२ लाखांचे कर्ज काढून सुरु केला वडापावचा धंदा आज १०० कोटींचे मालक
धीरज गुप्ता यांचा जम्बोकिंग वडापाव पुर्ण महाराष्ट्रात खुप फेमस आहे. साध्या वडापावपेक्षा हा वडापाव २० टक्के मोठा असतो. म्हणून याला जम्बो वडापाव असे म्हटले जाते.
कोरोना अनलॉक नंतर सर्वच व्यवसायांची गाडी हळूहळू रुळावर येत आहे. रेस्टॉरंट खुली झाली आहेत. सर्वतोपरी काळजी घेऊन खाद्यविक्रेत्यांनी दुकानं सुरु केली आहेत. पुन्हा एकदा सर्वांची पावलं वडापावकडे वळू लागली आहेत.
लॉकडाऊनमध्ये जिभेची चटक पुरवण्यासाठी तात्पुरते घरी वडे तळले गेले. मात्र अनलॉकनंतर वडापावच्या गाड्या पुन्हा बहरु लागल्या आहेत. अश्यातच जम्बोकिंगला विसरून चालणार नाही.
वडापाव हे चार अक्षरी शब्द वाचूनसुद्धा कोणाच्याही तोंडाला पाणी सुटतं. तुमच्यापैकी अनेकांची जीभ आताही वळवळली असेल.
वडा आणि पाव हे दोन पदार्थ जणू एक दुजे के लियेच बनले आहेत. मुंबईकरांसाठी वन मील फूड असलेला वडापाव अल्पावधीतच लोकप्रिय झाला. लोकल टू ग्लोबल हा शब्द रुजण्याआधीच या इंडियन बर्गरने फक्त देशभरात नाही, तर इंग्रजांच्या मेन्यूकार्डमध्येही नाव कमावलं.
बारा रुपयांपासून पाचशे रुपयांपर्यंत किंमतची सॉलिड रेंज असलेला हा कदाचित एकमेव भारतीय खाद्यपदार्थ असेल. वडापावला ब्रँड व्हॅल्यू देणाऱ्या अग्रणी कंपन्यांपैकी एक म्हणजे जम्बो वडापाव. कागदात बांधून मिळणाऱ्या वडापावला बटरपेपरमध्ये गुंडाळलं जाण्याचा मान कसा मिळाला, याची ही सक्सेस स्टोरी.
सुरुवातीपासूनच खवय्यांचा चांगला प्रतिसाद
जर तुम्ही मुंबईला गेलात आणि तिथे जाऊन वडापाव खाल्ला नाही तर तुमची मुंबईची वारी फेल ठरली असं समजा. याच वडापावची लोकप्रियता एका माणसाने ओळखली आणि १०० चौरस फुटात जम्बोकिंग वडापावचे दुकान सुरू केले होते.
2001 मध्ये जम्बोकिंगची स्थापना झाली. धीरज गुप्ता हे जम्बोकिंगचे संस्थापक. जम्बोकिंगच्या वडापावला सुरुवातीपासूनच खवय्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
उलाढाल आता १०० कोटी रूपयांच्या घरात
मॅकडोनाल्डच्या बर्गरला प्रेरित होऊन त्यांच्या डोक्यात ही आयडिया आली होती. जंबोकिंग चालू करण्यासाठी त्यांनी दोन लाख रूपये कर्ज घेतले होते. त्यानंतर मालाड रेल्वे स्थानकाबाहेर त्यांनी ११० चौरस फुटात व्यवसाय सुरू केला होता.दोन लाखांमध्ये सुरु झालेल्या या व्यवसायाची उलाढाल आता १०० कोटी रूपयांच्या घरात आहे.
पुढील लक्ष्य १८० आउटलेट्स
धीरज गुप्ता यांचा जम्बोकिंग वडापाव पुर्ण महाराष्ट्रात खुप फेमस आहे. साध्या वडापावपेक्षा हा वडापाव २० टक्के मोठा असतो. म्हणून याला जम्बो वडापाव असे म्हटले जाते. याच्या शाखा तुम्हाला महाराष्ट्रातील अनेक शहरात पाहायला मिळतील.
त्यांच्या सध्या ११४ फ्रेंचायजी आहेत. त्यांचे पुढील लक्ष्य १८० आउटलेट्स आहेत. मार्च २०२२ पर्यंत हे आउटलेट्स चालू करण्याचे त्यांचे धेय आहे.
बर्गरला प्रेरित होऊन ही आयडिया आली
मॅकडोनाल्डच्या बर्गरला प्रेरित होऊन त्यांच्या डोक्यात ही आयडिया आली होती. जंबोकिंग चालू करण्यासाठी त्यांनी दोन लाख रूपये कर्ज घेतले होते. त्यानंतर मालाड रेल्वे स्थानकाबाहेर त्यांनी ११० चौरस फुटात व्यवसाय सुरू केला होता. त्यांनी आपला वडापाव बाजारात मिळणाऱ्या वडापावपेक्षा वेगळा कसा बनवता येईल याकडे लक्ष दिले.
त्यामुळे त्यांनी वडापावचा आकार आणि चवही बदलली. धीरज गुप्ता यांनी मिठाईचा व्यवसाय करण्याचाही निर्णय घेतला पण त्यांचा हा व्यवसाय चालला नाही.पण त्यांचा वडापावचा व्यवसाय खुप लोकप्रिय झाला आहे.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम