राजीव बजाज यांना पल्सरची प्रेरणा योगा आणि होमिओपॅथीमुळं मिळाली होती
कोणताही व्यवसाय म्हटलं की, त्यात रिस्क आलीच, चढउतार नफा-तोटा किंवा मार्केटकडून नाकारलं जाणं या गोष्टी आल्याच. कधी कधी व्यवसाय पूर्ण कोसळतो किंवा तोट्यात असतो. असं असलं तरी काही कंपन्या मात्र पुन्हा उभारी घेतात आणि आपलं नाव कमावत यश मिळवतात. आज आपण बजाज कंपनीच्या यशाची कहाणी जाणून घेणार आहोत.
बजाजची स्कुटर ते स्पोर्ट बाईक पल्सरपर्यंत प्रवासही वाचणार आहोत.
90 च्या दशकात बजाजच्या परिवर्तनाला सुरुवात झाली. जेव्हा राजीव बजाज वार्विक विद्यापीठातून इंजिनिअरींगमध्ये ग्रॅज्युएशन करून भारतात आले. त्यांना स्कुटरपेक्षा मोटरसायकलमध्ये जास्त रस होता. त्यांनी पुण्यातील चाकण येथे बजाजचा आधुनिक प्लँट सुरू केला.
90 च्या दशकाच्या अखेरीस बजाजच्या स्कुटरचा दबादबा कमी झाला होता आणि हिरो होंडानं 11 मिलिय स्प्लेंडर विकून धुमाकूळ घातला होता.
स्पर्धकाचं अनुकरण करण्यापेक्षा आपली वेगळी ओळक तयार करण्यासाठी राजीव बजाज यांनी स्पोर्टी बाईक मार्केटमध्ये आणली. या बाईक्सची फुएल इफिसिंएंसी कमी होती. परंतु ही बाईक स्पोर्टी लुक आणि पावरफुल होती. ही बाईक दुसरी तिसरी कोणतीह बाईक नाही तर पल्सर आहे. सर्वात आधी पल्सर 150 आणि 180 लाँच करण्यात आली.
सुरुवातीच्या काळात राजीव बजाज यांनी स्प्लेंडरला टक्कर देण्याच्या हेतूनं काही बाईक्स बनवल्या. परंतु सारं काही फेल झालं.
टेक्नलॉजीतही खूप फरक होता. बजाजची बाईक 2 स्ट्रोक होती, तर हिरो होंडाची 4 स्ट्रोक होती. डोळे बंद करून आपल्या स्पर्धकांना फॉलो करून काहीच साध्य होणार नाही याची राजीव बजाज यांना जाणीव झाली.
स्पर्धकाचं अनुकरण करण्यापेक्षा आपली वेगळी ओळक तयार करण्यासाठी राजीव बजाज यांनी स्पोर्टी बाईक मार्केटमध्ये आणली. या बाईक्सची फुएल इफिसिंएंसी कमी होती. परंतु ही बाईक स्पोर्टी लुक आणि पावरफुल होती. ही बाईक दुसरी तिसरी कोणतीह बाईक नाही तर पल्सर आहे. सर्वात आधी पल्सर 150 आणि 180 लाँच करण्यात आली.
1995 साली राहुल बजाज ग्रुपचे चेअरमन बनल्यानंतर पाहता पाहता भारतात स्कुटर सेगमेंटमध्ये बजाज कंपनी लिडर बनली.
1990 मध्ये मार्केट डाऊन झाल्यानंतर आणि बँकांनी मोटरसायकलला फायनान्स देण्यास सुरूवात केल्यानंतर लोक मोटरसायकलवर शिफ्ट झाले. पाहता पाहता बजाज मागे पडली हिरो होंडा सहित इतर कंपन्यांची विक्री वाढली.
बजाजनं आपल्या स्पर्धकावरील लक्ष हटवून त्यांचा पाठलाग करणं बंद केलं. त्याऐवजी त्यांनी महागड्या गाड्यांचं नवीन सेगमेंट क्रिएट केलं. पावरफुल बाईक बाजारात आणली. त्यांच्या नव्या स्ट्रॅटेजीला जबरदस्त यश मिळालं. पहाता पहाता पल्सरची विक्री महिन्याला 30 हजारांवर गेली.
2006 साली तर हिरो होंडा आणि बजाज यांच्यात फक्त 32 हजार बाईक्सचा फरक राहिला होता.
2007 साला पर्यंत सर्वकाही चांगलं सुरू होतं. अचानक बजाजनं काही गडबड करणारे निर्णय घेतले. एक वेळ अशी आली, हिरो होंडाचा सेल पुन्हा एकदा बजाजच्या तुलनेत डबल झाला. कारण हे होतं की, बजाज ऑटो पल्सरच्या कॅटेगरीत व्हेरीएनशन आणण्याऐवजी एक नवीन बाईक बनवण्यासाठी सरसावली.
त्यांनी आपल्या सर्वात चांगल्या प्रॉडक्टला चांगल्या पद्धतीनं त्यांनी एनकरेज नाही केलं, मॅक्जिमाईज नाही केलं. एकवेळ अशी आली की, बजाज संपली आहे असंच सर्वांना वाटलं.
यानंतर राजीव बजाज यांनी सिंगल माईंडेड फोकस पल्सरवर करण्याचा निर्णय घेतला. त्यांना ही प्रेरणा योगा आणि होमिओपॅथीमुळं मिळाली. यानंतर राजीव बजाज यांनी पल्सर हा त्यांचा प्रीमियम ब्रँड बनवला. आज हाच भारतीय ब्रँड खूप फेमसही आहे.
आज बजाज स्पोर्ट बाईक म्हणून ओळखली जाते. कोसळ्यानंतरही बजाज पुन्हा एकदा उभी राहिली. आज पल्सर ही बाईक खूपच लोकप्रिय आहे.
कोणताही व्यवसाय म्हटलं की, त्यात रिस्क आलीच, चढउतार नफा-तोटा किंवा मार्केटकडून नाकारलं जाणं या गोष्टी आल्याच. कधी कधी व्यवसाय पूर्ण कोसळतो किंवा तोट्यात असतो. असं असलं तरी काही कंपन्या मात्र पुन्हा उभारी घेतात आणि आपलं नाव कमावत यश मिळवतात हे मात्र नक्की .
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम