Take a fresh look at your lifestyle.

बिहारचा तो मुख्यमंत्री ज्याचं निधन झालं तेव्हा फक्त झोपडी शिल्लक होती

देशात मंडल आयोगपूर्वीच बिहारमध्ये कर्पुरी ठाकूर मुख्यमंत्री असताना मागासवर्गीय समाजाला २७ टक्के आरक्षण दिले होते.

0

भारताच्या राजकारणात लाखो-करोडो रुपये आणि मसल पॉवर हे सर्वमान्य आहे. पण दुसरीकडे अशी अनेक उदाहरणे आहेत, ज्यांचा साधेपणा, प्रामाणिकपणा हा उत्तम राजकारणाचे उदाहरण म्हणता येईल.

सध्या देशभरात बिहार निवडणुकांची चर्चा चालू आहे. यावेळी बिहारच्या एका माजी मुख्यमंत्र्यांचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे. ते म्हणजे कर्पुरी ठाकूर. कर्पुरी ठाकूर यांच्या सारखी भारतीय राजकारणात फारच कमी उदाहरणे असतील.

दशकात दोनदा बिहारचे मुख्यमंत्री

बिहारमध्ये जननायक म्हणून ओळखले जाणारे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांच्याबद्दल आपल्याला माहित असायला पाहिजे. स्वातंत्र्यसैनिक, शिक्षक, राजकारणी आणि बिहारचे दुसरे उपमुख्यमंत्री आणि दोन वेळा मुख्यमंत्री, असा मोठा प्रवास कर्पुरी ठाकूर यांचा राहिला आहे.

जयप्रकाश नारायण आणि राम मनोहर लोहिया हे कर्पुरी ठाकूर यांचे राजकीय गुरू होते. 1970 च्या दशकात कर्पुरी ठाकूर दोनदा बिहारचे मुख्यमंत्री होते.

कर्पुरी ठाकूर यांनी देशात मंडल आयोगपूर्वीच बिहारमध्ये ते मुख्यमंत्री असताना मागासवर्गीय समाजाला २७ टक्के आरक्षण दिले होते.

24 जानेवारी 1924 रोजी समस्तीपूर येथील पितांझारिया (आता कर्पुरीग्राम) येथे जन्मलेले कर्पुरी ठाकूर हे बिहारचे पहिले बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री होते. बिहारची सत्ता मुख्यमंत्रिपदाच्या दोन टर्ममध्ये अडीच वर्षे त्यांच्या हातात होती. लोकांमध्ये इतके लोकप्रिय होते की १९५२ च्या पहिल्या विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांचा कधीही पराभव झाला नाही.

कोट उधार मागितला

आणखी एक कथा कर्पुरी ठाकूर यांच्याबद्दल प्रसिद्ध आहे. १९५२ मध्ये कर्पुरी ठाकूर प्रथमच आमदार झाले. त्याच काळात ऑस्ट्रियाला चाललेल्या एका शिष्टमंडळात त्याची निवड करण्यात आली. त्यांच्याकडे कोट नव्हता. मग एका मित्राकडून त्यांनी कोट उधार मागितला. तो पण फ़ाटलेलाच होता. तरीही कर्पुरी ठाकूर यांनी तोच कोट घातला होता.

तेथे युगोस्लाव्हियाचे शासक मार्शल टिटो यांना कर्पुरी ठाकूर यांचा कोट फाटलेला असल्याचे दिसले आणि त्यांनी लगेच त्यांना एक नवीन कोट भेट दिला.

कारवाई करणे बंद केले

त्यांच्या राजकीय चिंतेची आणखी एक कथा म्हणजे ते मुख्यमंत्री असतानाच त्यांच्या गावातील काही वर्चस्ववादी लोकांनी त्यांच्या वडिलांचा अपमान केला. बातमी पसरताच डीएमने कारवाई करण्यासाठी गावाशी संपर्क साधला, पण कर्पुरी ठाकूर यांनी कारवाई करणे बंद केले.

ते म्हणाले की, गावात शोषितांचा अपमान केला जात आहे आणि पोलीस तिथे आहेत.

मागासांना २७ टक्के आरक्षण दिले

१९६० च्या दशकात देशातील समाजवादी चळवळ काँग्रेसच्या विरोधात तीव्र होत होती. १९६७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या नेतृत्वाखाली बिगर काँग्रेसवादाचा नारा देण्यात आला. काँग्रेसचा पराभव झाला आणि बिहारमध्ये प्रथमच बिगर काँग्रेस सरकार स्थापन झाले.

सत्तेत सर्वसामान्य आणि मागास लोकांचा सहभाग वाढला. त्या सरकारमध्ये कर्पुरी ठाकूर उपमुख्यमंत्री झाले. 1977 मध्ये जनता पक्षाच्या विजयानंतर ते बिहारचे मुख्यमंत्री झाले.

सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची मागणी जोरजोरात आणि गोंगाटाने वाढत होती. कर्पुरी ठाकूर यांनी मागासांना २७ टक्के आरक्षण दिले.

घरात एक इंचही जमीन जोडता आली नाही.

१९५२ च्या पहिल्या विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर बिहार विधानसभेत त्यांचा कधीही पराभव झाला नाही. पण प्रामाणिकपणा इतका होता की राजकारणात इतका प्रदीर्घ प्रवास केल्यानंतर त्यांचे निधन झाले तेव्हा त्यांना आपल्या कुटुंबाचा वारसा हक्कासाठी घरही नव्हते. पाटण्यात किंवा त्याच्या पुर्वजांच्या घरात एक इंचही जमीन त्यांना जोडता आली नाही.

कोणाला कधीही काही मागितलं नाही

“कर्पुरी ठाकूर यांची आर्थिक टंचाई लक्षात घेता देवीलाल यांनी पाटण्यातील आपल्या एका मित्राला सांगितले होते: “कर्पुरीजीनी तुम्हाला कधीही पाच ते दहा हजार रुपये मागितले तर त्यांना द्याल , ते मी तुम्हाला देईल ,” असे हेमावती नंदन बहुगुणा यांनी लिहले आहे.

नंतर देवीलाल यांनी आपल्या मित्राला अनेकदा विचारलं- की कर्पुरीजींनी काहीतरी मागितलं का . तेव्हा तेव्हा मित्राने उत्तर दिले – नाही सर, ते काहीही मागत नाहीत.

जननायक कर्पुरी ठाकूर यांचे 17 फेब्रुवारी 1988 रोजी वयाच्या 64 व्या वर्षी निधन झाले.कर्पुरी ठाकूर यांच्या निधनानंतर हेमावती नंदन बहुगुणा त्यांच्या गावी गेल्या . त्यांची वडिलोपार्जित झोपडी पाहून बहुगुणा यांना देखील रडू कोसळले

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.