सध्या अटकेत असलेल्या केतकी चितळे विरोधात याआधी ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे
मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने शरद पवारांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याने चर्चेत आली आहे.
मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने शरद पवारांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याने चर्चेत आली आहे. केतकी चितळेने तिच्या फेसबुक पेजवर शरद पवार यांच्याविषयी लिहिताना, तुम्ही 80 वर्षांचे आहात. नरक तुमची वाट पाहत आहे. तुम्ही ब्राह्मणांचा द्वेष करता असे लिहिले आहे.
तिने शरद पवारांबद्दल अनेक आक्षेपार्ह गोष्टी लिहिल्या आहेत. या प्रकरणी केतकीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिला शनिवारी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे . कोर्टाने तिला १८ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पक्षाच्या काही महिला कार्यकर्त्यांनी तिच्यावर शाई फेकली आणि आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याबद्दल तिच्यावर टीका केली, राष्ट्रवादी काँग्रेसने याप्रकरणी अभिनेत्रीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
कोण आहे केतकी चितळे ?
आंबट गोड या मराठी मालिकेतील भूमिकेसाठी ती ओळखली जाते. ही मालिका 2012 मध्ये प्रसारित झाली होती. यामध्ये तिने अबोली नावाच्या मुलीची व्यक्तिरेखा साकारली होती. यानंतर केतकी अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये दिसली.
केतकी ही छोट्या पडद्यावरील अभिनेत्री आहे जीने स्टार प्रवाहच्या आंबत गोड, ZEE5 च्या तुझा माझा ब्रेकअप आणि सोनी टीव्हीच्या सास बिना ससुराल या टीव्ही शोमध्ये काम केले. केतकी तिच्या भूमिकांमुळे कमी आणि सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्टमुळे जास्त चर्चेत असते.
फेसबूक पोस्टमुळे चर्चेत
अभिनेत्री केतकी ही तिच्या एपिलेप्सीवरील पोस्टमुळे चर्चेत आली आहे. वास्तविक, या आजारामुळे तिला मालिकेतून वगळण्यात आल्याचा आरोप तिने केला होता. केतकी या आजारावर उपचार घेत आहे.
तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटला ‘एपिलेप्टिक वॉरियर क्वीन’ असे नाव देखील दिले आहे. ऍसेप्ट एपिलेप्सी या संस्थेची ती संस्थापक आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख
स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआने छत्रपती शिवाजी महाराज आणि अरबी समुद्रातील स्मारकाबद्दल भाष्य केलं होतं. यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या होत्या. या प्रकरणानंतर अग्रिमाने माफी मागितली. मात्र त्यानंतर केतकीने छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी केल्याने शिवप्रेमी नाराज झाले होते.
महाराजांनी दिलेली शिकवण विसरुन जात त्यांच्या नावावर राजकारण करण्याचा पोकळ विनोद करतात, असं केतकीने लिहिलं होतं. यामुळे केतकीला ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं होतं. या पोस्टसंदर्भात शिवसेनेच्या एका विभागप्रमुखाने धमकी दिल्याचा आरोप करत तिने स्क्रीनशॉटही शेअर केला होता.
केतकीविरोधात याआधी ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल
केतकीनं सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये विविध धर्म-पंथांचा उल्लेख करत लिहिलं होतं,
‘नवबौद्ध, 6 डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात, तो धर्म विकासासाठीचा हक्क. आम्ही फक्त हिंदू,असा शब्द उद्गारला, तर घोर पापी, कट्टरवादी? पण अर्थात चूक कुणा दुसऱ्यांची नाही, तर आमचीच आहे.
आम्ही स्वतःच्यातच भांडण्यात इतके बिझी आहोत, आम्हाला आमच्यातच फूट पाडणारे नेते आवडतात आणि आम्ही त्यांना ती फूट पाडू देतो, की स्वतःचा धर्म आम्ही विसरतो’,
असं तिने लिहिलं.
केतकीनं नवबौद्धांविषयी लिहिलेल्या वाक्यावरून नवी मुंबईतील आंबेडकरी चळवळीत सहभागी असणारे कार्यकर्ते स्वप्नील जगताप यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम