Take a fresh look at your lifestyle.

सत्काराला महिला आल्या अन् तुकाराम मुंडेंवर विनयभंगाची तक्रार करायला पोलीस चौकीत गेल्या

तुकाराम मुंढे यांनी आपल्या जीवनांतील किस्से सांगताना एकदा एका पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात "प्रशासन सेवा : कल्पना आणि वास्तव" या व्याख्यानमालेत हा किस्सा सांगितला होता.

0

आपल्याला माहिती आहे की तुकाराम मुंढे हे खूप शिस्तबद्ध अधिकारी आहे. पण एवढेच नव्हे तर नोकरीमध्ये रुजू होण्याच्या आधी जो ट्रेनिंग चा कालावधी असतो तेव्हा देखील तुकाराम मुंढे यांनी आपली शिस्त दाखवली होती.

स्पर्धा परीक्षामधून जे विद्यार्थी अधिकारी म्हणून निवडले जातात त्यांचे म्हैसूर येथे ट्रेनिंग होत असते. यामध्ये सुरुवातीचे ८ महिने म्हैसूरला ट्रेनिंग असते आणि त्यानंतर त्या अधिकाऱ्यांना फिल्डवर पोस्टिंग दिली जाते. पुन्हा ४ महिने उर्वरित ट्रेनिंग हि म्हैसूर येथे होत असते.

३०० ते ४०० लोकांचं अतिक्रमण काढून टाकलं

ट्रेनिंग मध्ये २००५ साली तुकराम मुंढे यांची बार्शी नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवड झाली होती. तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते विलासराव देशमुख. सेवेत लागू झाल्यावर ३ ते ४ दिवसातच तुकाराम मुंढे यांनी बार्शी नगरपालिकेमधील अतिक्रमण हटवायला सुरुवात केली.

त्याचवेळी विधानसभेचं उन्हाळी अधिवेशन देखील सुरु होत. आणि नेमक त्यांनी सोमवारी ज्या दिवशी अधिवेशन सुरु होणार होते त्या दिवशी सकाळी अतिक्रमण काढायला सुरुवात केली आणि संध्याकाळ पर्यंत ३०० ते ४०० लोकांचं अतिक्रमण काढून टाकलं होत.

मुंढे यांनी नकार दिला

त्याच दिवशी संध्याकाळी तिथले स्थानिक आमदार ५००० ते ६००० लोक घेऊन त्यांच्या ऑफिस समोर हजर झाले. ते आमदार चर्चा करण्यासाठी तुकाराम मुंढे यांच्या चेंबर मध्ये गेले आणि तुकाराम मुंडे यांना ते म्हणाले की हे अतिक्रमण तुम्ही काढू नका. त्यावर तुकाराम मुंढे यांनी आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे त्या आमदारांना नकार दिला.

पण त्या आमदारांनी तुकाराम मुंडे यांच्या चेंबर च्या बाहेर येऊन लोकांना सांगितलं की तुकाराम मुंढे यांनी आता अतिक्रमण न पाडण्याचं आश्वासन दिलय. पण तुकाराम मुंढे यांनी नकार दिला नसल्याने त्यांनी रात्रीची मुंबईची रेल्वे पकडली आणि अधिवेशनाला निघून गेले.

आमदारांनी विधानसभेत गोंधळ घातला.

दुसऱ्या दिवशी पुन्हा तुकाराम मुंढे यांनी अतिक्रमण काढलं आणि मग त्यादिवशी विधानसभा चालू असल्याने सकाळपासूनच प्रश्न उत्तराच्या तासात त्या आमदारांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. कोण आहेत हे नवीन अधिकारी ? कोणाचाच ऐकत नाही ? तात्काळ त्यांना निलंबित करा अस म्हणत त्या आमदारांनी विधानसभेत गोंधळ घातला.

तुकाराम मुंढे यांनी इकडे अतिक्रमण काढण्याचा सपाटाच लावला होता. अश्यातच त्यांना तत्कालीन जिल्हाधिकारी यांचा फोन आला आणि ते तुकाराम मुंढे याना ते म्हणाले की अतिक्रमण कुठं पर्यंत आल आहे? त्यावर तुकाराम मुंढे यांनी सांगितलं की अतिक्रमण काढणं चालूच आहे.

त्यावर जिल्हाधिकारी त्यांना म्हटले जास्त गोंधळ करू नका लवकरात लवकर काढून घ्या. तर तुकाराम मुंढे यांनी सोमवारी जे अतिक्रम चालू केला होता ते गुरुवारी पर्यंत म्हणजेच जवळपास ४ दिवसात १५०० अतिक्रमण बार्शी च्या रस्त्यावरचे मोकळे केले होते.

