Take a fresh look at your lifestyle.

बहुजनांचा ‘गोपीनाथ’ ते ‘गोपीचंद’ भाजपमय प्रवास

0
  • सुहास घोडके

गेल्या दशकात बहुजनांचा नेता म्हणून महाराष्ट्रामध्ये कै. गोपीनाथ मुंडे साहेबांकडे पाहिले जायचे. त्यांच्या वकृत्व, कर्तुत्व आणि नेतृत्वाच्या बळावर कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना ते महाराष्ट्राचा लोकनता म्हणून उदयास आले अन् अवघ्या महाराष्ट्राच्या मनामध्ये घर केले. जनतेचा आवाज म्हणून साहेबांकडे कुणीही बघावं. मात्र गत लोकसभा निवडणुकीनंतर त्यांचा आकस्मिक मृत्यू झाला अन् महाराष्ट्राला बहुजनांच्या चळवळीत एक पोकळी निर्माण झाली.

मुंडे साहेबांची जागा कुणीच घेवु शकणार नाही. मात्र चळवळीत राहुन घरामध्ये कोणत्याही स्वरुपाची राजकीय पार्श्वभूमी नसताना स्वत:च्या मनगटाच्या सामर्थ्यावर युवकांची फौज तयार करुन मुंडे साहेबांची उणीव काही अंशी का होईना गोपीचंद पडळकरांच्या रुपाने भरुन निघल्याने बहुजनांचा सुरु गवसला असल्याचे मान्य केले पाहिजे.

विधानभवनात ‘भाजपा’ तो आकस्मिक हरवलेला आवाज नक्कीच पडळकरांच्या रुपाने भविष्यात पहावयास व ऐकावयास मिळेल.

मात्र आजची चळवळ पाहता बहुजनांचा गोपीनाथ ते गोपीचंद हा प्रवास नक्कीच नजरेत भरणारा असुन गोपीचंद पडळकर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आजचा हा लेखन प्रपंच.

खरं तर महाराष्ट्रावर वर्षानुवर्षे कॉंग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता होती. या सत्तेच्या काळात महाराष्ट्रातील अनेक प्रश्न तेव्हापासून आजपर्यंत तसेच खितपत पडले आहेत. बहुजन समाजाला देखील याच काळात अनेक अवहेलना सहन कराव्या लागल्या. ऊसतोड कामगारांचे, कारखानदारांचे, शेतकऱ्यांचे असे अनेक प्रश्न सतत भेडसवायचे अन् या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांच्या रुपाने भारतीय जनता पार्टी ला बहुजनांचा नेता मिळाला होता. विरोधी पक्षनेता म्हणून गोपीनाथ मुंडे यांनी नेहमीच सरकारला धारेवर धरले होते.

तत्कालीन काळाच्या पुर्वीपासुन ते आजतागायत धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे, होता आणि तो अजुनही तसाच आहे.

धनगर समाजाला आरक्षण मिळावे म्हणून त्यावेळी गोपीनाथ मुंडे यांनी जिवाचे रान केले होते. वेळोवेळी सरकारला झोडण्याचे काम त्यांनी केले. स्पष्टवक्तेपणा, अभ्यासुपणा अन् बुद्धीच्या जोरावर त्यांनी महाराष्ट्र ढवळून काढला होता. आणि म्हणूनच त्यांच्या त्या झिजण्याने २०१४ साली लोकसभा निवडणुकीला भाजपा बहुमताने सत्तेवर विराजमान झाली असं म्हटल्यास कदाचित ते वावगं ठरणार नाही. पण दुर्दैवाने आज गोपीनाथ मुंडे हे आपल्यात नाहीत.

दरम्यान भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झटणारा अन् गोपीनाथ मुंडे साहेबांच्या पावलावर पाऊल टाकणारा बहुजनांना युवक नेता गवसला अन् ‘गोपीनाथ’ ची उणीव ‘गोपीचंद’ ने भरुन काढली. भाजपाच्या विस्तारासाठी जिवाचे रान केले, मात्र सत्तेवर येताच धनगर समाजाला दिलेल्या आश्वासनांचा विसर ‘भाजपा’ला झाल्याने भ्रमनिरास केलेल्या सरकारला लाथाडुन गोपीचंद पडळकर भाजपाचे ‘स्टार’ असताना देखील ‘भाजपा’ विरोधात त्यांनी रान उठविले.

