Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्रातील एका गावाकडे ५ हजार कोटींची मालकी आहे

महाराष्ट्रात असं एक गावं आहे. ज्या गावाकडे ५ हजार कोटींची मालकी आहे.

0

आज लॉकडाऊन मुळे शहरातील लोकं पुन्हा गावाकडे जावू लागले आहेत. यानिमित्ताने देशातील गावांची परिस्थिती काय आहे ? असा एक प्रश्न पुन्हा उपस्थित केला जात आहे. पण महाराष्ट्रात असं एक गावं आहे. ज्या गावाकडे ५ हजार कोटींची मालकी आहे.

असं म्हटलं जात या गावात रस्त्यांवरून चालत जाणारा एखादा साधा माणूस देखील तब्बल पाच, दहा कोटींचा मालक असू शकतो.

पण हे सगळ कस शक्य झाल ? याच सगळं श्रेय जात विप्रो या कंपनीला.

याची सुरवात भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळात. आज आपण सर्वजण अजिम प्रेमजी यांना ओळखतो. या अजिम प्रेमजी यांचे वडिल मोहम्मद हुसेन हाशन प्रेमजी हे बर्माचे प्रिन्स ऑफ राईस म्हणून ओळखले जायचे. स्वातंत्र्यपूर्व काळात प्रेमजी कुटूंब गुजरातच्या कच्छला आले.

मात्र इंग्रजांच्या व्यापारी धोरणांना कंटाळून त्यांनी वनस्पती तूप अर्थात डालडा तयार करण्यास सुरवात केली. २९ डिसेंबर १९५४ साली वेस्टर्न इंडिया वेजिटेबल प्रोडक्टस् लिमिडेट या कपंनीची स्थापना करण्यात आली.

इथे एक बाब आवर्जून सांगावी लागेल, आज आयटी क्षेत्रात बाप असणाऱ्या विप्रो कंपनीची सुरवात डालडा कंपनी म्हणून झाली होती.

पुढे डालडा उत्पादन करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या भूईमुगाच्या शेंगाच उत्पादन जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर परिसरात होत असल्याने कंपनीने अमळनेर येथे प्लॅन्ट टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. डालड्याचे उत्पादन वाढू लागले, आणि कंपनी भारतातल्या नामांकित कंपन्यामध्ये गणली जावू लागली.

त्यानंतरच्या काळावधीत म्हणजे ६०-७० च्या दशकात अमळनेर गावातील अनेक लोकं कंपनीत कामगार म्हणून लागले. कंपनी तेल आणि साबणाचे उत्पादन करु लागली होती. विप्रोच्या शेअर्सची किंमत तेव्हा १०० रुपये होती. शंभर रुपये देखील सर्वसामान्य गोष्ट नव्हती. मात्र गावात एक चर्चा सुरू झाली, ती म्हणजे कंपनी फायद्यात आहे शेअर्स घेवू.

असं सांगतात की प्रेमजींनी देखील त्या काळात शेअर्स घ्यावेत म्हणून चांगल मार्केटिंग केलं होतं. दरवर्षी शेअर्सच्या किंमतीवर चांगला लाभांक्ष देण्यात येत होता. कंपनीत काम करणाऱ्या प्रत्येकानेच शेअर्स घेतले. सुरवातीला १०० रुपयांना असणारे हे शेअर्स एकाने घेतल्याने दूसऱ्याने घेतले आणि दूसऱ्याने घेतल्याने तिसऱ्याने घेतले. असं करत करत गावातील अनेकांकडे कंपनीचे शेअर्स आले.

काही लोकांना हे ही माहिती नव्हतं की त्यांच्या नावाने कंपनीत शेअर्स आहेत. वडिलांच्या पश्चात आपलं कंपनीच्या शेअर्सहोल्डरमध्ये आलेलं नाव पाहून आपण कोट्याधीश असल्याचं या मुलांना कळालं. पण याचा फायदा असा झाला की, या मुलांना गुंतवणूकीची भाषा कळली त्यामुळे शेअर्स विकून पैसा करण्याकडे कोणीच लक्ष दिलं नाही.

११ ऑगस्ट १९६६ चा कंपनीला कलाटणी देणारा दिवस.

मोहम्मद प्रेमजी हे काळाच्या पुढे जाणारे व्यक्ती होते. अजीम प्रेमजी या त्यांच्या मुलाचं वय तेव्हा फक्त २१ वर्ष होतं. तो स्टॅनफोर्ड विद्यापीठात शिकायचा. त्या दिवशी त्यांच्या आईने त्यांना फोन करुन वडील वारल्याची बातमी दिली. सर्वकाही सोडून २१ वर्षाच्या या मुलाला कंपनीचा कारभार हाती घ्यावा लागला.

२१ व्या वर्षी कंपनी हातात घेतल्यानंतर अजिम प्रेमजी यांनी कंपनीला जागतिक स्तरावर घेवून जाण्याचा प्रयत्न चालू केला. भारतातील लालफितशाही कारभाराला कंटाळून IBM कंपनीने भारतातून काढता पाय घेतला. याच क्षणाचा पुरेपुर फायदा घेवून प्रेमजी यांनी पर्सनल कॉम्प्युटरच्या क्षेत्रात पाय रोवला.

वेस्टर्न इंडिया वेजिटेबल प्रॉडक्ट लिमेटेड या नावातून वेजिटेबल हटवण्यात आलं. कंपनी आत्ता इतर गोष्टींचे प्रॉडक्शन करु लागली. त्यानंतर वेस्टर्नचा W आणि प्रोडक्ट पासून प्रो करण्यात आलं. अशा प्रकारे कंपनीचं नाव विप्रो झालं.

आज आयटी क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी म्हणून विप्रोचं नाव घेण्यात येतं. २००२ साली न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये कंपनीची लिस्टिंग झाली. अनेक प्रोडक्ट कंपनीमार्फत करण्यात येतात आणि या सर्वात महाराष्ट्राचं एक गाव ३ टक्यांच मालक असतं.

सारख्या बलाढ्य कंपनीत समभागधारक आहे. गावाचं सांगायचं झालं तर,संपुर्ण गावात मिळून कंपनीच्या एकूण शेअर्सपैकी तीन टक्के शेअर्स आहेत व याची आजची मार्केट प्राईज ४,८०० कोटींहून अधिक आहे.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.