वातावरण तापलेल होत. त्यामुळे तुकाराम मुंढे यांना संरक्षण देण्यात आले होते.

अतिक्रमण काढून पूर्ण झालेल होत आणि तुकाराम मुंढे हे त्यांच्या चेंबर मध्ये बसलेले होते. त्याच वेळी ५ ते ६ महिला या त्यांच्याकडे आल्या आणि त्या म्हंटल्या की तुम्ही हे अतिक्रमण काढून खूप चांगल काम केल आहे आम्हाला तुमचा सत्कार करायचा आहे.

पण संरक्षणाला असलेल्या गार्डसनी त्या महिलांना आत चेंबर मध्ये प्रवेशच दिला नाही. आणि तुकाराम मुंढे यांनी कारण विचारले असता त्या गार्डसनी सांगितले. आम्हाला तशा ऑर्डर आहेत आणि प्रोटोकॉल असल्याने तुकाराम मुंढे यांनी देखील त्या गार्डसच ऐकलं.

दुसऱ्या दिवशी १२ वाजता तुकाराम मुंढे यांना तत्कालीन डिवायएसपीचा फोन आला आणि ते म्हणाले तुम्ही गोपीनाथ मुंढे यांच्याशी बोलू शकता का ? त्यावेळी तुकाराम मुंढे यांनी किस्सा सांगताना सांगितले की मी त्यांना ओळखायचो. पण माझे एवढे चांगले संबंध नाही की मी त्यांना डायरेक्ट फोन करेल. असे देखील तुकाराम मुंडे त्या डिवायएसपी म्हणाले.

डिवायएसपी म्हंटले ठीक आहे. त्यानंतर पुन्हा १ वाजता डिवायएसपी यांचा तुकाराम मुंढे यांना फोन आला आणि ते म्हणाले विषय मिटला आहे. ते म्हणाले त्यांची तत्कालीन एसपी आणि मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची त्यासंदर्भात मीटिंग झाली आहे आणि आता विषय मिटला आहे.

तुकाराम मुंढे यांना वाटलं जर मुख्यमंत्री या विषयात पडले म्हणजे काहीतरी मोठा विषय झाला आहे. त्यावर न राहून त्यांनी डिवायएसपी यांना विचारलं नेमक झालय काय ? त्यावर डिवायएसपी म्हंटले काही नाही पोलीस स्टेशन ला तुमच्या विरुद्ध एफआयआर करायला काही महिला आल्या होत्या.

त्यावर तुकाराम मुंढे यांनी विचारले कसला गुन्हा तर डिवायएसपी म्हंटले त्यांना दोन गुन्हे दाखल करायचे आहेत. एक म्हणजे ऍट्रॉसिटी आणि दुसरा गुन्हा विनयभंगाचा. त्यावर तुकाराम मुंढे हे एकदम अस्वस्थ झाले आणि म्हणाले मी तर अश्याप्रकारचे कोणतेच कृत्य केलेलं नाही ज्यामुळे माझ्यावर अशे गुन्हे दाखल होतील.

गार्डस नी त्यांना आत नाही येऊ दिल

त्यावर डिवायएसपी त्यांना म्हणाले तुमच्या ऑफिस मध्ये तुमचा सत्कार करण्यासाठी कोणी आला होता का ? त्यावर तुकाराम मुंढे यांनी सांगितलं कि हो कोण तरी आला होत पण गार्डस नी त्यांना आत नाही येऊ दिल. डिवायएसपी यांनी त्यांना सांगितलं की ह्या त्याच महिला होत्या ज्या तुमच्या विरुद्ध फआयआर करायला आल्या.

त्यांचा प्लॅन असा होता की सत्कार करण्याच्या दृष्टीने चेंबर मध्ये जायचे आणि कपडे फाडायचे आणि त्याच फोटोशूट करायचे . हे कळताच तुकाराम मुंढे हे अर्धा तास डोक्याला हात लावून बसले होते . तो प्रसंग माझ्या जीवनातील टर्निंग पॉईंट होता असा तुकाराम मुंढे सांगतात . समजा त्या गार्डस नी त्या महिलांना आता चेंबर मध्ये जाऊ दिले असते तर काय घडले असते हा प्रश्न देखील तुकाराम मुंढे यांनी व्याख्यानमालेत विचारला होता.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.