Take a fresh look at your lifestyle.

अजय-अतुल यांच गाण राज ठाकरे कंपोज करतात तेव्हा

राज ठाकरे जरी राजकारणात असले तरी ते स्वतःला नेहमीच सांस्कृतिक, सामाजिक गोष्टींशी जोडून ठेवतात.

0

राज ठाकरे व्यंगचित्रकार आहे, त्यांना सिनेमाची देखील आवड हे सर्वांनाच माहीत आहे. मात्र या गाण्यामुळे त्यांची संगीताची आवड देखील दिसून येते.

राज ठाकरे जरी राजकारणात असले तरी ते स्वतःला नेहमीच सांस्कृतिक, सामाजिक गोष्टींशी जोडून ठेवतात. इतकेच नाही तर त्यांचे सर्वच कलांवर वर असलेले प्रेम देखील सर्वांना माहितीये. जाणून घेऊया त्यांच्या अशाच एका किस्स्याबद्दल.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आजच्या तरुण पिढीत एक वेगळीच ओळख आहे. राज ठाकरेंची राहण्याची, बोलण्याची, सभांमध्ये भाष्य करण्याची स्टाईल महाराष्ट्रातच काय तर पूर्ण देशातील तरुणांना वेड लावून गेली आहे.

गाणी सुपरहिट ठरली होती

२००४ साली ‘अगं बाई अरेच्चा’ नावाचा केदार शिंदे यांचा सिनेमा आला होता. त्यात संजय नार्वेकरांनी काम केले होते, अजय अतुल यांनी त्या सिनेमाला संगीत दिले होते. या चित्रपटातली अनेक गाणी सुपरहिट ठरली होती.

त्यात मन उधाण वाऱ्याचे, मल्हारवारी, असे काही गाणे प्रसिद्ध झाले होते. या चित्रपटातलेच एक गाणं होते, ते म्हणजे ‘छम छम करता है ये नशीला बदन’ हे गाणे एक आयटम सॉंग होते, यात सोनाली बेंद्रे दिसून आल्या होत्या .

राज ठाकरे यांना ऐकवली

या सिनेमाला अजय अतुल यांनीच गाणे कंपोज करून दिली होते. तेव्हा या सिनेमाची गाणी पूर्ण तयार झाली होती.अजय अतुल हे संगीतकार नुकतेच तेव्हा प्रसिद्धीत आले होते. तेव्हा ही गाणी अजय अतुल यांनी जवळचे मित्र राज ठाकरे यांना ऐकवली. राज ठाकरेंना ही गाणी अत्यंत आवडली.

मात्र ‘छम छम करता है ये नशीला बदन’ या गाण्यात राज ठाकरे यांना काही तरी कमी वाटली. यासाठी राज ठाकरे यांनी हे गाणे पुन्हा पुन्हा ऐकले पण त्या गाण्यात काही कमी आहे, असे त्यांना जाणवत होते.

गाण्यासंबंधी नंतर बऱ्याच बैठका झाल्या

राज ठाकरेंनी लक्ष्मीकांत प्लारेलाल यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी या गाण्याबद्दल राज ठाकरेंनी प्लारेलाल यांना या गाण्यात मार्गदर्शन करणार का? असे विचारले असता. तेव्हा प्यारेलाल यांनी होकार दिला.

तेव्हा हे गाणे प्यारेलाल यांना ऐकवण्यात आले. तेव्हा त्यांनाही या गाण्यात कुठली कमी वाटली. राज ठाकरे अजय अतुल यांना सोबत घेऊन प्यारेलाल यांना भेटायला गेले. या गाण्यासंबंधी नंतर बऱ्याच बैठका झाल्या.

प्यारेलाल यांनी होकार दिला

या गाण्यात प्यारेलाल यांनी एक या गाण्याच्या सुरुवातीला काही चेंजेस करण्यात सांगितले.तेव्हा प्यारेलाल यांनी त्यात ट्रम्पएडचा आवाज टाकला. गाणं पूर्ण झालेले होते. तेव्हा राज ठाकरेंनी हे गाणे पुन्हा ऐकले. तसेच प्यारेलाल यांना विचारले की, हे गाणे पूर्ण वाटतेय का? तेव्हा प्यारेलाल यांनी होकार दिला.

गाणं चित्रपटात वापरण्यात आल

तेव्हा राज ठाकरेंना ते गाणं पूर्ण झालं आहे, हे पटले.पुढे हे गाणं चित्रपटात वापरण्यात आले. या गाण्यात सोनाली बेंद्रे यांनी नृत्य केले आहे. या गाण्याची कोरिओग्राफी प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खान यांनी केली होती. हे गाणे त्यावेळी प्रचंड हिट झाले होते, आजही या गाण्याची तितकीच क्रेझ आहे.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.