बाबरी मशिदीच्या आधी अनेक वर्ष एक राम मंदिर जगातील हजारो लोकांचं लक्ष वेधून घ्यायचं
१५२६ मध्ये बापाकडून तैमूर आणि आईकडून चेंगीसच्या वंशज असलेला मुस्लिम आक्रमक म्हणून झहिर उद-दिन मुहंमद उर्फ बाबर याची ओळख आहे. बाबराचा वजीर मीर बक्षी याने अयोध्येतील राम मंदिर पाडून त्याठिकाणी बाबरी मशीद उभी केली. १८५७ उठावात हिंदू समर्थकांनी बाबरीच्या मशिदीत चौथारा बांधून पूजा सुरु केली होती. १९३६ साली हि मशीद शिया कि सुन्नी यांच्यावरून देखील भरपूर वादंग झाला होता.
पुढे राजीव गांधी यांनी शायराबानो प्रकरणाला वळण देण्यासाठी राम मंदिराचा मुद्दा चेतवून दिला आणि त्यातून त्यांना त्याची सहानभूती मिळावी पण उलटच घडले. तत्कालीन भाजपा आणि संघ नेत्यांनी हा मुद्दा राजकीय पटलावर उचलून धरला आणि बाबरी कांड घडलं याच्याशी संपूर्ण देश परिचित आहे. आता सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा जुना निर्णय बदलून हि रामजन्मभूमी आहे आणि इथे मंदिर होईल हा निर्णय दिला.
आज अयोध्येमध्ये श्री रामाच्या मंदिराचे आज भूमिपूजन होत आहे. गेली अनेक दशके एक वादाचा मुद्दा बनून राहिलेल्या या अध्यायाचा हा शेवट म्हणता येईल. अयोध्येमधील श्रीराम मंदिर हा हिंदू मुस्लीम वादाचा केंद्रबिंदू राहिला. देशात ब्रिटीश शासक असल्यापासून आतापर्यत अनेक दंगली यामुळे घडून गेल्या.
पण भारतात बाबरी मशिदीच्या आधी अनेक वर्ष एक राम मंदिर जगातील हजारो लोकांचं लक्ष वेधून घ्यायचं,
ते मंदिर म्हणजे विजयनगरचे हजार राम मंदिर.
विजयनगर म्हणजे “विजयाचे शहर”, हे साम्राज्य म्हणजे इ.स. १३३६ ते १७७२ पर्यंत राज्य भारताच्या इतिहासातील एक अजरामर अध्याय आहे. विजयनगर साम्राज्याने मंदिराच्या कला व स्थापत्यकलेच्या विकासात अतिशय नावीन्यपूर्ण आणि धर्मनिरपेक्ष भूमिका बजावली आहे. स्थापत्यशास्त्रीयदृष्ट्या विजयनगरमध्ये शतकांपासून जुनी द्रविड शैली आणि शेजारील राष्ट्रांच्या इस्लामिक शैलीचा प्रभाव आणि संश्लेषण आहे.
विजयनगरचे स्थापत्यशास्र संरक्षण, धार्मिक, धर्मनिरपेक्ष आणि नागरी अशा चार गटात वर्गीकृत केले जाते. १३ व्या शतकात कर्नाटकमध्ये तुंगभद्रा नदीच्या वसलेल्या विजयनगरच्या राजधानी हंपीचे वर्णन हिंदू साम्राज्याची राजधानी म्हणून जगभर होते.
हजाराम मंदिर किंवा ‘हजारा राम मंदिर’ हंपीच्या जगप्रसिद्ध हिंदू मंदिरांपैकी एक आहे.
हे मंदिर भगवान विष्णूला समर्पित हंपी प्रदेशातील सर्वात लोकप्रिय मंदिरांपैकी एक आहे. हंपीतील अनेक पर्यटन स्थळांचा गौरवशाली इतिहास दाखविणार्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. राजा कृष्णदेव राय या मंदिराचा निर्माता असल्याचे म्हटले जाते. शाही परिघाच्या मध्यभागी असलेले ‘हजाराम मंदिर’ हंपीचे मुख्य आकर्षण आहे.
भगवान राम हा विष्णूचा अवतार मानला जातो अन विष्णूला समर्पित हे हंपी प्रदेशातील सर्वात लोकप्रिय मंदिरांपैकी एक आहे. मंदिराच्या अंतर्गत आणि बाहेरील भिंतींवर उत्कृष्ट खोदकाम केले गेले आहे. बाहेरील खोल्यांच्या छताच्या खाली असलेल्या शिलालेखात हत्ती, घोडे, नृत्य करणारे बाला आणि कूच करणारे सैन्य दाखवले गेले आहे, तर आतील भागात ‘रामायण’ आणि हिंदू देवतांचे दृश्य आहेत. यात असंख्य पंख असलेले गरुडचे चित्रणही केले गेले होते.
मंदिरातील चार कोरलेली ग्रॅनाइट स्तंभ अर्ध-मंडपाच्या सौंदर्यात भर घालतात. ‘हजार राम मंदिरात भगवान बुद्धांची एक मूर्ती स्थापित केली गेली आहे. हजाराम मंदिराजवळ ‘जनानखाना’ आणि ‘कमल महल’ ही इतर आकर्षणे आहेत. हि मंदिरे हि धर्मनिरपेक्ष मंदिरे मानली जातात. धर्मनिरपेक्ष स्थापत्यशैली म्हणून पाण्याच्या टाक्या, विहीरी, मुख्य इमारती आणि सोबतच्या सहायक इमारती ह्या इंडो-सारासेनिक (हिंदू आणि मुस्लिम वैशिष्ट्ये) स्थापत्यशैलीमध्ये चित्रित आहेत.
आंध्र प्रदेशातील लेकाक्षीच्या वीरभद्र मंदिरात ज्याचे तंत्र वापरले आहे ते बहुदा वाकाटकांच्या महाराष्ट्राच्या अजिंठा चित्रांमधून प्रेरित होते, त्याची स्थापत्यशैली धार्मिक ऐवजी धर्मनिरपेक्ष होती. घुमट आणि कमानींचा वापर त्या काळात विजयनगरच्या विविध राजांच्या दरबारात मुस्लिम वास्तुविशारदांच्या उपस्थितीमुळे राज्यात प्रचलित धर्मनिरपेक्षता होती अशी या विजयनगरच्या साम्राज्याची ओळख होती.
राम मंदिर आणि भारतातील अनेक मंदिरे धर्मनिरपेक्ष विचारांचे प्रतीक आहेत याची प्रचिती विविध स्थापत्यशैलीच्या वैशिष्ट्यावरून समजते. अलीकडच्या काळात मंदिर म्हंटले कि हिंदूवादी आणि इतर धर्माचं लांगुलचालन केलं कि धर्मनिरपेक्ष अशी व्याख्या झाली आहे ती आता येत्या काळाच्या पडद्याआड जाईल.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम