दिवाळी मध्ये प्रत्येक घरात वापरल्या जाणाऱ्या मोती साबणाचा इतिहास
दिवाळी म्हणजे मोती साबण हे समीकरण कसं तयार झालं. त्यामागचा किस्सा माहिती आहे का ?
उठा उठा सकाळ झाली मोती साबणाची वेळ झाली. ही जाहिरात दिवाळी च्या काळात टीव्हीवर हिट असते. पण मित्रांनॊ या मोती साबणाचा इतिहास आपल्याला माहिती आहे का ?
जरा विचार करा की आपल्या अगोदरची माणसे मोती साबण वापरायची का? तर उत्तर आहे नाही.
भारतातील सामान्य लोक आपल्या आपल्या घरी बनवलेल्या साबणापासुन, म्हणजे बेसनपीठ व दुधाच्या मिश्रणातून अंघोळी व्हायच्या. अंगणात, विहीरीकाठी अंघोळ करणारे कधीकधी पाठ घासायला नारळाची शेंडी वापरत होते. साबण म्हणून असे काही असते हे माहीती नव्हते.
१८७९च्या काळात उत्तरेत मिरतच्या आसपास पहिला साबण बनल्याची नोंद सापडते. पण त्याचा तो प्रसिध्द झाला नाही.
अगोदरची माणसं दिवाळीला मोती वापरत नव्हती. ती वापरायची म्हैसुर साबण.
साधारण १९१६ साली या साबणाची निर्मिती झाली. या साबणाला राजघराण्याचा वारसा आहे. पहिले फक्त म्हैसूरच्या वाडियार राजघराण्यासाठी या साबणाची निर्मिती होत होती. म्हैसूर भागात चंदनाची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते. त्या काळात यातील बरचस चंदन हे परदेशात निर्यात केलं जायचं.
पहिल्या महायुद्धाच्या काळात या निर्यातीवर बंदी करण्यात आली. म्हैसूर राज्यात चंदनाचा मोठा साठा पडून राहू लागला. म्हैसूरचे राजे कृष्ण वडियार यामुळे चिंतेत पडले.
त्यावेळी त्यांचे दिवान अर्थात पंतप्रधान होते भारताचे आद्य अभियंते म्हणून ओळखले जाणारे मोक्षगुंड्म विश्वेश्वरैय्या. त्यांनीच वाडियार महाराजांना या चंदनाचे तेल काढून त्यापासून साबण बनवण्याचा उद्योग सुरु करण्याचा सल्ला दिला होता.
तोवर फक्त राजेमहाराजांना उपलब्ध असलेले हे चंदनाचे साबण पहिल्या महायुद्धामुळे सर्वसामन्यांच्या बाथरूममध्ये दिसू लागले. तोपर्यंत तेलात स्थिरावल्यावर टाटांनी साबणाकडे लक्ष द्यायचे ठरवलं. तोपर्यंत अंघोळीची अशी तऱ्हा होती, तर कपड्यांच्या साबणाचाही काही विषय नव्हता.
१८९५ ला कलकत्ता येथील बंदरात इंग्लंडहून पहिला साबणसाठा आपल्याकडे आला, सनलाईट सोप नावाचा.! त्यावर लिहलं होतं, मेड इन इंग्लंड बाय लिव्हर ब्रदर्स.!
हा सनलाईट फार लोकप्रिय झाला आणि ती कंपनीही.! लिव्हर ब्रदर्स म्हणजे आत्ताची हिन्दुस्थान लिव्हर, ही कंपनी भारतात आली सनलाईट या साबणावर स्वार होऊन.!
याच हिदूस्थान लिव्हर कंपनीने नंतर डालडा आणला आणि भारतात ऐसपैस हातपाय पसरले. टाटांनी जेव्हा भारतीय बनावटीचा साबण बाजारात आणायचे ठरवले तेव्हा याच लिव्हर कंपनीने त्यांना कडवा विरोध केला.
तो काळ स्वदेशीचा होता. टाटा आपल्या जातिवंत उद्यमशिलतेनं नवनवी आव्हान पेलतं होते. वीज आली होती, पोलाद निर्मितीसाठी शोध चालु होते. पहिले पंचतारांकित हाँटेल ताज च्या रुपाने उभे होते.
आता साबणातही टाटा उतरले तर आपले नुकसान होणार हा अंदाज त्यांना आला होता, टाटा त्यांच्या कुठल्याही मालाच्या दर्जाच्या बाबतीत तडजोड करणार नाही हे ही ठाऊक होते. टाटांना टक्कर द्यायची असेल तर ती फक्त किंमतीच्या पातळीवरच देता येईल हे ते जाणून गेले . टाटांनाही ही कल्पना होती.
त्यामुळं टाटांनी आपला साबण बाजारात आणला तो लिव्हर च्या किंमतीत, १० रुपयांना १०० वड्या.!
नावही ठरलं ५०१ बार. या नावामागेही एक कथा आहे.
टाटांना स्पर्धा होती लिव्हरची. लिव्हर ही कंपनी मुळची नेदरलँडची. ती झाली ब्रिटिशांची कंपनी . टाटांना आपल्या साबणात ब्रिटिश काहीच नको होतं. लिव्हर ची स्पर्धा होती, फ्रान्समध्ये तयार होणाऱ्या साबणाशी.
त्या साबणाच नाव होतं ५००. ते कळाल्यावर कंपनीचे प्रमुख जाल नवरोजी म्हणाले “मग आपल्या साबणाचे नाव ५०१” कारण त्यांच्या रक्तातच स्वदेशी होत, त्यांचे आजोबा होते दादाभाई नवरोजी.
बाजारात आल्यापासून या साबणाचा चांगला बोलबाला झाला. त्यामुळे लिव्हरने सनलाईटची किंमत ६ रुपयांना १०० अशी कमी केली. त्यात त्यांचा तेलाचा खर्च ही निघत नव्हता. टाटांच्या साबणाला कमी करण्यासाठी त्यांची ही चाल होती.
टाटा बधले नाही, किंमत कमी केली नाही, तीन महीन्यांनी लिव्हर ने परत सनलाईटची किंमत पहिल्यासारखी केली. टाटा या स्पर्धेत तरले. या कंपनीने पुढे अंघोळीसाठी हमाम ची निर्मिती केली . तर दिवाळीसाठी जो आजही मोठ्या उत्साहानं वापरला जातो अश्या मोती साबणाची निर्मिती केली.
सत्तरच्या दशकात टाटाने या साबणाची निर्मिती केली होती. गुलाब आणि चंदन या दोन फ्लेवर मध्ये उपलब्ध असणारा हा भला मोठा साबण त्याकाळात २५ रुपयांना मिळायचा.
पुढे जेव्हा टाटाची हि साबण बनवणारी कंपनी हिंदुस्तान लिव्हर मध्ये विलीन झाली तेव्हाच सोन्याचे दिवस उगवले. म्हणजे काय झालं तर तेव्हा मार्केटिंगच्या कुठल्या तरी मानवानं या साबणाला दिवाळीच्या मंगल आणि पवित्र संकल्पनेसोबत जोडल. त्याचा फायदा असा झाला की दिवाळी म्हणजे मोती साबण हे समीकरण होवून बसलं.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम