पाकिस्तानातून आलेल्या या कीटकांनी करोडो रुपयांचे नुकसान केले आहे
मागच्या काही दिवसात देशातील शेतीवर एक नवीन संकट आले आहे. पाकिस्तानातून राजस्थान, मध्य प्रदेश मार्गे आता महाराष्ट्रात आलेल्या या कीटकांनी अनेकांच्या शेतीचा फडशा पाडला.
झाडाच्या फक्त फांद्याच शिल्लक ठेवतात
हे किटक एखाद्या तालुक्यात पोहोचल्यानंतर रात्रीतून पाच ते सहा किमी परिसरातल्या झाडांचं नुकसान करतात. एखाद्या झाडावर हल्ला केल्यानंतर त्या झाडाच्या फांद्याच शिल्लक राहतात. पानं पूर्णपणे खाऊन टाकतात. सध्या विदर्भात पीक नाहीत. पण भाजीपाला आणि संत्रा, मोसंबी, लिंबू या झाडांच्या बागा उभ्या आहेत. त्यांना या कीटकांनी लक्ष्य केलं आहे.
काय आहे टोळधाड
लोकस्ट असे इंग्रजी नाव असलेल्या कीटकांना ‘टोळधाड’ म्हणूनच जगभर ओळखले जातात. ‘ॲक्रिडीई’ या कुळातील व ऑर्थोप्टेरा गणात येणाऱ्या या कीटकांची जगभर मोठी विविधता आढळते. सर्वसाधारणपणे हे टोळ एकट्यानेच राहात असतात. मात्र काही परिस्थितीत त्यांचे वर्तन बदलते, ते अधिक आक्रमक होतात.
याच कीटकांचे लहान रूप म्हणून नाकतोड्याला ओळखले जाते. स्पोडोप्टेरा वर्गातील अळ्या ज्याप्रमाणे समूहाने पिकांवर हल्ला चढवतात, त्यानुसार त्यांना लष्करी अळी म्हणून संबोधले जाते. तशाच प्रकारे हे टोळदेखील आपल्या पंखांचा आधार घेत प्रचंड थव्याने कित्येक मैल दूर प्रवास करतात.त्यांचे रूपांतर थव्यात होऊन जाते.शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान करतात. म्हणूनच त्यांना टोळधाड म्हटले जाते.
पाकिस्तानातून राजस्थान, मध्य प्रदेश आणि पुढे महाराष्ट्रात ही टोळधाड आली. विदर्भात सुरुवातीला अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शीमध्ये हे संकट आले.मध्यप्रदेशातून हे टोळ म्हणजेच नाकतोडे सातपुडाच्या पर्वतरांगांमधून नागपूर, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात पोहोचले आहेत. या जिल्ह्यांमध्ये सध्या पीक नसल्यामुळे हे किटक संत्र्यांच्या झाडांच्या पानांचा फडशा पाडत आहेत. सध्या पानगळीनंतर झाडांना नवी पालवी येत आहे. पण हे किटक कोट्यवधींच्या संख्येने आहेत आणि त्यामुळे नुकसान मोठं होतंय.
कित्येक अब्ज रुपयांचे नुकसान
जगभरातच या कीटकांनी शेती क्षेत्रात गंभीर समस्या तयार केली आहे. डेझर्ट लोकस्ट (वाळवंटी टोळ) हा जगातील सर्वांत प्रसिद्ध असणारा टोळ आहे. उत्तर आफ्रिकेपासून ते मध्य आशियासह भारतापर्यंत त्याचा प्रसार झाला आहे. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, युरोपीय खंडांपर्यंत या टोळांची व्याप्ती दिसून आली आहे. लोकस्टा मायग्रॅटोरीया, ऑस्ट्रेलियन प्लेग लोकस्टा असे त्याचे अनेक प्रकार आहेत. कित्येक अब्ज रुपयांचे नुकसान या टोळधाडीमुळे झाले आहे. हवाई फवारणी हाच त्यावरील प्रभावी उपाय मानला जातो.
असे लावा पळवून
एका टोळधाडीत कोट्यवधी किटक असतात.टोळधाडीचा शेतावर प्रादुर्भाव झाल्यास आगीचा मोठ्या प्रमाणात धूर करावा. शेतात मोठा आवाज करावा. डीजे, ट्रॅक्टरचे सायलेंसर काढून त्याचा आवाज, याचा उपयोग करता येईल. अनेकांनी एकत्र येऊन भांडी वाजवल्यानेही टोळ पळून जाण्यात मदत होईल.
टोळधाडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 1 लीटर पाण्यामध्ये क्लोरोपायरीफॉस 50%, साईपरमेथ्रीन 5% हे रसायन 3-4 मिली एवढ्या प्रमाणात मिसळून फवारणी करता येईल.टोळधाड खूप मोठी असल्याने फवारणीसाठी अग्निशमन दलाची गाडी किंवा ड्रोनचा वापर करावा
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम