Take a fresh look at your lifestyle.

यंदाच्या आयपीएल च्या टायटल स्पॉन्सर असलेल्या “ड्रीम 11” ची गोष्ट

0

बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मंगळवारी आयपीएल 2020 च्या टायटल स्पॉन्सर ची घोषणा केली. मागच्या काही दिवसापासून टायटल स्पॉन्सर कोण होणार याच्या मोठ्या चर्चा रंगल्या होत्या. यामध्ये अनेक मोठ्या कंपन्या इच्छुक असलेल्यामुळे त्यातली रंगत अजून वाढली.

टाटा ग्रुप, पंतजली, बायजू, अन-अॅकडमी अश्या अनेक नावांची चर्चा झाली. पण अश्या साऱ्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकून यंदाच्या आयपीएल टायटल स्पॉन्सरसाठी ड्रीम 11ने बाजी मारली आहे.

युएईमध्ये होणाऱ्या या १३ व्या आयपीएलसाठी ड्रीम 11 ने तब्बल २५० कोटींची बोली लावली होती. अन-अॅकडमी २१० कोटी, टाटा समूहाने १८० कोटी आणि बायजू यांनी १२५ कोटींची बोली लावली होती.

काय आहे ड्रीम ११ ?

ड्रीम 11 खरं तर ड्रीम स्पोर्ट्स या कंपनीचा एक ब्रँड आहे. ड्रीम ११ सोबतच हि कंपनी फॅनकोड, ड्रीमएक्स, ड्रीमसेटगो आणि ड्रीमपे हे ब्रँड चालवते.

ड्रीम स्पोर्ट्स या कंपनीच्या मते, “आम्ही क्रीडा रसिकांना अश्या संधी देतो कि जेणेकरून ते त्यांच्या आवडीच्या खेळाशी संपूर्ण कनेक्ट होऊ शकतील.”

२००८ मध्ये स्थापना

या कंपनीची स्थापना २००८ मध्ये झाली होती. ड्रीम 11 च्या वेबसाइटनुसार हर्ष जैन त्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक आहेत, तर भवित सेठ सीओओ आणि सह-संस्थापक आहेत. .

ब्रँड अ‍ॅम्बेसेडर “हर्षा भोगले”

२०१२ मध्ये या कंपनीने Freemium Fantasy Cricket सुरू केले. २०१४ मध्ये त्यांच्या वापरकर्त्यांची संख्या १ लाखांवर पोहचली होती. तर त्यानंतर दोनच वर्षात २०१६ साली मध्ये कंपनीच्या वापरकर्त्यांची संख्या १३ लाखावर पोहचली.

२०१७ साली या कंपनीने प्रसिद्ध क्रिकेट कॉमेंटटर हर्षा भोगले यांना त्याचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनविला. त्यानंतर एकाच वर्षात २०१८ मध्ये कंपनीच्या वापरकर्त्यांची संख्या 1.7 कोटीवर पोचली.

ब्रँड अ‍ॅम्बेसेडर “महेंद्रसिंग धोनी”

जसे जसे युझर्स संख्या वाढत चालली तशी कंपनीने पुढची पावले टाकायला सुरुवात केली. कंपनीने आयसीसी, पीकेएल, एफआयएच आणि बीबीएलशी हातमिळवणी केली.

त्याच वर्षी कंपनीने महेंद्रसिंग धोनीला त्याचे नवीन ब्रँड अ‍ॅम्बेसेडर घोषित केले.

त्यानंतर कंपनीने क्रिकेट सोबत हॉकी देखील सुरू केली. 2019 मध्ये याची युझर्स संख्या 7 कोटींवर पोहोचली. तर त्यांनी आयपीएल आणि आयसीसीशी ही क्रिकेट स्पर्धा साठी करार केला. त्याच वर्षी कंपनीने व्हॉलीबॉल सुरू केले.

यंदाच्या आयपीएल २०२० साठी ड्रीम ११ ने तब्बल २५० कोटींची बोली लावून टायटल स्पॉन्सरचा मान पटकावला आहे.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.