एकेकाळी १२ हजार कोटींचे मालक पण आता मुंबईत एका भाड्याच्या घरात राहतात
तुम्ही कधी विचार केला आहे का एकेकाळी कोट्याधीश असणारा एखादा व्यक्ती आज बेवारस आहे. अशीच गोष्ट आहे, रेमंड कंपनीचे विजयपत सिंघानिया यांची.
काही वर्षापूर्वी देशातील मोठ्या उद्योगपतींमध्ये रेमंड कंपनीचे मालक विजयपत सिंघानिया यांना गणले जात होते. त्यांची संपत्ती जवळपास १२ हजार कोटी इतकी होती, पण ते आता बेघर झाले असून ते मुंबईत एका भाड्याच्या घरात राहत आहे.
उद्योगपती अंबानी यांच्या घरापेक्षा जास्त उंच असणाऱ्या घरात सिंघानिया राहायचे, पण आता त्यांना मुंबईतल्या एका सोसायटीमध्ये भाड्याच्या घरात रहावे लागत आहे. मी निवृत्ती घेतली नाही मला माझ्या मुलाने घरातून आणि कंपनीतून काढून टाकण्यात आले, असे सिंघानिया यांनी म्हटले आहे.
गंभीर परिणामांना समोरे जावे लागले
यश हे प्रत्येकाला भेटत नाही, जो मेहनत करतो, ज्याच्या मनात ध्येय गाठण्याची जिद्द असेल तोच यशाचे शिखर गाठू शकतो. पुढे त्याची मेहनत त्याला इतक्या उंचीवर नेते की याचा विचार त्याने स्वता: नेही केला नसेल.
पण इतक्या उंचीवर जाऊनही तुमच्याकडून एखादा निर्णय चुकीचा घेतला गेला तर त्याच्या गंभीर परिणामांना समोरे जावे लागते.आजही ही गोष्ट पण अशाच एका उद्योगपतीची आहे.
पुर्ण नियंत्रण मुलाला दिले
८२ वर्षे वय असणाऱ्या सिंघनिया यांना भाड्याच्या घरात राहण्याची वेळ त्यांच्या एका चुकीच्या निर्णयामुळे आली आहे, तो निर्णय होता मुलाला गिफ्ट म्हणून दिलेली कंपनी . २०१८ मध्ये सिंघानिया यांनी रेमंड कंपनीचे पुर्ण नियंत्रण त्यांचा मुलगा गौतमला दिले होते.
त्यानंतर सिंघानिया यांनी उभारलेल्या एका खास अपार्टमेंटमधली डुप्लेक्स फ्लॅटसाठी मुलाने फसवणूक केली. तसेच कंपनीतून त्यांची हकालपट्टी करण्यात आली, त्यामुळे माझ्यावर भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आल्याचे सिंघानिया यांनी म्हटले आहे.
काय आहे प्रकरण ?
सिंघानिया यांच्या वकिलाने १९६० मध्ये तयार करण्यात आलेल्या एका इमारतीसाठी याचिका दाखल केली होती. तेव्हा ही इमारत १४ मजल्यांची होती. नंतर या इमारतीचे ४ डुप्लेक्स रेंमडचे सहाय्यक पश्मीना होल्डिंगला देण्यात आले.
२००७ मध्ये कंपनीने ही इमारत पुन्हा बांधण्याचा निर्णय घेतला, करारानुसार विजयप सिंघानिया, गौतम आणि वीना देवी (विजयपत सिंघानिया यांचे बंधू अजयपत सिंघानिया यांची पत्नी) आणि त्यांचे मुलं अनंत आणि अक्षयपंत सिंघानिया यांना एक-एक डुप्लेक्स मिळणार होते.
सिंघानिया यांनी त्यांची पुर्ण संपत्ती मुलाच्या नावावर केली. त्यांच्या मुलांच्या नावावर कंपनीचे सर्व शेअर करुन टाकले त्या शेअर्सची किंमत सुमारे १ हजार कोटी इतकी होती. पण आता गौतमने त्यांना बेवारस सोडले आहे.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम