Take a fresh look at your lifestyle.

मोबाईल कंपन्यातील नंबर वन असलेली नोकिया कंपनी स्मार्टफोनमध्ये फेल का झाली

अँड्रॉईड आणि अॅपल बाजारात आले. त्यावर लाखो अॅप्स तयार होत होते आणि नोकिया मागे पडू लागली.

0

मोबाईल हा आपल्या जगण्याचा अविभाज्य घटक बनत चालला आहे. अँड्रॉईडच्या या जमान्यात मोबाईलचे अनेक ऑप्शन उपलब्ध आहेत कि विचारू नका. पण काही वर्षापूर्वीचा काळ तुम्हाला आठवत असेल आपल्या घरात किंवा आपल्या परिसरात कुणाकडेही मोबाईल उपलब्ध असला तर तो नोकिया कंपनीचा मोबाईल दिसायचा.

पण जेव्हा बाजारात अँड्रॉईड मोबाईल आले आणि नोकिया मार्केटमधून पूर्ण बंद झाला.

यशाच्या एवढ्या शिखरावर जाऊनसुद्धा नोकिया कंपनी कशी आणि का फेल झाली, गुगल अँड्रॉईड आणि अॅपलला नोकियाला कसं संपवलं याची कहाणी आज आपण जाणून घेणार आहोत.

2008 साली 450 मिलियन हँडसेट विकल्यानंतर जगात नोकिया फेमस झाली. परंतु अचानक अमेरिका आणि युरोपीयन देशात अँड्रॉईड आणि गुगलची एन्ट्री झाली. तिथं नोकिया डाऊन झाली. परंतु इमर्जिंग एशियन मार्केटमध्ये सर्वकाही ठीक होतं.

नोकियाला यातून बदलाचे संकेत मिळाले होते. परंतु नोकियानं याकडे लक्ष दिलं नाही.

इंटरनॅशनल मार्केटमध्ये गुगल आणि अॅपलचा जन्म झाला. भारत आणि चीन मध्ये सॅमसंग, मोटोरोला यांनी फ्लिप फोनचे नवीन मॉडेल लाँच केले. अमेरिकेन आणि युरोपीयन मार्केटमध्ये अॅपल आणि गुगल आणि आशियाई मार्केटमध्ये सॅमसंग मोटोरोला आले.

लोकांना हे वेगळं वाटू लागलं. नोकियाला लगेच बदल करणं अवघड झालं. 2009-10 साली अॅपल आणि गुगलनं नोकियाची हालत खराब केली होती.

टेलिकॉम हँडसेट डिव्हाईसची तयारी केली

1865 साली फिनलँडमध्ये स्थापन झालेली मल्टीनॅशनल कंपनी नोकिया अनेक प्रकारच्या बिजनेसमध्ये होती. कम्युनिकेशन, इंफर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कंज्युमर इलेक्ट्रॉनिक्समध्ये असलेली कंपनी पाहता पाहता जगातील सर्वात मोठी कंपनी बनली होती. मोबिरा नावाच्या टेलिफोनिक कंपनीला नोकियानं सर्वात आधी खरेदी केलं ज्याद्वारे त्यांनी टेलिकॉम हँडसेट डिव्हाईसची तयारी केली होती.

मोबाईल फोन म्हणजे नोकिया

1994 साली आलेल्या नोकिया 2100 या फीचर फोनला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. कंपनीनं 4 लाख फोन विकण्याचा विचार केला होता. परंतु त्यांनी 2 कोटींचा बिजनेस केला. नोकिया जसजशी तयारी करत होती. मार्केट साईज ग्रो करत होती. मोटोरोलाला मागे टाकत ही कंपनी नंबर एकवर आली. जणू काही मोबाईल फोन म्हणजे नोकिया .

हार्डवेअर नव्हे तर सॉफ्टवेअरवर शिफ्ट झाले

2009-10 साली अॅपल आणि गुगलनं नोकियाची हालत खराब केली होती. आता नोकियाला वाटलं की, बदल करण्याची वेळ आली आहे. ते काही बदल करत होते तोवर मार्केट पुढं निघून जात होतं. गुगल अँड्रॉईड खूप चालू लागलं. नोकियाचा मोबाईल मजबूत होता. परंतु लोक हार्डवेअर नव्हे तर सॉफ्टवेअरवर शिफ्ट झाले होते.

नोकियातील कामगार कमी होत गेले

नोकियाकडे अद्याप सिंबियन ऑपरेटींग सिस्टीम होती ज्यात कमी अॅप्स होते. अॅपल आणि अँड्रॉईडकडे लाखो अॅप होते. नोकियाला सिंबियन सोडवत नव्हती आणि इथंच गडबड झाली. बाकी कंपन्या अँड्रॉईडला पकडून वर आल्या. परंतु नोकिया सिंबियनवरच होती. हळूहळू नोकियातील कामगार कमी होत गेले. ते लोकांना नोकरीवरून काढू लागले.

बाऊंस बॅक करण्याचा प्रयत्न केला

परंतु एक मोठी चूक झाली. त्यांनी ठरवलं की, अँड्रॉईड घेऊयात पण आपणही कळपात येऊ मग याचा काय उपयोग असं नोकियाला वाटलं. वेगळं काहीतरी करावं म्हणून नोकियानं विंडोज घेण्याचं ठरवलं. परंतु यावर कोणीच अॅप बनवत नव्हतं.

अँड्रॉईड आणि अॅपल चालू लागलं. कारण त्यावर लाखो अॅप्स तयार होत होते. नोकिया मागे पडू लागली.

कंपनीनं सीईओ देखील बदलला. नोकियाला कळून चुकलं होतं की, बदल आणावा लागेल. पु्न्हा नोकियानं बाऊंस बॅक करण्याचा प्रयत्न केला पण तरीही हळूहळू नोकिया संपली.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.