Take a fresh look at your lifestyle.

अरमान कोहलीने चित्रपट नाकारला; त्याच चित्रपटामुळे शाहरुख सुपरस्टार बनला

बॉलिवूड अभिनेता आणि बिग बॉस 7 चा स्पर्धक राहिलेल्या अरमान कोहलीला त्याच्या जुहू स्थित घरातून अटक करण्यात आली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने छापेमारी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

0

बॉलिवूड अभिनेता आणि बिग बॉस 7 चा स्पर्धक राहिलेल्या अरमान कोहलीला त्याच्या जुहू स्थित घरातून अटक करण्यात आली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने छापेमारी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. अभिनेता अरमान कोहलीच्या घरातून ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. एनसीबीच्या मुंबई ब्रांचद्वारे ही कारवाई करण्यात आली आहे.

अरमान कोहली याने 1992 साली आलेल्या ‘विरोधी’ या सिनेमातून डेब्यू केला होता. यानंतर 10 वर्षाने त्याने “जानी दुश्मन, एक अनोखी कहानी’ मधून कमबॅक केलं. यामध्ये त्याने मुख्य खलनायकाची भूमिका निभावली होती. त्याचा हा अवतार चाहत्यांच्या पसंतीस उतरला होता. त्यानंतर अरमानने विशेष चित्रपट केले नाही. बिग बॉस 7 मध्ये तो स्पर्धक होता. यावेळी त्याने विशेष प्रसिद्धी मिळवली होती.

मी स्टार बनण्यामागे अरमान कोहलीचा हात आहे

अरमानच्या अटकेनंतर शाहरुख खानचं एक जुनं वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये शाहरुखने असं म्हटलं होतं की अरमान कोहलीमुळे तो सुपरस्टार बनला आहे. 1992 साली आलेल्या ‘दिवाना’ सिनेमातून शाहरुख खानने बॉलिवूड डेब्यू केला होता. शाहरुखची जी भूमिका होती ती आधी अरमान कोहलीला ऑफर करण्यात आली होती.

अरमानने या सिनेमासाठी होकार देखील दिलास होता, इतकंच नव्हे तर त्याचा फोटो असणारं सिनेमाचं पोस्टर देखील छापण्यात आलं होतं.

मात्र काही कारणामुळे त्याने नंतर सिनेमा करण्यास नकार दिला आणि हा सिनेमा शाहरुखला ऑफर झाला. त्यानंतर शाहरुखची कारकीर्द सर्वांनाच माहित आहे. या सिनेमाने बॉलिवूडला एक मोठा सुपरस्टार दिला.

दिवानामध्ये शाहरुखने केवळ काम केलं नाही तर हा सिनेमा सुपरहिट देखील झाला. 2016 साली ‘यारों की बारात’या शोमध्ये शाहरुखने या टप्प्यापर्यंत पोहोचण्याचे श्रेय अरमान कोहलीला दिले होते.

शाहरुखने या शोमध्ये असं म्हटलं होतं की, ‘मी स्टार बनण्यामागे अरमान कोहलीचा हात आहे. तो दिवंगत दिव्या भारतीसह बनलेल्या ‘दिवाना’च्या पोस्टरवर देखील होता.

अरमान कोहली वरील प्रेमाच्या नादात तिचे करिअर संपून गेले

1990 मधील ‘कुर्बान’ नावाच्या चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये डेब्यू केला. या चित्रपटात सलमान खान तिचा नायक होता. या चित्रपटामुळे तिला बॉलीवूडमध्ये ओळख मिळाली आणि तिचे करिअर सुरू झाले.

तिने त्यानंतर अनेक मोठ्या स्टारसोबत काम केले. ‘कुर्बान’च्या सफलतेनंतर अब्बास-मस्तान यांची ‘खिलाडी’ ही आणखी एक सुपरहिट फिल्म तिने केली. तर त्याच वर्षी म्हणजे 1992 मध्ये आमीर खानबरोबरच्या तिच्या ‘जो जीता वही सिकंदर’ या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे कौतुक झाले. हा चित्रपट सुपरहिट झाला नसला तरी त्यातील गाणी खूपच गाजली.

त्यानंतर तिने मिथून चक्रवर्ती यांच्यासह ‘मेहरबान’, ‘दलाल’ (1993), अजय देवगणसोबत ‘संग्राम’ (1993) तर अक्षय कुमार, सुनील शेट्टीसोबत ‘वक्त हमारा है’ (1993) यासारखे चित्रपट केले. ज्यामुळे ती सफल अभिनेत्री म्हणून ओळखली जाऊ लागली.

अक्षय कुमारशी तिचे नाव जोडले गेले. ही सफल अभिनेत्री बॉलीवूडमध्ये पुढे अनेक वर्षे काम करेल, असे वाटत असतानाच 1997 नंतर मात्र तिच्या करिअरचा वेग मंदावला. तिचे तिच्या करिअरकडे दुर्लक्ष होऊ लागले.

त्याचे कारण म्हणजे आयेशा अभिनेता अरमान कोहली याच्या प्रेमात पडली होती.

या नादात तिने करिअरबाबत विचार करणे सोडून दिले. त्यानंतर पुढे अरमानशी तिचे ब्रेकअपही झाले आणि तोपर्यंत तिचे चित्रपटातील करिअरही संपून गेले होते.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.