जपान मध्ये निवडून आलेले पुण्याचे मराठमोळे आमदार
देशात सार्वत्रिक निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच ‘उगवत्या सूर्याच्या देशात’ अर्थात, जपानमधील निवडणुकीत एका पुणेकराने आपला झेंडा रोवला आहे. मराठी जनांसाठी अभिमानाचा विषय ठरलेला हा पुणेकर म्हणजे योगेंद्र पुराणिक होय.
जपानमधील टोकियोतील विधानसभा निवडणुकीच्या मैदानात योगेंद्र पुराणिक उतरले आहेत. ते मूळचे पुणेकर आहेत . ही निवडणूक लढवणारे ते पहिलेच भारतीय नव्हे तर , पहिले आशियायी व्यक्तीही ठरले आहेत .
मूळचे पुण्याचे आणि आता जपानमध्ये स्थायिक झालेले योगेंद्र पुराणिक (वय ४१) टोकियोतील एडोगावा येथील महापलिका निवडणुकीत सुमारे ६ हजार ४७७ मतांनी निवडून आले आहेत. या निवडणुकीसाठी २१ एप्रिलला मतदान झाले होते. मंगळवारी (२३ एप्रिल) निवडणुकीचा निकाल लागला.
‘कॉन्स्टिट्यूशनल डेमॉक्रॅटिक पार्टी ऑफ जपान’ या पक्षातर्फे पुराणिक यांनी निवडणूक लढविली. हा पक्ष जपानमधील प्रमुख विरोधी पक्ष आहे. अशाप्रकारे जपानमध्ये विजयी पताका फडकावणारे पुराणिक पहिलेच भारतीय ठरले आहेत. विशेष म्हणजे, जपानमध्ये सर्वाधिक मते मिळणाऱ्या उमेदवारांमध्ये ते पाचव्या क्रमांकावर आहेत.
कोण आहेत योगेंद्र पुराणिक ?
योगेंद्र पुराणिक हे मुळचे पुण्याचे आहेत. पुराणिक यांचा जन्म अंबरनाथ येथे झाला. त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील एस. पी. महाविद्यालयामध्ये घेतले. नंतर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्रात एम. ए. केले.
याच काळात त्यांनी फर्ग्युसन रस्त्यावरील परकीय भाषा विभागातून जपानी भाषेचे धडे गिरविले. तसेच, आयटी़चे काही अभ्यासक्रम पूर्ण केले. शिष्यवृत्ती मिळाल्यावर पहिल्यांदा एक महिन्यांसाठी तर नंतर एक वर्षासाठी ते जपानला गेले होते.
जपानच्या बँकेत कामाला…
१९९७ साली त्यांनी शिक्षणासाठी पुणं सोडलं आणि जपान गाठलं. त्यांनी जपान मध्ये वेगवेगळ्या IT कंपन्यांमध्ये काम केलं. त्यानंतर ते जपानच्या बँकेत कामाला होते. ते गेल्या २१ वर्षापासून जपान मध्ये वास्तव्य करत आहेत. सध्या ते ज्या एडोग्वा भागातून निवडणूक लढतायत त्या भागात राहून त्यांना १५ वर्ष पूर्ण झाली आहेत. गेल्या १० वर्षापासून ते स्थानिक राजकारणात सक्रीय आहेत.
राजकारणात प्रवेश केला
योगेंद्र पुराणिक पहिल्यांदा 1997 मध्ये जपानमध्ये गेले होते. त्यावेळी ते कॉलेजमध्ये शिकत होते. त्यानंतर जपानमधील दोन वर्षांच्या अभ्यासक्रमानंतर योगी भारतात परतले. 2001 मध्ये इंजिनीअर बनल्यानंतर योगी पुन्हा जपानमध्ये गेले. जपानमध्ये त्यांनी एका बँकेत नोकरी केली आणि 2005 मध्ये ते एदोगावा येथे राहायला आले. योगींनी जपानची नागरिकता मिळवली आणि तेथील राजकारणात प्रवेश केला.
२१ वर्षांपासून जपानमध्ये राहत असल्यामुळे ते आता अधिकृत जपानी नागरिक आहेत.
पुराणिक यांना जपान भावला अन ते तिथेच स्थायिक झाले. ते २१ वर्षांपासून जपानमध्ये राहत असल्यामुळे ते आता अधिकृत जपानी नागरिक आहेत.आयटीनंतर बँकेत नोकरी करून ते आता हॉटेल व्यवसायात रमले आहेत.
मराठमोळे खाद्यपदार्थ देणारे रेखा – इंडियन होम फूड हे हॉटेल त्यांनी एदुगवामध्ये उघडले असून आता योगी हे त्यांचे दुसरे हॉटेलही लवकरच सुरू होणार आहे. पुराणिक यांची ६५ वर्षांची आई रेखा या त्यांच्यासोबतच जपानमध्ये राहतात तर १८ वर्षांचा मुलगा चिन्मय हा ब्रिटनमध्ये शिक्षण घेतो.
सध्या योगेंद्र पुराणिक निवृत्त झाले आहेत आणि त्यांना जपानच्या एडोग्वा भागात बदल घडवायचा आहे. हा भाग भारताचं मिनी रूप आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण या भागात तब्बल ४,५०० भारतीय राहतात. या भागासाठी योगेंद्र पुराणिक जपानच्या कॉन्स्टीट्युएंट डेमोक्रेटिक पार्टी तर्फे लढत होते.
१० टक्के भारतीय जनता एडोगावा येथे वास्तव्यास
योगी’ या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या पुराणिक यांनी ‘जपानी आणि परदेशी नागरिकांमधील सेतू होण्याची माझी इच्छा आहे,’ अशी भावना विजयानंतर बोलून दाखवली. आपल्या पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्यामध्ये त्यांनी व्यावसायिक शिक्षण आणि प्रत्येक मुलाला सरकारी शाळेत शिक्षण आदी मुद्यांचा समावेश केला आहे.
टोकियोतील २३ मतदारसंघांमध्ये एडोगावामध्ये ४ हजार ३०० भारतीय मतदार आहेत. जपानमधील भारतीयांची संख्या पाहता, जवळपास १० टक्के भारतीय जनता एडोगावा येथे वास्तव्यास आहे. या मतदारसंघात कोरियन आणि चिनी नागरिकांचीही संख्या मोठी आहे.
योगी ज्या विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. तिथे सर्वाधिक भारतीय राहतात. टोकियोच्या 23 वॉर्डमधील राहणाऱ्या 4,300 लोकांमध्ये दहा टक्के लोक भारतीय आहेत. जपानमध्ये एकूण 34 हजार भारतीय राहतात. तसेच योगींच्या वॉर्डमध्ये चायनीज आणि कोरियनलोकही राहतात.
जपानच्या निवडणुकीत भारतीय वंशाचे जपानी नागरिकाने पहिल्यांदा येथील निवडणुकीत विजय मिळवला आहे.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम