Take a fresh look at your lifestyle.

तो दिवस, ज्यामुळे युपीएससी तयारी करणाऱ्या मायावतींनी राजकारणात यायचा निर्णय घेतला

आज घडीला देशाच्या राजकारणातील ताकदवान दलित नेत्यांच्या यादीत मायावतींचा क्रमांक सर्वात वरती येतो. पण याच मायावती एकेकाळी आयएएस बनण्याचे स्वप्न ठेवून दिल्लीत युपीएसची तयारी करत होत्या.

0

आज घडीला देशाच्या राजकारणातील ताकदवान दलित नेत्यांच्या यादीत मायावतींचा क्रमांक सर्वात वरती येतो. पण याच मायावती एकेकाळी आयएएस बनण्याचे स्वप्न ठेवून दिल्लीत युपीएसची तयारी करत होत्या. आयएएसच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या मायावतींच्या जीवनात असे काय घडले. कि त्यांनी राजकारणात आपले पाऊल ठेवले व केवळ ठेवलेच नाही. तर ते अगदी घट्ट जमवले देखील.

मायावती आयएएस बनण्याची तयारी करत होत्या. याच काळात त्या सामाजिक बाबतीतही सक्रीय असत. दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लब या ठिकाणी जनता पार्टीने जातीतील भेदभाव दूर करण्याच्या हेतूने ३ दिवसीय सभा आयोजित केली होती. या सभेचे मुख्य अतिथी होते त्याकाळीतील राजकारणातील प्रसिद्ध व्यक्तीमत्व राजनारायण.

राजनारायण यांनी १९७७ मध्ये रायबरेली मधून लोकसभेत इंदिरा गांधींना तब्बल ५५ हजार पेक्षा अधिक मतांनी पराभूत केले होते. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा देशात सत्तापालट घडवून आणला होता.

राजनारायण यांनी या कार्यक्रमातील आपले भाषण संपवले. काही वेळाने २१ वर्षीय मायावती मंचावरती बोलायला आल्या, राजनारायण यांनी मंचावर बोललेली एक गोष्ट मायावतींना खटकली आणि त्याच मुद्द्यावरून मायावती याठिकाणी बोलल्या. नारायण यांनी बोलतांना दलितांसाठी हरिजन या शब्दाचा अनेकदा वापर केला.

मायावतींनी यावर राजनारायण यांना खडे बोल सुनावताना म्हटले.

“हे समाजवादी नेते स्वतःला खूप मोठे मसीहा समजतात मात्र यांना हे देखील माहित नाही कि दलितांसाठी हरिजन या शब्दाचा वापर करणे सुद्दा दलितांचा अपमानच आहे”.

भरसभेत राजनारायण यांना टोकण्याची कोणाचीही हिम्मत नसतांना मायावतीने करून दाखवलेल्या या कामाची सर्वत्र चर्चा सुरु झाली.

या भाषणात पुढे बोलतांना मायावतींनी बाबासाहेब आंबेडकर यांचे उदाहरण देत सांगितले कि त्यांनी देखील कधीच दलितांसाठी हरिजन या शब्दाचा वापर केला नाही. त्यांनी संविधानात दलितांसाठी अनुसूचित जाती या शब्दाचा वापर केला आहे.

या भाषणानंतर मायावतीवर बामसेफ या काशीराम यांनी स्थापन केलेल्या पक्षाने लक्ष द्यायला सुरुवात केली व काही महिन्यातच बामसेफचे पक्ष प्रमुख अर्थात काशीराम मायावतींच्या घरी पोहोचले. काशीराम यांना बघून घरातील सर्वच सदस्य अचंबित झाले. काशीराम यांनी मायावतींशी संवाद साधायला सुरुवात केली. मायावतींचा रस कशात आहे.

हे जाणून घेतल्यानंतर त्यांना काशीराम म्हणाले कि ” आजवर अनेक आयएएस होऊन गेलेत मात्र एखादाच आयएएस समाजात बदल घडवण्यास सक्षम ठरले आहेत. शेवटी त्यांना देखील राजकारण्यांच्या मतानुसार काम करावे लागते. तू आमच्या सोबत आमच्या ध्येयाचा हिस्सा बन. मी तुला त्याठिकाणी पोहोचवेल जिथे अनेक जिल्हाधिकारी फाईलवर सही घेण्यासाठी तुझ्या समोर उभे राहतील.”

या पर्यायावर मायावतींनी अनेक दिवस विचार केला. काशीराम यांच्यासोबत काम करण्याचा म्हणजेच राजकारणात येण्याचा निर्णय घेतला.

परंतु त्यांच्या या निर्णयाला त्यांच्या वडिलांनी होकार दिला नाही. मात्र मायावती मागे सरकल्या नाही. त्यांना अखेर त्यांच्या वडिलांनी राजकारणात राहायचे असल्यास घर सोडून जाण्याचाच पर्याय ठेवला. मायावतीने तसेच केले. त्यांनी घर सोडले व आपल्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून बघितले नाही.

त्याचाच परिणाम म्हणजे आज मायावती दलितांची सर्वात शक्तिशाली नेता म्हणून ओळखल्या जातात आणि काशीराम यांनी दाखवलेले स्वप्न देखील हुबेहूब पूर्ण करण्यास त्या सक्षम ठरल्या.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.