जी स्टाईल गोपीनाथ मुंडेंची होती तीच वकृत्वाची स्टाईल आज गोपीचंद पडकरांमध्ये पहायला मिळत आहे. धनगर समाजाला आरक्षण द्या म्हणून त्यांनी महाराष्ट्रभर दौरे काढुन समाज एकत्र केला. धनगर समाज हा आरक्षणापासुन वर्षानुवर्षे ‘वंचित’ आहे म्हणून समाजासाठी त्यांनी “सत्तेला” लाथाडले हे त्यावेळी अन् आज सत्तेला लाचार होणाऱ्या तथाकथित पुढाऱ्यांसाठी मोठी चपराक म्हणावी लागेल.

गेल्या अनेक वर्षापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती समजले जाणारे अन् कट्टर भाजपावासी असणारे गोपीचंद भाजपा च्या विरोधात समाजाच्या न्याय हक्कांसाठी लढताहेत, झगडताहेत म्हणजे नक्कीच समाजाला दिशाभूल करण्याचे काम तरी होत नाही का..? नक्की ‘पाणी कुठं मुरतंय’..? असा प्रश्न भोळ्या भाबड्या समाजातील विचारवंतांना पडत होता. समाजाची नक्की दिशा काय असेल हे सांगणं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुणालाच कळेनासे झाले अन् याच वेळी ॲड.बाळासाहेब आंबेडकरांची ‘वंचित बहुजन आघाडी’ उदयास आली. याच माध्यमातून महाराष्ट्रातील बहुजन समाज पुन्हा एकदा एकवटला.

गेल्या पन्नास वर्षापासून धनगर समजाला वेड्यात काढुन आश्वासनाची बोळवण करणारे मुख्यतः राष्ट्रवादी आणि त्यानंतर कॉंग्रेस आणि गेल्या ५ वर्षापासून समाजाची दिशाभूल करणारे भाजपा व शिवसेना यांच्याशी झुंज देण्याचे काम ह्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी ने झुंज दिली. याच माध्यमातून वंचित असलेला समाज गोपीचंद शेठच्या नेतृत्वाखाली एकवटला.

लोकसभा निवडणुकीत त्यांनी आपलं अस्तित्व टिकवुन कडवी झुंज दिली. त्यामुळे ‘गोपीचंद’ नावाचं अजब रसायन भाजपाच्या लक्षात आले आणि त्यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाची बाजु न्यायालात मांडली.

शिवाय आदिवासी समाजाच्या २१ सवलती लागु केल्या अन् सोलापूर विद्यापीठाचे “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ” असे नामकरण केले. त्यामुळे भाजपा चे असणारे गोपीचंद पुन्हा भाजपाचे झाले.

पुन्हा झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराजय होणार आहे हे माहित असताना देखील त्यांनी बारामती मधुन अजित पवार यांच्या विरोधात दंड थोपटले. आणि तद्नंतर त्यांच्या कष्टाचे चीज झाले व एक लढवय्या, आक्रमक, अभ्यासु वकृत्व म्हणून पडकर साहेबांना विधानपरिषदेवर संधी दिली. आजही पडळकर साहेबांनी आरक्षणाची लढाई सोडली नाही. “कोयता उचला पण आपल्या हक्कांसाठी” म्हणत ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांसाठी त्यांनी शड्डु ठोकला आहे. परवाच त्यांनी शासनाच्या विरोधात राज्यभर “ढोल बजाओ – सरकार जगाओ” आंदोलन केले. अन् सरकारला जाग न आल्यास भविष्यात राज्यकर्ते असणाऱ्या नेत्यांच्या दारात ढोल वाजवु असा इशारा दिला.

एकूणच काय तर, ज्या पद्धतीने गेली २५ वर्ष सत्ताधाऱ्यांशी अखंड झुंज देत कै.गोपीनाथ मुंडे साहेब हे बहुजनांचे नेते झाले. समाज एकसंध ठेवला, धनगर समाजाला सदैव न्याय दिला. त्याचपद्धतीने आज धनगर समाज गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली एकवटला आहे.

तत्कालीन सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करुन सोडणारे गोपीनाथ मुंडे व सत्ता असताना देखील सत्तेला लाथाडणारे गोपीचंद पडळर यांचा लढा हा नक्कीच बहुजनांसाठी होता, वंचितांसाठी होता. त्यामुळे वंचितांच्या या प्रवासात गोपीनाथांपासुन गोपीचंदापर्यंतचा ‘बहुजन’ कार्यकर्ता अथवा समाज वंचित असला तरी त्यांना ‘गोपी’ मिळाला हे मात्र नक्कीच.

आज असणाऱ्या गोपीचंद पडळकर साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

  • सुहास घोडके ९४२३५९७४९८

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.