Take a fresh look at your lifestyle.

बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री झाले तेव्हा वर्तमानपत्रात छापण्यासाठी त्यांचा फोटो देखील नव्हता

0

बाबासाहेब भोसले हे महाराष्ट्राचे ८ वे मुख्यमंत्री होते. बाबासाहेब भोसले यांना आताचा महाराष्ट्र विसरला असेल पण जेव्हा भोसले मुख्यमंत्री होते, तेव्हा फक्त आणि फक्त त्यांचीच चर्चा होती.

आतापर्यंत महाराष्ट्राचे अनेक मुख्यमंत्री होऊन गेले, त्यात काही नावे नावाजलेली आहे. तसेच महाराष्ट्रातील जनतेने त्यांची नावे लक्षात ठेवली आहे. मात्र एक मुख्यमंत्री असे आहे ज्यांना महाराष्ट्र खूपच लवकर विसरला ते म्हणजे बाबासाहेब भोसले यांना.

बाबासाहेब भोसले यांच्या मुख्यमंत्री पदाचा काळ जरी एक वर्षाचा असला तरी त्याकाळात त्यांनी घेतलेले निर्णय चांगले गाजले होते. १० पर्यंत मुलींना मोफत शिक्षण, असंघटित क्षेत्रातील कामगारांना संरक्षण देणे. मासेमारांसाठी विमा योजना, पंढरपूर देवस्थान कायदा, असे अनेक निर्णय त्यांनी घेतले होते.

१९८२ मध्ये कथित सिमेंट घोटाळा प्रकरणात नाव अडकल्याने बॅरिस्टर ए आर अंतुले यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

तेव्हा मुख्यमंत्री पदासाठी वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री पदासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. पण तेव्हा इंदिरा गांधी यांनी बाबासाहेब भोसले यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केले.

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठा असावा अशी इच्छा त्यावेळी इंदिरा गांधी यांची होती. भोसले राजकारणात हेवी वेट नसल्याने त्यांना कंट्रोल करणे दिल्लीला सोपे जाणार होते. तसेच बाबासाहेब भोसले हे मराठा होते, त्यामुळे इंदिरा गांधींनी त्यांना मुख्यमंत्री पदासाठी निवडले.

१९८२ ते १९८३ या काळात म्हणजे फक्त वर्षभर भोसले हे मुख्यमंत्री होते. जेव्हा भोसले यांच्या नावाची घोषणा झाली होती, तेव्हा वर्तमानपत्रात छापण्यासाठी कोणाकडे त्यांचा साधा फोटो देखील नव्हता, इतकेच काय तर माहिती संचालनालयाकडे देखील त्यांचा फोटो नव्हता.

बाबासाहेब भोसले यांनी आपल्या पक्षातील आमदारांवर नियंत्रण  ठेवता आले नाही. त्यामुळे अवघ्या ३७७ दिवसांत बाबासाहेब भोसले यांचे मुख्यमंत्री पद गेले.

मुख्यमंत्री पद गेल्यानंतर ते आपल्या नेहमीच्या शैलीत म्हणाले, मुख्यमंत्री पद तर काढून घेतले पण आता नावापुढे लागलेले माजी मुख्यमंत्री हे कोणीही काढू शकत नाही.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.