Take a fresh look at your lifestyle.

आयपीएल सुरुवात कशी झाली होती? अशी आहे जगातील सर्वात लोकप्रिय लीगची कहाणी

0

जगावर कोरोनाचे संकट असताना क्रिकेट सुरु होणार कि नाही, अश्या जोरदार चर्चा सुरु असताना आयपीएलच्या १३ व्या सत्राला सुरुवात झाली आहे. गेल्या तेरा वर्षात आपीएलने मिळवलेल्या लोकप्रियतेमुळे या लीगला भारतातील एक सणच म्हनावे लागेल. आयपीएलने केवळ भारतीयच नाही तर अनेक विदेशी खेळाडूंचे देखील भविष्य घडवले. आयपीएल मधूनच अनेक खेळाडूंना भारताच्या आंतरराष्ट्रीय संघात स्थान मिळवता आले.

परंतु आपल्याला माहीत आहे का? कि आयपीएलची सुरुवात कशी व कोणी केली?

२००२ नंतर टी-२० क्रिकेट प्रत्येक देशाने खेळायला सुरुवात केली होती. टी-२० सामन्यांना विशेष पसंती देखील मिळत होती. दरम्यानच्याच काळात २००७ मध्ये भारताने महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वात टी-२० वर्ल्ड कप जिंकला होता. त्यामुळे बीसीसीआयने आयपीएल सुरू करण्यास अधिक वेळ न घालवता २००८ मधेच आयपीएलची सुरुवात केली. आयपीएलची सुरुवात तत्कालीन बीसीसीआय उपाध्यक्ष व राजस्थान क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष ललित मोदींनी केली.

आयपीएलच्या सुरुवातीमागे झी विरुद्ध बीसीसीआय अशा एका विवादाची देखील कथा आहे.

विविध भागावर आधारित संघ निर्माण करून एक टी-२० क्रिकेट शृंखला अर्थात इंडियन प्रीमियर लीग सुरु करण्याचा निर्णय ललित मोदी यांनी घेतला. ललित मोदी एक मोठे व्यावसायिक देखील होते. त्यामुळे त्यांनीच आयपीएलच्या संपूर्ण निर्मितीची जबाबदारी घेतली. त्यांनीच शाहरुख खान, प्रीती झिंटा, मुकेश अंबानी सारख्या मोठ्या मोठ्या नावांना आयपीएल मध्ये सहभाग घेण्यास प्रवृत्त केले. संपूर्ण तयारी नंतर आयपीएल मध्ये कोण कोणते संघ सहभाग घेणार व आयपीएल कशी खेळली जाणार. हे निश्चित झाले.

पहिल्या आयपीएल सत्रात आठ संघांनी सहभाग घेतला होता. त्यात राजस्थान रॉयल्स, मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, डेक्कन चार्जेस, दिल्ली डेअरडेव्हिल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, कोलकत्ता नाईट रायडर्स आणि किंग्स इलेव्हन पंजाबचा समावेश होता.

आयपीएलचा पहिला सामना १८ एप्रिल रोजी केकेआर विरुद्ध आरसीबी मध्ये खेळला गेला. या सत्रात गांगुलीला केकेआरचे कर्णधारपद देण्यात आले होते. तर राहुल द्रविडने आरसीबीचे नेतृत्व केले होते. पहिल्या सामन्यात केकेआरने प्रथम फलंदाजी करत २२२ धावा केल्या होत्या. यात न्यूझीलंडचा फलंदाज ब्रॅंडन म्यॅक्युलमने १५८ धावाकरत पहिल्याच सामन्यात एक मोठा विक्रम केला होता. लक्षाचा पाठलाग करतांना आरसीबीचे केवळ ८२ धावांवर सर्व खेळाडू बाद झाले होते. यासह केकेआरने हा सामना १४० अशा विक्रमी धाव संख्येने जिंकला.

पहिल्या सामन्यात दमदार विजय मिळवल्यानंतरही केकेआर या सत्रात आयपीएल ट्रॉफी जिंकू शकली नाही. आयपीएलची पहिली ट्रॉफी राजस्थान रॉयल्सने जिंकली. त्यानंतर पुढील ११ वर्षात मुंबईने रोहित शर्माच्या नेतृत्वात सर्वाधिक ४ वेळेस चेन्नईने ३ वेळेस आणि कोलकत्ता ने २ वेळा तसेच हैदराबादने व डेक्कन चार्जेसने प्रत्येकी एक एक वेळा आयपीएल ट्रॉफी आपल्या नावे केली आहे.

दरम्यान आज आयपीएलच्या १३ व्या सत्राची सुरुवात होत आहे. सहा ते सात महिने क्रिकेट बंद राहिल्या नंतर या आपीएलमध्ये रोमांचक लढती बघायला मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच मैदानात प्रेक्षक नसले तरी प्रसार माध्यमांवर आयपीएल मोठ्या प्रमाणात बघितली जाणार आहे.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.