भारतातून लंडनला बसने जाता येत होते ?
जग फिरण्याची हौस आणि खिशात पैसा असेल तर हा लेख तुमच्या कामाचा आहे. दिल्लीवरून लंडनला जाण्यासाठी आत्तापर्यंत विमान हा एकमेव पर्याय होता. पण आता रस्त्यानेही दिल्लीहून लंडनला जाता येणार आहे.
गुरगावमधली खासगी प्रवास कंपनीने बस सेवा लॉन्च केली आहे. ‘बस टू लंडन’ असं या सेवेचं नाव आहे. या बसने ७० दिवसांमध्ये तुम्ही दिल्लीवरून लंडनला पोहोचू शकता.
दिल्लीचे रहिवासी असलेले तुषार आणि संजय मदान हे याआधीही रस्त्यामार्गे दिल्लीहून लंडनला गेले आहेत. या दोघांनी २०१७, २०१८ आणि २०१९ साली कारने हा प्रवास केला होता. पण हे काही आज नाही की रस्त्याने लंडनला जाता येणार आहे. आपण जर का इतिहासात डोकावलं तर आपल्याला जाणवेल कि याआधीही भारताने लंडांपर्यंतचा प्रवास बस ने केला आहे.
कलकत्ता ते लंडन तब्बल 7900 किलोमीटरचा रुट
जगातील सर्वात लांबचा असा हा बसचा रूट होता. कलकत्ता ते लंडन 7900 किलोमीटरचा रुट अस्तित्वात होता.
ही बस कलकत्ता येथून निघून दिल्ली, अमृतसर, वाघा बॉर्डर, लाहोर (पाकिस्तान), काबूल, हैराण(अफगाणिस्तान), तेहरान ( इराण), इस्तांबुल ( तुर्कस्थान ), बुल्गारिया, युगास्लाव्हिया, आॅस्ट्रीया,जर्मनी,बेल्जियम मार्गे थेट लंडन येथे जात होती. भारतात हि दिल्ली, आग्रा, अलाहाबाद, बनारस करीत कलकत्ता येथे जात.
हि बस जेव्हा कलकत्त्यात पोहचली तेव्हा या बस चा चालक गैरव्ह फिशर जो बरीच वर्ष भारतात राहत होता तो या प्रवासाबद्दल सांगताना म्हणाला होता की हा रक अतिशय अविस्मरणीय व उत्साहित करणारा अनुभव होता.
आम्हाला इतक्या लांबच्या प्रवासात कुठेही इंजिन चा प्रॉब्लेम आला नाही आणि आम्हाला ब्रेक सुद्धा दिल्लीत गेल्यावर एकदा तपासावे लागायचे. त्याने सांगितले कि ते दररोज २०० मैल प्रवास करत असत व रात्री मुक्कामाला थांबत असत .
अल्बर्ट ट्रैवलची हि बस लंडन येथून 15 एप्रिल 1957 रोजी सुरु झाली ती भारतात कलकत्ता येथे 5 जून रोजी पोहचली होती. तेव्हा बसभाडे होते 85 पौंड.( आत्ताचे साधारण 8019 रु.) ही बस 1973 पर्यंत सुरु होती. या बस प्रवासात सर्व प्रकारची सोय करण्यात आली होती.
लक्झरीस बसमध्ये वाचन, वैयक्तिक झोपेचे बंक, पार्टीसाठी रेडिओ / टेप संगीताचा आनंद घेऊ शकत होते.फॅन, हीटरची सुविधा उपलब्ध होती. शॉपिंग साठी काही दिवस राखीव होते, त्यात तुम्ही दिल्ली, तेहरान, काबुल,इस्तांबुल ,साल्जबर्ग, विएन्ना येथे ती करु शकत होते.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम