Take a fresh look at your lifestyle.

२०१९ ला सत्तानाट्याच्या वेळेस सर्व आमदारांची हॉटेलमधली जवाबदारी अनिल परब यांच्यावर होती

मागच्या काही दिवसात राज्यात घडलेली महत्वाची मोठी घटना म्हणजे केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणे यांना केलेली अटक. या अटकेमागे नक्की कोणाचा हात आहे. अश्या चर्चा रंगल्या आहेत

0

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओचा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना झालेल्या अटकेशी संबंध जोडला जातो आहे. हा व्हिडिओ रत्नागिरीचे पालकमंत्री असणाऱ्या अनिल परब यांच्या मंगळवारच्या (24 ऑगस्ट) पत्रकार परिषदेतील असल्याचे सांगितले जात आहे.

पत्रकार परिषदेत फोन आल्यानंतर अनिल परब यांनी सुरु असलेली पत्रकार परिषद थांबवली. परंतू, तिथे असलेल्या माईकमुळे परब यांचे बोलणे रेकॉर्ड झाले. या पत्रकार परिषदेत परब यांना दोन वेळा फोन आला. पहिला फोन त्यांना आला होता. तर दुसरा फोन त्यांनी केला होता. या फोन कॉलदरम्यान अनिल परब आणि संबंधित पोलीस अधिकारी यांच्यात बोलणे झाल्याचा दावा केला जात आहे.

कोण आहेत अनिल परब ?

अनिल परब आपल्या तरुण वयात शिवसेनेत सक्रीय झाले. त्या काळात विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून जी आंदोलनं व्हायची, त्यात अनिल परब यांचा पुढाकार असायचा. 2001 साली पहिल्यांदा ते शिवसेनेचे विभाग प्रमुख झाले. तिथून त्यांची खऱ्या अर्थाने राजकीय प्रवासाची सुरवात झाली. शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार दिवंगत मधुकर सरपोतदार यांच्या ते अत्यंत जवळचे मानले जायचे.

शिवसेनेची कायद्याची बाजू सांभाळणारे अनिल परब हे मागील २० वर्षांपासून शिवसेनेत कार्यरत आहेत. अनिल दत्तात्रय परब असे त्यांचे पूर्ण नाव असून परब यांनी आपले बी.कॉमचे शिक्षण पुर्ण केल्यानंतर एलएलबीचं (वकिली) शिक्षण पुर्ण केले आहे.

अनिल परब यांनी वकिली करता नेहमी सामाजिक कार्यक्रम आणि सार्वजनिक उत्सवाचे आयोजन, गरीब विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाचे वाटप अशा कार्यक्रमातून हळू हळू राजकारणात येवू लागले. विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय झाल्यानंतर अनिल परब यांच्या पुढाकारामध्ये विद्यार्थी सेनेची अनेक आंदोलने झाली. अनिल परब राजकारणात रुळू लागले.

२००१ मध्ये अनिल परब यांच्यावर शिवसेनेचे विभाग प्रमुख म्हणून जाबाबदारी देण्यात आली आहे.

अनिल परब यांनी २००१ पासून ते २००४ पर्यंत शिवसेनेत महत्त्वाच्या भूमिकांची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली. अनिल परब यांनी केलेल्या कामाची दखल घेत त्यांना २००४ साली विधानपरिषदेवर पाठवण्यात आले. यानंतर सलग २००४ ते २०१८ पर्यंत विधानपरिषदेतील कामकाज पाहत आले आहेत.

2015 साली अनिल परब हे प्रकाशझोतात आले. जानेवारी 2015 मध्ये वांद्रे पश्चिमचे आमदार बाळा सावंत यांचं निधन झालं. त्या पोटनिवडणुकीत शिवसेनेकडून बाळा सामंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना उमेदवारी देण्यात आली. त्यावेळी कॉंग्रेसकडून नारायण राणे हे रिंगणात उतरले.

राणे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे शिवसेनेसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली. तृप्ती सावंत यांच्या प्रचाराची संपूर्ण जबाबदारी अनिल परब यांच्यावर देण्यात आली होती. तृप्ती सावंत विरूद्ध राणे यापेक्षा शिवसेना विरूद्ध राणे असा संघर्ष वांद्र्यात रंगला होता. या निवडणुकीत नारायण राणे यांना पराभूत करण्यात शिवसेना यशस्वी ठरली. त्यामुळे अनिल परब यांच्यावरचा विश्वास वाढत गेला.

सर्व विजयी आमदारांची जवाबदारी अनिल परब यांच्यावर होती

अनिल परब सध्या महाविकास आघाडी सरकारमध्ये परिवहन मंत्री पदाचा कार्यभार पाहत आहेत. अनिल परब यांच्या मागे मोठा जनाधार नसतानाही त्यांच्यावर मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. महाविकास आघाडी सत्तेत येत असताना आमदारांना सुरक्षित स्थळी ठेवण्यात आले होते. यावेळी विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापन करण्यासाठी मोठे नाट्य आणि नाट्यमय घडामोडी रंगत होत्या.

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पहाटे शपथविधी पार पडला. त्यानंतर अजित पवार हे राजीनामा देऊन पुन्हा महाविकास आघाडीत परतले. त्यानंतर आमदार फुटू नयेत म्हणून त्यांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आले.

आमदार फुटू नये यासाठी सर्व विजयी आमदारांना एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. अनिल परब यांनाही हॉटेलध्ये ठेवण्यात आले होते. अनिल परब सर्व आमदारांची परिस्थिती सांभाळत होते. अनिल परब यांना दिलेली जबाबदारी ते नेहमी चोखपणे पार पाडत आले असल्यामुळे त्यांना राज्य सरकारमध्ये महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे.

मागच्या काही दिवसात राज्यात घडलेली महत्वाची मोठी घटना म्हणजे केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणे यांना केलेली अटक. या अटकेमागे नक्की कोणाचा हात आहे. अश्या चर्चा रंगल्या आहेत. यामध्ये अनिल परब यांचाच मुख्य सहभाग होता. अश्या चर्चां सुरु आहेत.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.