आला आहे.

0

देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल १०० रुपये लिटर पार केले आहे, त्यामुळे बरेच लोक आता इलेक्ट्रिक स्कूटरकडे वळत आहेत. अलीकडे, ओला, हिरो, सिंपल एनर्जी सारख्या अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक स्कूटरचे अनेक उत्तम मॉडेल बाजारात आणले आहेत.

यातच मिळालेल्या माहितीनुसार ज्यांना आपल्या पेट्रोलवर चालणाऱ्या गाड्या इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रूपांतरित करायच्या आहेत अशा ग्राहकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.

कोणत्याही जुन्या स्कूटरला इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये रूपांतरित करण्याचा एक अनोखा उपक्रम बंगळूरमध्ये सुरू करण्यात आला आहे.

देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडत आहेत. दिवसेंदिवस इंधनाच्या किंमती वाढू लागल्याने जनताही त्रस्त झाली आहे. पेट्रोल आणि डिझेल यांवर पर्याय म्हणून आता इलेक्ट्रिक वाहने समोर येण्यास सुरुवात झाली आहे.

चारचाकी वाहनांमध्ये भारतात टाटा आणि इतर काही कंपन्यांच्या इलेक्ट्रिक कार दाखल झालेल्या आहेत.

देशभरात अनेक ठिकाणी इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन्स देखील स्थापित करण्यात आले आहेत.

सर्वप्रथम पायलट प्रोजेक्ट म्हणून जुन्या पारंपरिक स्कूटरला इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये रूपांतरित करण्यास सुरुवात केली गेली होती. मात्र या संदर्भातील मागणी वाढल्याने नक्कीच ही मोठी बाजारपेठ ठरू शकते असे कंपनीच्या लक्षात आले. काही नवीन कंपन्यांनी देखील असे प्रकल्प करण्यास सुरुवात केली आहे ज्यामध्ये एट्रिओ आणि मेलाडाथ ऑटोकॉम्पोनंटचा समावेश आहे.

फक्त २० हजार रुपये आकारण्यात येणार

यासाठी कंपनीकडून जास्त पैसे देखील आकारण्यात येणार नाहीत. एवढंच काय तर एक कंपनी हायब्रिड स्कूटरही बनवत आहे. बंगळूरमध्ये राईड शेअरिंग सेवा पुरवणाऱ्या बाऊन्सन या स्टार्टअप कंपनीने अशीच एक योजना सुरू केली आहे.

ही कंपनी कोणत्याही जुन्या दहन इंजिन (पेट्रोल) स्कूटरला इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये इलेक्ट्रिक मोटर आणि बॅटरी बसवून रूपांतरित करते. यासाठी फक्त आणि फक्त २० हजार रुपये आकारण्यात येणार आहे.

एक हजाराहून अधिक जुन्या स्कूटरचे इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये रूपांतर

बाउन्सन कंपनीने आतापर्यंत एक हजाराहून अधिक जुन्या स्कूटरचे इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये रूपांतर केले आहे. हॅलेकरेंनी यांनी सांगितले आहे की, कंपनी या स्कूटर मालकांसाठी सेवा केंद्र देखील उघडत आहे.

या स्कूटरमध्ये येणाऱ्या बॅटरी किटमुळे स्कूटर एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ६५ किमी पर्यंत चालवता येते. ते म्हणाले की, हे किट ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाकडून प्रमाणित आहे.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.