Take a fresh look at your lifestyle.

मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडचा विक्रम, एकाच ओव्हरमध्ये सात सिक्स

हाराष्ट्राचा युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने आजपर्यंत कोणीही क्रिकेटपटू करू शकला नाही ते करून दाखवले आहे. ऋतुराजने उत्तर प्रदेशविरुद्ध एकाच षटकात 7 षटकार मारून इतिहास रचला आहे.

0

भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने इंग्लंडचा फास्टर बॉलर स्टुअर्ट ब्रॉडच्या एकाच ओव्हरमध्ये सहा सिक्स ठोकले होते. युवराज सिंगचा हा विक्रम आजवर अबाधित होता. पण महाराष्ट्राचा युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने आजपर्यंत कोणीही क्रिकेटपटू करू शकला नाही ते करून दाखवले आहे. ऋतुराजने उत्तर प्रदेशविरुद्ध एकाच षटकात 7 षटकार मारून इतिहास रचला आहे.

ऋतुराज सध्या विजू हजारे ट्रॉफीमध्ये महाराष्ट्र टीमचे प्रतिनिधित्व करतो आहे. उत्तर प्रदेश संघाच्या शिवा सिंगच्या 49व्या षटकात त्याने 7 षटकार ठोकले. या सामन्यात वेगवान फलंदाजी करताना त्याने 159 चेंडूत 10 चौकार आणि 16 गगनचुंबी षटकारांच्या मदतीने 220 धावांची खेळी केली आणि आपल्या संघाची धावसंख्या 50 षटकात 330 धावांपर्यंत नेली.

विशेष म्हणजे 2007 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये युवराज सिंगने एका ओव्हरमध्ये 6 सिक्स मारले होते. तर त्याच्या आधी हा पराक्रम माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केला होता त्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये एका षटकात 6 षटकार मारले होते. एका षटकात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम न्यूझीलंडच्या ली जर्मोनच्या नावावर आहे, ज्याने वेलिंग्टन येथे शेल ट्रॉफी सामन्यात आठ षटकार ठोकले होते.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.