डोनाल्ड ट्रम्प गुन्ह्यात अटक होणारे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष; काय आहे ‘पॉर्नस्टार’ प्रकरण
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन कोर्टात हजर होताच अटक करण्यात आली आहे. त्यामुळे एखाद्या प्रकरणात अटक झालेले डोनाल्ड ट्रम्प हे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन कोर्टात हजर होताच अटक करण्यात आली आहे. त्यामुळे एखाद्या प्रकरणात अटक झालेले डोनाल्ड ट्रम्प हे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत.
गुन्ह्यांच्या आरोपांना सामोरे जावे लागलेले ते पहिले माजी राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. पण डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर नक्की आरोप काय आहे. हे समजून घ्या.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
गोष्ट आहे २०१६ ची. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनण्याची तयारी करत होते. अर्थात अमेरिकेची जी बरीच मोठी निवडणून प्रक्रिया आहे. ज्यामध्ये अनेक फेऱ्यामधून प्रचार केला जातो. त्यावेळी एका अडल्ट फिल्म स्टारने डोनाल्ड ट्रम्प यांचे आपल्याशी घनिष्ठ संबंध आहेत, असा स्टेटमेंट दिले. त्यावर निवडणूक प्रचारात अडथळा नको, यासाठी ट्रम्प यांच्या वकिलाने त्या अडल्ट फिल्म स्टारला शांत राहण्यासाठी १ लाख ३० हजार डॉलर एकटे पैसे दिले होते.
कोण आहे स्टॉर्मी डॅनियल?
स्टॉर्मी डॅनियल ही एक पॉर्न स्टार आहे. तिचे खरे नाव स्टेफनी ग्रेगरी क्लिफर्ड आहे. मीडिया रिपोर्टनुसार आई-वडिलांच्या घटस्फोटानंतर त्याचे पालनपोषण त्याच्या आईने केले. वयाच्या नऊव्या वर्षी एका वृद्ध व्यक्तीने तिचे लैंगिक शोषण केले होते. सध्या स्टॉर्मी डॅनियल्सला एक मुलगी आहे तर तिने काही महिन्यापूर्वी अडल्ट चित्रपटातच स्टार म्हणून काम करत असलेल्या बॅरेट ब्लेड्स यांच्याशी चौथ्यांदा लग्न केले आहे.
स्टॉर्मी डॅनियलने काही वर्षांपूर्वी ‘फुल डिस्क्लोजर’ या नावाने एक पुस्तक प्रकाशित केले आहे. या पुस्तकात तिने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. तिने ती अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पसोबत यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा केला आहे. डॅनियलच्या म्हणण्यानुसार जुलै २००६ मध्ये एका गोल्फ टूर्नामेंटदरम्यान ती ट्रम्प यांना पहिल्यांदा भेटली होती. तेव्हा डॅनियलचे वय होते २७ तर ट्रम्प ६० वर्षांचे होते.
पैसे का दिले गेले?
स्टॉर्मी डॅनियलच्या दाव्यानुसार नेवाडा येथे एका सेलिब्रिटी गोल्फ स्पर्धेदरम्यान ट्रम्प यांनी तिला आपल्या हॉटेलच्या खोलीत बोलावले होते. ट्रम्प यांनी स्टॉर्मीला टीव्ही स्टार बनवण्याचे आश्वासन दिले आणि स्टॉर्मीच्याच म्हणण्यानुसार ट्रम्प आणि तिच्यात शारीरिक संबंध होते. पण दुसरीकडे ट्रम्प यांनी स्टॉर्मीच्या या दाव्याच्या इन्कार केला आहे. तर ट्रम्प म्हणतात मी काहीही चुकीचं केलं नाही.
पण हे प्रकरण आहे स्टॉर्मी डॅनियल यांना ट्रम्प यांनी एक लाख तीस हजार डॉलर्स दिल्याचं. ग्रँड ज्युरी तपासात असे आढळून आले की २०१६ साली डॅनियलने मीडियासमोर खुलासा केला होता की तिचे आणि ट्रम्पचे घनिष्ट संबंध होते. हे मीडियात समोर आल्यानंतर ट्रम्प यांच्या वकिलांनी स्टॉर्मीला शांत राहण्यासाठी तब्बल १ लाख ३० हजार डॉलर दिले होते.
या प्रकरणात साक्षीदार मानले जात असलेल्या कोहेन यांनी ऑगस्ट २०१८ मध्ये आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांनी कबूल केले की त्याने स्टॉर्मी डॅनियलला पैसे देण्यास मदत केली. एवढेच नाही तर ट्रम्प यांच्या प्रचारात मदत करण्यासाठी आणखी एका मॉडेलला पैसे दिल्याची कबुली त्यांनी दिली तेच. हे सर्व ट्रम्प यांच्या सांगण्यावरून केल्याचं ते सांगतात. त्यामुळे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आर्थिक अनियमितता केल्याचा आरोपही ट्रम्प यांच्यावर आहे.
कारवाई होणारे पहिले राष्ट्राध्यक्ष
आता याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे गुन्हेगारी खटल्याचा सामना करणारे ट्रम्प हे अमेरिकेचे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. मात्र अजूनही हे आरोप सार्वजनिक करण्यात आलेले नाहीत. गुन्हेगारी आरोपांच्या कारवाईला सामोरे जाणारे ते अमेरिकेचे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम