प्राजक्तानं 2011 साली ‘सुवासिनी’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं
दिग्दर्शक अभिजित पानसे पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊन प्रेक्षकांनाच्या भेटीला येत आहेत. पानसे यांच्या ‘रानबाजार’ या वेबसिरीजचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा टीझर पाहून मराठी सिनेसृष्टीतला आतापर्यंतचा सर्वात बोल्ड टीझर असल्याचं स्पष्ट होत आहे.
मराठी सिनेसृष्टीत आजवरची सर्वात बोल्ड वेबसिरीज लवकरच प्रदर्शित होणार आहे. या वेबसिरीजमुळे मराठी सिनेसृष्टीत नक्कीच हादरा बसेल हे नक्की.
‘रानबाजार’ या सीरिजचा टीझर प्राजक्ता माळीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.
View this post on Instagram
यात प्राजक्ता माळी अतिशय बोल्ड अंदाजात इंटीमेट सीन देत आहे. टीझरच्या बॅकग्राऊंडला महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सुरू असल्याचं ऐकू येतं.
दिग्दर्शक अभिजित पानसे पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊन प्रेक्षकांनाच्या भेटीला येत आहेत. पानसे यांच्या ‘रानबाजार’ या वेबसिरीजचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा टीझर पाहून मराठी सिनेसृष्टीतला आतापर्यंतचा सर्वात बोल्ड टीझर असल्याचं स्पष्ट होत आहे. सत्य घटनांच्या संदर्भांवर आधारित या वेबसिरीजमध्ये आजवर कधीही न पाहिलेली गोष्ट पाहायला मिळणार आहे.
प्राजक्ता माळी हिने देखील ‘रानबाजार’चा दुसरा टीझर शेअर करत म्हटलं आहे की, ‘प्रत्येक कलाकाराला आपल्या कारकिर्दीत विविधांगी भूमिकांमध्ये झळकण्याची, समाजात अस्तित्वात असणारी विविध पात्रं साकारण्याची, सतत काहितरी नवं करण्याची इच्छा असते. मी त्याला अपवाद नाही.
लहानपणापासून स्मिता पाटील, रंजना यांना बघत मोठी झाले, (मी त्यांच्याइतकी मोठी नक्कीच नाही.) पण त्यांच्या कारकिर्दीतून प्रेरीत होऊन आणि तुम्हां मायबाप रसिक प्रेक्षकांवर विश्वास ठेवून केलेला हा प्रयत्न.’
छोट्या पडद्यावर पदार्पण
प्राजक्तानं 2011 साली ‘सुवासिनी’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. या मालिकेत तिनं सावित्री ही व्यक्तिरेखा साकारली होती. त्यानंतर ती ‘जुळून येती रेशिम गाठी’, ‘नकटिच्या लग्नाला यायचं हं’ या मालिकांमध्ये काम केलं. ‘जुळून येती रेशिम गाठी’ या मालिकेत तिनं साकारलेल्या ‘मेघा देसाई’ या व्यक्तिरेखेला प्रचंड लोकप्रियता मिळाली.
याच लोकप्रियतेच्या जोरावर तिला ‘खो-खो’, ‘संघर्ष’, ‘हंपी’, ‘…आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्येही काम करण्याची संधी मिळाली. सध्या ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी शोमध्ये होस्टच्या भूमिकेत झळकत होती.
महाराष्ट्राची संस्कृती आणि वैभव सर्वांसमोर आणली
मस्त महाराष्ट्र या कार्यक्रमातून तिने महाराष्ट्राची संस्कृती आणि वैभव सर्वांसमोर आणली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील गावागावांमध्ये फिरली. तेथीली संस्कृती आणि खाद्यसंस्कृतीवर तिने व्लॉग्ज केले. अर्थातचं तिला फिरायचीही आवड आहे. प्राजक्ता माळी जुळून येती रेशिमगाठी या मालिकेतून घराघरात पोहोचली. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून तिने प्रचंड लोकप्रियता मिळवलीय.
प्राजक्ता माळीचं ट्रान्स्फॉर्मेशन पाहून तुम्हालाही विश्वास नाही बसणार. मराठी कलाविश्वात तिने आपली एक वेगळी प्रतिमा निर्माण केलीय. तिला कुठलीही भूमिका दिली तरी ती त्या भूमिकेत परफेक्ट बसते. मालिकेच्या कथानुसार जसे पात्र असेल त्यानुसार भूमिका साकारणं आव्हानात्मक असतं. ते लिलया पेलण्याच काम प्राजक्ताने केलं आहे.
प्राजक्ताला चक्क झाडूने चोप दिला होता
लहानपणापासूनच तिला लिहिण्याची प्रचंड आवड होती. त्यामुळे ती रोजनिशी लिहायची. दरम्यान तिची एक डायरी आईच्या हातात लागली. त्यामधील काही गोष्टी वाचून आई इतकी संतापली की तिने प्राजक्ताला चक्क झाडूने चोप दिला होता.
या प्रकारानंतर प्राजक्तानं रोजनिशी लिहिणं थांबवलं. किमान कुलूपबंद कपाट मिळेपर्यंत रोजनिशी लिहायची नाही असा जणू तिने निर्धारच केला होता.एका कार्यक्रमात आपल्या काव्यसंग्रहाबद्दल सांगताना तिने एक चकित करणारा गमतीशीर किस्सा सांगितला. त्यावेळी प्राजक्ता 11 वीत होती.
उगाचच बोल्डनेस नको…म्हणून वेबपासून लांब ‘वेब सीरिजसाठी विचारणा झाली; पण अनावश्यक बोल्ड सीनमुळे त्यात दिसले नाही’, असं सांगून प्राजक्ता म्हणते, ‘बोल्ड दृश्यांमुळेच मी आतापर्यंत वेब सीरिजमध्ये दिसले नाही.
बोल्डनेस कथेची गरज असेल, तर ठीक आहे. उगाच त्यामुळे प्रेक्षक वाढतील असं लॉजिक लावलं जात असेल, तर ते कळणं अवघड आहे. अस प्राजक्ता माळीने एका मुलाखतीत सांगितलं होत.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम