Take a fresh look at your lifestyle.

“बॉईज लॉकर रूम” तुम्हीही याचा भाग असू शकता ?

0

सोशल मिडीयाच्या या जमान्यात नेहमी काहीतरी ट्रेंड येतो. त्यावर चर्चा सुरु होते. मागच्या दोन दिवसात असाच एक ट्रेंड ट्विटर आणि इन्स्टाग्राम वर आला आहे. तो ट्रेंड म्हणजे “बॉईज लॉकर रूम”

नक्की काय आहे बॉईज लॉकर रूम ?

बॉईज लॉकर रूम हा इन्स्टाग्रामवरचा एक प्रायवेट ग्रुप आहे. तुम्ही आम्ही सगळेच इन्स्टाग्राम वापरतो. यावर आपलेही काही ग्रुप असतील. असाच एक ग्रुप आहे बॉइज लॉकर रूम. या ग्रुपचे बहुतेक सदस्य सतरा – अठरा वर्षांची किशोरवयीन मुले आहेत. काही दिवसापूर्वी या ग्रुपमधील या किशोरवयीन मुलांची संभाषणे लिक झाली आणि त्याची गंभीर चर्चा सुरु झाली.

अस काय होत त्या चॅटमध्ये ?

या ग्रुप मधील चॅट सोशल माध्यमात जाहीर झाल्यानंतर त्यावर चर्चा चालू झाली. यामध्ये ‘बॉईज लॉकर रूम’ नावाच्या इन्स्टाग्राम ग्रुपमध्ये मुलींचे फोटो शेअर करणाऱ्या काही मुलांच्या गटात अश्लील संभाषणे उघडकीला आली आहेत .”आम्ही तिच्यावर सहज पणे बलात्कार करू शकतो आणि “तुम्ही जेव्हा जेव्हा म्हणाल तेव्हा मी येईन, आम्ही तिच्यावर सामूहिक बलात्कार करू”. (इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर उपलब्ध असलेल्या स्क्रीनशॉट्स आणि धाग्यांतून काढलेली ही काही अस्वस्थ करणारी विधाने आहेत)अश्या विकृत मानसिकतेच्या गप्पा या इन्स्टाग्राम ग्रुप  वर चालायच्या.

एका ट्विटर युजरने या इन्स्टाग्राम ग्रुप चॅट सोशल माध्यमात शेअर केली आणि सोशल माध्यमात एकच खळबळ उडाली. इन्स्टाग्राम ग्रुप ‘बॉईज लॉकर रूम’ या ग्रुपची पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे. या ग्रुपच्या चॅटचे स्क्रीनशॉट्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राइम ब्रँचने या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. ४ मे रोजी संध्याकाळी. आता या टोळीतील एका मुलाला पकडण्यात आले आहे, अशी माहिती समोर आली आहे.सायबर सेलमध्ये कलम 465 (बनावट कागदपत्रे किंवा इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डचा वापर) एफआयआरमध्ये, 469 (एखाद्याच्या प्रतिष्ठेला हानी पोहचविण्याच्या हेतूने बनावट), 509 (एखाद्या स्त्रीचा अपमान किंवा शब्द वापरणे) आणि कलम 67 लावले आहेत.

पुढे काय ?

सोशल मीडियात ‘बॉईज लॉकर रूम’ ची चर्चा चालू असताना दुसरीकडे अजून एक धक्कादायक अशी  पुन्हा समोर येऊ लागली आहे. जसा मुलांचा ‘बॉईज लॉकर रूम’ हा ग्रुप जसा ट्रेण्ड होत आहे. त्याचप्रमाणे मुलींचं लॉकर रूम ट्रेंडिंग होत आहे.

सोशल मीडियावर जशी मुलांची लॉकर रूम ट्रेंड होत होती, त्याचप्रमाणे मुलींचं लॉकर रूम ट्रेंडिंग होत आहे. तुम्ही म्हणसाल  हे काय नवीन तर त्याच झालं असं कि  ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर काही लोक मुलींच्या काही गटांत चॅटचे स्क्रीनशॉटस वायरल झाले . त्या गप्पांमध्ये मुली मुलांच्या लॉकर रूमप्रमाणे चर्चा करताना आढळून आल्यात .’बॉईज लॉकर रूम’ या ग्रुपप्रमाणे दुस-या ग्रुपचे देखील हे स्क्रीनशॉटही व्हायरल होत आहेत. या ग्रुपमध्ये असे दिसून येते की, मुलींनी मुलांचे फोटो शेअर केले आहेत. त्यांच्या शरीराचे अवयव कसे खाजगी असतात, याबद्दल ते बोलत आहेत.

चॅटदरम्यान एका मुलीला हे मेसेज लीक होत असल्याचं कळलं. त्या गप्पा बाहेर काढणाऱ्या मुली म्हणाल्या की, ग्रुपमधील एका सदस्याने तिला हे स्क्रीनशॉट पाठवले होते. आणि असे ही सांगितले गेले की, इतर अनेक गट आहेत जिथे मुलांचे फोटो टाकले जातात, गोष्टी बद्दल बोलले जाते, त्यांच्या खाजगी भागांबद्दल बोलले जाते आणि कमेंट्स केल्या जातात.

यामुळे मोबाईलचा वापर यावर नव्याने चर्चा सुरु झाल्या आहेत. पालक आपल्या मुलांना मोबाईल हातात देतात. मोबाईलसोबत येणारी जबाबदारीची जाणीव पालक करून देत आहेत का? असा प्रश्न आपण आपल्यालाच विचारणे गरजेचे आहे.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.