Take a fresh look at your lifestyle.

शेतीसाठी विकली कंपनी; आज कमवतोय लाखो रुपये

0

मागच्या काही वर्षात युवकांचा शेतीकडे कल सातत्याने वाढत आहे. याची अनेक उदाहरणे तुम्हाला माहित असतीलही. पण आज तुम्हाला अशा एका मुलाची ओळख करून देणार आहे, ज्याने हायड्रोपोनिक शेती करण्यासाठी त्यांची सॉफ्टवेअर कंपनी विकली.

गोव्यात राहणारे अजय नाईक नेहमी विचार करायचे, आपण जर शेती करायला लागलो तर लोक काय म्हणतील ? पण त्यांनी आपल्या मनाचे ऐकले आणि शेतीत करिअर केले.

इंजिनिअरिंग ते शेती

अजय मुळचा कर्नाटकचा रहिवासी आहे. इंजिनीअरिंग केल्यानंतर नोकरीच्या शोधात ते गोव्यात पोहोचले. जिथे त्याने 2011 मध्ये आपली मोबाईल अप्लिकेशन मॅन्युफॅक्चरिंग कंपनी सुरू केली. त्यानंतर त्यांच्या कंपनीने एक चांगला व्यवसाय केला.

पण यशस्वी कंपनी असूनही रासायनिक पदार्थांच्या निर्मितीवर ते नेहमीच तणावात होते. त्यानंतर शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीची जाणीव करून द्यावी असा विचार त्यांना सुचला.

त्यानंतर ते शेतीशी संबंधित गोष्टी वाचू लागले. त्यासाठी त्यांनी पुण्यातील एका शेतक-याकडून हायड्रोपोनिक शेतीचे प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षण घेतल्यानंतर त्याने २०१६ मध्ये आपली सॉफ्टवेअर कंपनी शेतीसाठी विकली.

हायड्रोपोनिक शेती म्हणजे काय

हायड्रोपोनिक शेती हे पिकं वाढवण्याचे एक नवीन तंत्रज्ञान आहे. यामध्ये जमिनीऐवजी पाण्याचा वापर केला जातो आणि पिकाला गरजेइतकेच पाणीही वापरले जाते. याशिवाय पिकाला आवश्यक ती मात्रा पाण्यामधून दिली जाते. योग्य प्रमाणात पाणी आणि सूर्यप्रकाशाच्या योग्य प्रमाणात वनस्पती वाढतात.

शेती करताना अजयला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. शेतात तो आणि त्याची टीम दिवसरात्र काम करत होती. त्याचेच फलित म्हणजे आज अजय आणि त्याची टीम त्यांच्या शेतातील सेंद्रिय भाज्यांमधून दरमहा लाखो रुपये कमवतात.

आज अजयची टीम हायड्रोपोनिक शेती चांगली काम करत आहे. सध्या तो या शेतात सॅलड-संबंधित वनस्पतीची वाढ करत आहे. काकडी, कॅप्सिकम आणि स्ट्रॉबेरी पिकवण्याची त्याची इच्छा आहे. राज्यातील पंचतारांकित हॉटेल्स, सुपर मार्केट आणि शेतकरी बाजारात त्यांच्या शेतमालाला मागणी जास्त आहे.

शेतीमध्ये नवनव्या तंत्रज्ञानचा वापर केल्यास शेती नक्कीच तुम्हाला जास्तीत जास्त फायदा मिळवून देत असते. तुम्हाला जर असे नवनवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्याविषयी माहिती असेल. तर आम्हाला नक्की कळवा.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.