Take a fresh look at your lifestyle.

“मिर्झापूर”चा तिसरा सिझनसुद्धा येणार!

0

मागच्या काही दिवसात सोशल मिडिया, मित्राच्या कट्ट्यावर म्हणजेच सर्वत्र फक्त एका वेब सीरिजची होणारी चर्चा कानावर येते. ते म्हणजे मिर्झापूर. ‘मिर्झापूर २’ या सीरिजने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे . ऍमेझॉन प्राइम व्हिडिओवर ‘मिर्झापुर’ ही भारतात तयार झालेल्या कलाकृतींपैकी एख आहे. छोट्या शहरातील गँगस्टर आणि त्यांनी केलेल्या गुन्हांचं एक अनोखं जग या वेबसिरीजमधून मांडल आहे.

ऍमेझॉन प्राइम व्हिडीओची मिर्झापूर वेब सीरिज ही दोन वर्षापूर्वी आली. प्रेक्षकांना हव्या असलेल्या सर्व गोष्टी या सीरिजमध्ये होत्या. कालिन भैय्याच्या मार्गात जो कोणी येईल त्याला अत्यंत निर्दयीपणे संपवले गेले. यातील कलाकारांच्या भूमिकेमुळे मिर्झापूर ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.

प्रेक्षकांनी ही वेब सीरिज उचलून धरली

मिर्झापूरच्या पहिल्या सीजनमध्ये दोन भाऊ आणि एक गँगस्टरची गोष्ट होती. ही वेब सीरिज 2018 मध्ये रिलीज झाली होती आणि लोकांनी खूप पसंत केली होती. यामध्ये लीडिंग गँग्समध्ये मारहाण, शत्रूत्व आदी गोष्टी दाखविण्यात आल्या होत्या. प्रेक्षकांनी ही वेब सीरिज उचलून धरली होती. पहिल्या सीजनमध्ये पंकज त्रिपाठी, विक्रांत मॅसी, अली फजल, दिव्येंदु, श्वेता त्रिपाठी, रसिका दुग्गल, राजेश तेलंग, अमित सियाल आणि अंजुन शर्मा मुख्य भूमिकेत होते.

दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला

आता मिर्झापूर वेब सीरिजचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दोन वर्षानंतर आता पुन्हा प्रेक्षकांना कालिन भय्या आणि त्याचा मुलगा मुन्ना भय्याची दहशत अनुभवायला मिळणार आहे. दुसऱ्या सीझनच्या मिळालेल्या प्रतिसादावरुन त्याचा पहिला सीझन किती यशस्वी होता याची कल्पना येते.

एक वेगळ जग जग समोर आणलं

उत्तर भारतात असलेल्या मिर्झापुरने सिझन १ मध्ये प्रेक्षकांना बंदूक, ड्रग्स आणि राजकारणाचं एक वेगळ जग जग समोर आणलं. पंकज त्रिपाठी, अली फझल, दिव्येंदु शर्मा, श्वेता त्रिपाठी शर्मा, रसिका दुगल, हर्षिता शेखर गौंड, अमित सियाल, अंजुमा शर्मा, शीबा चड्ढा, मनू ऋषि चड्ढा आणि राजेश तेलंग या कलाकारांच्या अभिनयाने या कलाकृतीला एक वेगळाच दर्जा प्राप्त झाला आहे.

या सीझनची खरी जान ही अपेक्षेप्रमाणे पंकज त्रिपाठींची भूमिका

या सीझनची खरी जान ही अपेक्षेप्रमाणे पंकज त्रिपाठींची भूमिका आहे. त्यांचे संवाद आणि भेदक नजर आणि चेहऱ्यावरचे हावभाव हे सर्व काही प्रेक्षकांना भावते. त्याचसोबत श्वेता त्रिपाठीने गोलूची भूमिका ही अतिशय चमकदार पद्धतीने साकारलेली आहे. दिव्येंदू शर्मा आणि अली फजल यांनीही त्यांच्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. तसेच शरदच्या भूमिकेत अंजुम शर्माने चांगले काम केले आहे.

गुरमीत सिंह आणि मिहीर देसाई यांनीही घेतली मेहनत

मिर्जापूरच्या दुसऱ्या सीजनमध्ये इशा तलवार, प्रियांशू पंदौली आणि विजय वर्मा यांची एन्ट्री होईल. या वेब सीरिजचे दिग्दर्शक गुरमीत सिंह आणि मिहीर देसाई आहेत. ही वेब सीरिज फरहान अख्तर, रितेश सिधवानी यांच्या एक्सेल मीडिया आणि एंटरटेनमेंट यांनी प्रोड्यूस केलं आहे.

ईशा तलवार ची सर्वत्र चर्चा

पंकज त्रिपाठीसोबत ईशा तलवार ओटीटी प्लॅटफॉर्मवर इशाची कामयाब ही फिल्म रिलीज झाली. याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. या सिनेमात संजय मिश्रा देखील आहेत.ईशाने अनेक सिनेमांमध्ये साकारल्या वेगवेगळ्या भूमिका … ईशाने ट्यूबलाईट सिनेमांत साकारली होती ऐश्वर्याच्या बहिणीची भूमिका. आर्टिकल १५ मध्ये दिसली ईशा. ईशाने अदिती रंजनची भूमिका साकारली होती. इशाची वेगळी भूमिका लोकप्रिय होत आहे.

सीरिजचा तिसरा सिझनसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार

पहिला सिझन संपल्यापासूनच दुसऱ्या सिझनची उत्सुकता प्रचंड वाढली होती. आता या वेब सीरिजचा तिसरा सिझनसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा आहे. ‘मिर्झापूर’च्या पहिल्या सिझनपेक्षा अधिक खर्च दुसऱ्या सिझनसाठी झाला आहे.

किती आहे बजेट ?

विशेष म्हणजे दुसऱ्या सिझनसाठी कलाकारांचं मानधनसुद्धा वाढवण्यात आलं आहे. ‘मिर्झापूर’मुळे कालीन भैय्या, गुड्डू आणि मुन्ना या भूमिका प्रसिद्ध झाल्या. पहिल्या सिझनचा बजेट १२ कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे. तर दुसऱ्या सिझनसाठी निर्मात्यांनी तब्बल ६० कोटी रुपये खर्च केले आहेत. आता तिसऱ्या सिझनसाठी या बजेटमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.